ब्लॉग चे नाव "कळत नकळत" ठेवायचे कारण म्हणजे आयुष्यात खूप छोट्या छोट्या गोष्टी ज्या इतरांसाठी मोठा आनंद घेऊन येतात नेमक्या त्याच गोष्टी आपल्या कळत नकळत लक्षात येत नाहीत...
अशीच एक छोटी गोष्ट..
अर्पिता शिंदे....एक career oriented आणि गृहकर्तव्यदक्ष आधुनिक स्त्री...एका चिमुकल्याची मम्मा...आणि तिला कायम support करणाऱ्या नवऱ्याची पत्नी कम मैत्रीण...
घर आणि career चा उत्तम balance साधण्यासाठी जो पुल आहे तो म्हणजे तिच्या बाळाला सांभाळायला ठेवलेली एक आजिवजा बाई. जी घरातली कामे करून बाळाचे खाणे पिणे,शी सू,खेळणे रुस्ने उत्तम पणे करीत असे...
तर झाले काय ..उन्हाळ्याचे दिवस.. अर्पिताचे wfh...नवरा कामानिमित्त बाहेर गेलेला...चिमुकल्याचा बालहट्ट आईस्क्रिम चा ...अर्पिताची सर्दी होईल नको,घसा बसेल नको...अशी कारणे उपयोगी पडेनात..so...नाईलाजाने तिने त्या बाईंकडे ५० rs दिले आणि म्हणाली एक १० rs चेआइस्क्रीम आणा बाळाला...आजीने आणले... बाळाने एन्जॉय करत खाल्ले ...थोड्या वेळाने झोपिही गेला...
अर्पिताला चहाची वेळ झाली तशी तिने आजिंना आवाज दिला... तिकडून हाक आली नाही...म्हणून ती balcony मध्ये गेली तर आजी आपल्याच धुंदीत आइस्क्रीम चा आस्वाद घेत होत्या... अर्पिताला जरा राग आला...काय बाई आहे...एक आइस्क्रीम आणायला सांगितले तर हिने स्वतःला देखील आणले...इथून पुढे आपणच लागेल तितके मोजून पैसे द्यायला हवे...म्हातारीने नक्की किती पैसे परत आणले म्हणुन सामानाची पिशवी बघितली तर ४० rs तसेच दिसले...म्हणजे आजींनी त्यांचे आइस्क्रीम त्यांच्या पैशातून आणले... अर्पितला स्वतःचाच राग आला,लाज वाटली...ती balcony मध्ये परत आली तर आजी आइस्क्रीम च्या काडिकडे पाहून रडत होत्या..ना राहवून अर्पिता पुढे गेली ..आजींना रडण्याचे कारण विचारले...
आधी आजी बोलेनात..२ मिनिटे गेली...त्या बोलू लागल्या...पोरी मला सुधा गारेगार खूप आवडायची...लहानपणी जरा आईचे पैसे सुटले की आई घेऊन यायची...नंतर आई गेली....लग्न लोकांनी करून दिले कसेबसे...आजारी नवरा...तो ही गेला... पदरात एक ल्योक...त्याला सुधा लई गारेगार आवडायची...त्याच्यासाठी लोकाची धुणी भांडी करून दर आठ दिवसाला एक गारेगार घेऊन जायची...पोरगा लयी खुश व्हायचा...म्हणायचा तुला का गा नाही आणत आई..पैसे नाहीत म्हणून ना....मी मोठा झालो ना, खूप पैसे कमविल...मग आपण रोज एक गारेगार खाऊ...पोरगा शिकला बी...पण मोठा होऊन त्याची बायको घेऊन गेला..तो परत आलाच नाही...मी बसले वाट बघत कधी पोरगा गारेगार घेऊन येतंय त्याची...
आज या तुझ्या लेकराच्या हट्टापायी मला बी लहान लेकरू होऊन खाऊ वाटले बघ...किती दिवस मन मारून दुसऱ्यासाठी जगायचं...आणि किती दिवस पोर गारीगार घेऊन येईल म्हणून वाट बघित बसायचे...आपला आनंद आपणच घ्यायला शिकायचं...पैसे तर होतच...मग मी बी मला एक घेऊन आले...लयी बरे वाटले...
चल तुला चहा लागतो ना या वेळेला ...ठेवते बघ..आजी उठल्या...अर्पिता चे ही डोळे पाणावले..आणि एकदम ती म्हणाली...थांबा..आज मला पण गारेगार खाऊ वाटली..जा आणि मला आणि तुम्हाला दोघिंना घेऊन या..दोघीही आनंद घेऊ....आणि तुमची गारेगार माझ्याकडून बरे का...
चिमुकल्याने कळत नकळत त्या माऊलीला किती मोठ्या मुकलेल्या आनंदाची गळाभेट घाऊन दिली बरे....
- - शब्दसुधा
Sudha Mulik
Sudha Mulik
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा