ती हळवी वाट माझी होताना...
माझ्यासाठी काटेरी वनात त्या
फुलांच्या पायघड्या घालताना...
स्वप्नात मी पाहिलं होतं तुला...
माझ्या दुःखांना कवेत घेताना...
माझ्यासाठी सुखाचा पाऊस होऊन
हर्षाने , अविरतपणे बरसताना...
स्वप्नात मी पाहिलं होतं तुला...
माझा हात हाती घेताना
माझ्यासाठी एकटेपणात
सोबती माझा होताना...
स्वप्नात मी पाहिलं होतं तुला..
माझा राजहंस होताना....
माझ्यासाठी अगदी मरतानाही
मालकंस नी मारवा गाताना...
स्वप्नात मी पाहिलं होतं तुला...!!
कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे