मुक्या मनातले प्रेम
तुझ्यासाठी किती वसंत
जाळिले मी
तुझ्यासाठी किती शरदाचे चांदणे
अव्हेरले मी
माझ्या मनातले प्रेम
तुझ्यापर्यंत पोहोचले का
मी मुक्या मनाने प्रेम केले
हा माझा गुन्हा का
तुझ्यापर्यंत पोहोचले का
मी मुक्या मनाने प्रेम केले
हा माझा गुन्हा का
आज पुन्हा तुला बघितले
काही वर्ष सर्र्कन निघून गेली
तुझ्याबरोबर तुझी सौ होती मुले होती
माझ्यापाशी आठवणींची पुस्तिका उघडली
काही वर्ष सर्र्कन निघून गेली
तुझ्याबरोबर तुझी सौ होती मुले होती
माझ्यापाशी आठवणींची पुस्तिका उघडली
तुझ्यासाठी इथे असंच थांबून
मी काही मिळवल
आणि बरेचसे गमावल
एक हसत खेळत गोकुळ गमावलं
पण उभा गावच माझं गोकुळ करून घेतलं
मी काही मिळवल
आणि बरेचसे गमावल
एक हसत खेळत गोकुळ गमावलं
पण उभा गावच माझं गोकुळ करून घेतलं
इथे उभे राहून मी एवढंच म्हणेन
जे गेलं ते आपलं नव्हतंच
जे आपलं होतं ते आपल्यापाशी
अलगद आलं
सुखदुःख ऊन पावसाचा खेळ
कुणास घास ऊन ऊन
कुणास घास निऊन
जे गेलं ते आपलं नव्हतंच
जे आपलं होतं ते आपल्यापाशी
अलगद आलं
सुखदुःख ऊन पावसाचा खेळ
कुणास घास ऊन ऊन
कुणास घास निऊन
........ योगिता मिलिंद नाखरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा