

इंग्रज हिंदुस्थानात व्यापारी म्हणून आले
आणि हळूहळू राज्यकर्तेच झाले
फोडा आणि झोडा तंत्र अवलंबिले
आणि हिंदुस्थानातील लोकांना गुलाम केले
हिंदुस्थानातील ऐश्वर्य आपल्या देशात वाहून नेले
आणि हिंदुस्थानाला दुर्बल केले
काही लोकांनी त्यांना साहाय्य दिले
तर काहींनी त्यांच्या विरूद्ध बंड पुकारले
अनेकांच्या मनात देश प्रेम जागृत झाले
आणि त्यांनी स्वातंत्र्यासाठी प्रयत्न सुरू केले
अनेकांनी आपले तन-मन-धन अर्पिले
तर काहींनी आपले जीवाचे बलिदान दिले
ते स्वतः साठी नाही जगले,मातृभुमीला त्यांनी जीवन वाहिले
कधी सुख नाही उपभोगले हसत हसत दुःख सोसले
भुक तहान सर्व विसरले मातृभुमी साठी तुरुंगात गेले
हसत हसत देशासाठी फासावर चढले
आनंदाने आपल्या मातृभुमीसाठी रक्त वाहिले
संसारावर पाणी सोडले,
व मातृभुमीचे ऋण फेडले
अशीच वर्षामागून वर्षे जात राहिले
15 ऑगस्ट 1947 रोजी भारतास स्वातंत्र्य मिळाले
पण जे लढले,ज्यांनी स्वातंत्र्याचे स्वप्न पाहिले
त्यातील अनेकांनी स्वातंत्र्यच नाही उपभोगले
पण त्यांचे बलिदान व्यर्थ न गेले
त्यांनी आपल्या कार्याने इतिहासाचे पान लिहिले
असे महान व्यक्ती जे स्वातंत्र्यासाठी झटले
ते पुढील पिढीसाठी आदर्श ठरले
जे आपल्या कार्याने अमर झाले
ते भारतमातेचे खरे पुत्र ठरले
अशा शुर वीरांना मी वंदिले
आणि त्यांना माझे शब्द रूपी पुष्प वाहिले.