इंटेरिअर डिझायनिंग मध्ये रंगांचे महत्व

Marathi Fine Writing,Life lessons,life style,Marathi Blogs,Inspirational,Marathi Short Stories
कोणतीही जागा अथवा वस्तू पहिल्यांदा बघताना आपल्याला कोणती गोष्ट आकर्षित करत असेल तर ती म्हणजे त्या जागेची रचना(structure) आणि रंगसंगती(color scheme).#interior desigening ,मध्ये structure आणि color scheme या गोष्टी महत्वाची भूमिका निभावताना आपल्याला दिसतात.आजच्या या लेखामध्ये "रंगसंगती"(#color scheme)या interior desigening मधील अतिशय महत्त्वाच्या आणि #gamechanger पैलू बद्दल आपण माहिती करून घेऊ या.
रंग म्हणजे काय(#What is colors)



"रंग"हा आपल्या आयुष्याचा अतिशय महत्वाचा घटक आहे. कोणतीही सुंदर गोष्ट मग ती कितीही सुबक असली तरी रंगांशीवाय अपूर्णच आहे.आता रंग ही concept सोप्या भाषेत जाणून घेऊया.रंगांच्या या "रंगीत"दुनियेत लाल(रेड),पिवळा(yellow),आणि निळा(blue)हे primary colors आहेत तर नारंगी(orange),हिरवा(green) आणि जांभळा(violet) हे secondary colors आहेत.याबरोबरच सहा #Tertiary colors सुद्धा आहेत जे या primary आणि secondary colors च्या mixing मधून तयार होतात.कोणत्याही रंगाच्या (Hue) primary आणि secondary color मध्ये जर पांढरा(white)रंग मिसळला तर आपल्याला जो रंग मिळतो त्याला #Tint असे म्हणतात.तेच जर काळा(black)रंग मिसळला तर तयार होणाऱ्या गडद रंगांना "shade" असे म्हणतात.एखाद्या रंगाचा "Tone"मिळवण्यासाठी आपल्याला त्यात करडा(Gray)रंग मिसळावा लागतो.अशा पद्धतीने आपण primary आणि सेकंडरी colors च्या योग्य mixing मधून अनेक रंग निर्माण करू शकतो. पण निर्माण झालेल्या या रंगछटा मात्र त्यांच्या original रंगांचेच(Hue)प्रतिनिधित्व करतात.

रंगाचे स्वभाव(#color psychology)


प्रत्येक रंगाचा एक स्वभाव असतो आणि तो रंग आपल्या स्वभावाप्रमाणे आपल्या सभोवतालावर(surroundings)वर परिणाम करत असतो.जसे की निळा अथवा हिरवा रंग मनाला शांतता प्रदान करतात(#calm and soothing)तर लाल,नारंगी या सारखे रंग उत्साहाचे प्रतीक असतात(#Energetic)पांढरा, करडा(gray) हे #neutral color नावाप्रमाणेच neutral असतात.

रंगसंगतीचे महत्त्व(#importance of color scheme)

योग्य रंगसंगती(#colorscheme) हा #Interior Desigening, चा सर्वात महत्वाचा घटक असल्यामुळे #Interior designer अथवा #Architect ला रंगांचे सखोल ज्ञान असणे अतिशय आवश्यक असते.योग्य प्रकारची #colorscheme वापरून आपण एखाद्या जागेची उपयुक्तता आणि तिथले वातावरण नक्कीच बदलू शकतो. एखादी space छोटी अथवा मोठी आहे असे #illusion निर्माण करणे रंगांमुळेच शक्य होते.जेव्हा एखाद्या site वर Architectural changes करणे शक्य नसते तेव्हा त्या space ला हवा तसा effect देण्यासाठी रंग च मदतीला येतात.

योग्य रंगसंगती चा वापर(# use of proper colorscheme)

कोणतीही जागा desigen करताना त्या जागेचा वापर आपण कशासाठी करणार आहोत ते महत्वाचे ठरते. मग ते #kitchen असो #livingroom असो किंवा #bedroom. जागा कोणती आहे तसेच तिचा वापर कोणत्या कामासाठी आणि कितीवेळ होणार आहे यावर कोणते रंग वापरायचे हे अवलंबून असते.जसे की #Fast Food हा main menue असलेली restaurents बरेचदा लाल,पिवळा,नारंगी,हिरवा अशा रंगात रंगलेली बघतो.बघताना हे रंग नक्कीच attractive वाटतात.कारण वर सांगितल्या प्रमाणे प्रत्येक रंगाचा स्वतःचा असा एक स्वभाव असतो आणि तो directly अथवा indirectly बघणाऱ्या च्या मनावर परिणाम करत असतो. लाल रंग(red color)हा काही प्रमाणात Blood Pressure आणि Heart Beats वर परिणाम करतो परिणामी बघणाऱ्याची भूक चाळवली जाते.तेच नारंगी रंग(orange color )#Healthy Food ची आठवण करून देऊन बघणाऱ्या ला "comfortable feel"करवतो.पिवळा रंग (Yellow) बघून आनंद आणि उत्साहाच्या भावना वाढतात तर हिरवा रंग "सकस"आहाराची आणि "विपुलतेची"(Abundance) ची जाणीव करून देतो.पुन्हा कधी अशा ठिकाणी भेट द्याल तेव्हा तेथील रंगसंगती(colorscheme)नक्की observe करा.


वरील उदाहरणावरून एक गोष्ट नक्की लक्षात येईल की जागेचा वापर आपण कोणत्या कारणासाठी आणि किती वेळासाठी करणार आहोत त्यावरून त्या जागेची #colorscheme ठरवली जाते.म्हणूनच निळ्या रंगाचा(#Blue Color)चा स्वभाव शरीर आणि मन शांत करणारा असल्यामुळे बेडरूम(bedroom)साठी अथवा commercial places साठी जास्त प्रमाणात वापरला जातो.

रंग मनावर परिणाम करतात हे जरी खरे असले तरी बघणारा प्रत्येकजण एकाच रंगाला सारखाच "React"होईल असे नसते.लाल रंग(Red color)एखाद्याला अगदी "भडक" वाटतो तर कोणाला तो #Romantic वाटू शकतो. काळा रंग(black color)कोणाला depressive वाटतो तर कोणाला तोच #Glamerous वाटतो.

#Interior Desigening ही एक कला आहे. या कलेची संकल्पना व्यक्तीनुसार बदलत जाते.व्यक्तीच्या स्वतःच्या आवडीनिवडी,त्याचा व्यवसाय,त्याचे सामाजिक स्थान यानुसार निर्माण होणारी रचना (Structure) आणि रंगसंगती(colorscheme) बदलत जाते.म्हणूनच प्रत्येक #Residencial अथवा #commericial site ही client आणि desiger च्या व्यक्तिमत्वाचा आरसा असते. Interior desigening च्या संदर्भात "रंग"(Colors)ही संकल्पना (concept)अमर्याद (Limitless) आहे.

पुढील लेखात कोणत्या जागेसाठी कोणत्या रंगांच्या Shade, Tint,Tone वापरू शकतो ते बघूया.


Rutuja Naik

#Life Style

#Interior Desigening


🎭 Series Post

View all