Login

ईराचे स्फुर्तिस्थान : आदरणीय संजना इंगळे

ईराचे नवे रुप लोभसवाणे ....

ईराचे स्फुर्तिस्थान : आदरणीय संजना इंगळे 

     शब्दांची ही किमया 
     ईराची सुचली कल्पना 
     सलाम या बुद्धिमत्तेला 
    प्रगल्भ लेखिका ही संजना 
           .....................................

       जीवनातील सोनेरी क्षण अनेक असतात पण घनिष्ट संबध निर्माण करुन सोज्वळ नाती जपणे मला फार आवडते हा आनंद जीवनातील सुखदायी पर्वणी वाटते.अशाच क्षणांचा सोबती होण्याचा  आज प्रयत्न करत आहे.

    शालेय जीवनात मुलांचे भवितव्य हे त्यांंच्या संस्कारशील वर्तणुकीवरुन कळते.त्याचा अभ्यास , दररोजची रोजनिशी , खेळांमध्ये सहभाग , सांस्कृतिक कलेतील आवड , विविध स्पर्धेतील सहभाग  हे त्या मुलांचे प्रदर्शन  पुढील आयुष्याचे दिशादर्शक असतात मग त्यानुसार जर त्यांना सकारात्मक उर्जा मिळत गेली तर सुंदर सदाबहार व्यक्तिमत्त्व तयार होते.

     वाचन , मनन ,  लेखन हे छंद शालेय जीवनातच जोपासावे लागतात किंबहुना ते आयुष्याचे द्योतक असतात यातुनच मग  चांगल्या लेखकांचे उगमाचे संकेत मिळतात.लहानपणापासूनच या छंदाला कलाटणी मिळाल्यामुळे , संस्काररुपी लेखक निर्माण होतो , मग त्यांंचे  लिखाण सर्वस्वी बहरते व वाचकांना आकर्षित करते नेमके अशाच त-हेचे करारी स्री व्यक्तिमत्त्व आदरणीय " संजना इंगळे "  मॕडम यांचे आहे.

    शालेय जीवनात सुरवातीपासुन आपल्या बुद्धिमत्तेची छाप पाडलेल्या संजना मॕडम यांनी तेच कर्तृत्व कायम राखत आपला शैक्षणिक वारसा मनापासून जपला.केवळ बौद्धिक चापल्याद्वारे इंजीनियरींग क्षेत्र गाजविले.तिथे अनेक स्पर्धात आपली चमक दाखविली.खेळातही विशेष  प्राविण्य दाखविले.वाचनाची आवड असलेमुळे अनेक पुस्तके  वाचून फस्त केली.त्यातूनच आपणही लिहू शकतो ही उमग आली आणि तेथूनच नव्या लेखिकेचा जन्म झाला.

    " मॉम्सप्रेसो " या व्यासपीठावर सर्वांगसुंदर लेखन  केले.शब्दांना सात्त्विक प्रतिभेची फोडणी देताना समाजउपयोगी लेखन केले.अनेक वर्तमान विषयावरील कथा , लेख वाचकांना बहाल केले यातूनच त्यांंच्या लेखणीला प्रोढत्व प्राप्त झाले व लेखन अधिक रंगतदार होऊ लागले.

  आत्ता साहित्यक्षेत्रात त्यांंचा चांगलाच जम बसला होता.वैवाहिक जीवनही चांगले चालले होते.स्वतः लेखिका असल्यामुळे शब्दांना किती परकेपणाची वागणूक मिळते याची त्यांना जाण होती  हे ओळखूनच त्यांंच्या मनात  नवनिर्मितीची पालवी फुटली आणि लेखकांच्यासाठी काय तरी केले पाहिजे , त्यांंच्या शब्दांना व्यक्त होण्यासाठी आपले हक्काचे ठिकाण मिळाले पाहिजे या उदात्त हेतूने ११ एप्रिल  २०१९ ला  "  ईरा "  या व्यासपीठाची निर्मिती केली आणि  बुलंद  शब्दांना हक्काचे व्यासपीठ मिळाले.छोट्याशा बाळाचा " रुद्रावतार " सहन करत क्षणांक्षणांचा उपयोग करत या व्यासपीठाला आपला बहुमुल्य वेळ दिला हे किती विलक्षण आहे याची प्रचिती येते.स्रीयांची सोशिकवृत्ती यातून नवनिर्मितीची कवाडे खुली होतात व समाज या विशिष्ट धारेचा उपयोगाने सकारात्मक बदल घडवून आणतो हे संजना मॕडम यांच्या या स्रीसुलभमनाने प्रकर्षाने लक्षात आणून दिले आहे.
   ईराला सुरवातीपासूनच लेखिकांचा वाढता प्रतिसाद मिळाला आहे.आपल्या दर्जेदार कथा येथे लेखिका सादर करु लागल्या , चोखंदळ वाचकवर्ग याचा मनमुराद आनंद लुटताना  येथे समरस झालेला आहे.ईरा व्यासपीठाला स्री लेखिकांची देणगी लाभलेली आहे.प्रतिभासंपन्न लेखिका येथे आपले लेखन आवडीने करतात तितकाच प्रतीसाद वाचकवर्गाकडून मिळतो आहे.दिवसेंदिवस ईराचे हे विलोभनिय रुप नवनविन लेखकांना मोहिनी घालत आहे याची दखल संजना मॕडम यांनी घेताना लेखकांना लिखाणाचा मेहनताना मिळाला पाहिजे हे लक्षात आल्यानंतर त्यांनी ईरातील लेखकांना मानधन देण्याची सुरवात केली.अनेक माध्यमांच्याव्दारे वा अनेक व्यासपीठावर लेखक लिहीत असतात पण मानधन देण्याचा पहिलाच प्रयत्न संजना मॕडम यांनी केल्यामुळे लेखणीचा आर्थिक सुबत्ता मिळाली व ईरावर लेखकांचे बहारदार लिखाण बहरु लागले आज ईरा माध्यमांच्या रेलचेलीत प्रगतीपथावर आहे हे एका लेखिका महिलेचे एकविसाव्या शतकातील क्रांतिकारक यश आहे.

  ईराचा हा दैदीप्यमान प्रवास सुखकर करताना संजना मॕडम यांना खडतर प्रवासातून जावे लागले.वाढती लोकप्रियता व लेखकांची मांदीयाळी यामुळे ईराच्या सुखसोयी लेखकांना व वाचकांना मिळाव्या  यासाठी ईराची धुरा आदरणीय योगिता टवलारे मॕडम यांचेकडे सोपविली.एक प्रगल्भ लेखिका असल्यामुळे ईराचा पदभार त्यांनी व्यवस्थित सांभाळला.लेखकांना सहकार्य करणे , वाचकांना कथा वेळीच देणे , वाचकांच्या मागणीला प्रतिसाद देणे , सर्वांचे शंका निरसन करणे , वेगवेगळे विषय देऊन स्पर्धा घेणे यामुळे ईराची प्रसिद्धी सातासमुद्रापार गेली आहे.भविष्यात ईराचे नवे रुप सर्वांना आवडेल व ईराची झेप उतुंग असेल हे वाचकवर्ग व लेखकांना नवी संधी राहिल.

  हा सारा विस्तृत गोषवारा घेताना ईराचे शब्दवर्णन करण्याचे मुख्य प्रयोजन म्हणजे  ईराच्या निर्मात्या  आदरणीय संजना मॕडम यांचा आज वाढदिवस ....!! हे पुष्प गुंफताना अतिशय आनंद होत आहे.त्यांंचे  अवघे  आयुष्य आनंदाने सजावे.आनंदी सोहळे त्यांंच्या जीवनात नित्य यावेत. सुखी आरोग्यसंपन्न लाभावे. ईराची वाटचाल आपल्या संयमी व धीरोदात्त विचाराने  पुढे जावी नवे प्रयोगशील बदल ईराने स्विकारुन लेखकांना प्रेरणा द्यावी हीच या सोनेरी क्षणाला सदिच्छा ...!!

   फलदृप झाली ईच्छा 
   ईराचा शब्द गेला सातासमुद्रापार 
    संजना मँडम यांची कृपा 
   लेखणीला बळ चढले अपार

❣️वाढदिवसाच्या मनःपुर्वक शुभेच्छा ...!!

????????????????????????

         ©®नामदेवपाटील✍️

0