Feb 28, 2024
जलद लेखन

चार दिवसांच माहेरपण हवंच...!भाग -५

Read Later
चार दिवसांच माहेरपण हवंच...!भाग -५

सगुणाच आता मानसिक संतुलन बिघडू लागलं होतं.सतत एकाच ठिकाणी राहुन भिञेपणा वाढू लागला होता.तीचच तिच्यावरचं संतुलन ठासळू लागलं होतं.माणसाकडे सारं असलं तरी प्रेमाची चार लोक व आपली माणसं जगायला लागतातच ना?तिचाही तसंच होतं.. सारं बालपण जेथे गेलं त्या माणसांपासून दुरावल्याच दुःख तीच्या मनाला खचवत होतं...नव-याबद्दल तिरस्कार वाढू लागला होता.तो तीची काळजी घेत होता,प्रेमही करत होता पण त्यांच्यामुळे तीचं माहेर तुटल हिच तिच्या मनात अढी बसली होती.


सगुणाच शांत राहाणं तीच्यातला बदल आता माणसिक आजारात बदलला होता.सगुणाची आजवर कुसही उजवली नव्हती.सासरी तीच्या तब्बेतीची चिंता वाढली होती... तिच्या गरोदरपणासाठी आता डाॅक्टरांची भेट घेण आवश्यक होतं..व तसंच झालं.


समाधान व सगुणा बाळाच्या आगमनासाठी डॉ क्टरांकडे गेलीत.तेथेच तीच्या माणसिकतेचा अंदाज डाॅक्टरांना आला.बाळा अगोदर सगुणा ने खुश रहावं व एकदा मानसोपचारतज्ज्ञाना भेटाव असं डॉ क्टरांनी सुचवलं..

मानसोपचारतज्ज्ञांना भेटल्यावर सगुणा च्या बदललेल्या मानसिकतेचे मुळ हळूहळू लक्ष्यात येऊ लागले... सगुणा ने आनंदी राहावं .. चारचौघात मिसळावं, आपल्या माणसांमध्ये वावरावं तर ती पुन्हा पुर्वीसारखी होईल..हा शारिरीक नाही तर मानसिक आजार आहे.तीला तिच्या माणसांमध्ये वावरू द्या तिच्या मनासारखं होऊ द्या..तीला वेळ द्या मग बाळाचा विचार करा.. नाहीतर ती जास्त डिप्रेशन मध्ये चालली जाईल असं सुचवण्यात आलं..


आता समाधान व घरच्यांनाही चिंता वाटू लागली.सगुणाची इच्छा पुर्ण करण व तिला आनंदी ठेवणं हे समाधानच्याच हातात होतं..हसती खेळती सगुणा आपल्या माणसांपासून दुरावल्याने दुखावली होती.आज सगुणाला वहिनीचही दुःख कळत होतं.वहिनीला माहेरच्यांनी तोडल होत येथे तर  काहीच प्रोब्लेम नव्हता फक्त नव-याचा हट्टीपणाने ती माहेरपासून दुरावली होती...


तीची परिस्थिती बघून आजीने समाधानला समजवायचं ठरवलं,"समाधान अरे बाईला माहेर असलं ना? तीचं निम्मी दुःख ती पचवते रे ..तु सगुणाला माहेरी जाऊ दे सारंच ठिक होईल बघ..‌ती कळीवाणी पुन्हा उमलू लागेल... तीच्या मनाचा निचरा करायला जागाच नाही ना?रे ठेवली तु त्या साठलेल्या भावनांचा मनात कचरा झाला बघं...तु नेऊन सोड चार दिवस माहेरी बघं कशी पुन्हा खुलेल तीची कळी...".


आजीच बोलणं समाधानला पटलं.. दुसऱ्या दिवशी त्याने सगुणाला माहेरी नेऊन सोडलं.खरतर तिच्यासाठी तो क्षण अनमोल असाच होता.आजवर नव-याचा मान जपत दोन वर्ष तीने माहेरी पायही ठेवला नव्हता.समाधानलाही बायकोला सारंच आहे मग का?,असावं माहेर असंच वाटतं असल्याने हा दुरावा वाढत होता... सर्वसाधारण परिस्थितीची लाज वाटत असल्याने जाव ई मुलीला पाठवत नसेल हा समज माहेरी होता..


समाधानाने माहेरच्या रस्त्यावर गाडी टाकताच सगुणा थोडी घाबरली होती,पण ,"तुला माहेरची ओढ आहे सगुणा मी चुकलो...तुझं माहेर हाच तुझा आनंद आहे... त्यामुळे मी तुला स्वतः सोडतो आहे तु आनंदाने चार/आठ दिवस रहा...तुला जेव्हा वाटेल तेव्हा तु मला घ्यायला बोलव मी लगेच येईल".


समाधानच हे वाक्य ऐकूनच सगुणाला खुपचं आनंद झाला होता..माहेरी पोहचल्यावर तीच्या आनंदाला पारावार उरला नव्हता.चार दिवसात सगुणा मध्ये खुपचं फरक पडला होता..ती आता पुन्हा पुर्वी सारखी आनंदी राहू लागली होती...दोन वर्षांपासूनची तीच्या मनातली सल आता संपली होती..नव-याबद्दलचा मनातला तेढा सुटू लागला होता...


इतक्या दिवसांनी माहेरी आलेल्या लेकिला आईने व सा-या घराने डोक्यावर घेतलं होतं..आठ दिवसांच तिचं माहेरपण तीला पुन्हा नवतरपणा देऊन गेलं होतं...आता आई म्हणाली,"सगुणा बरेच दिवस राहिली बाई आता जा सासरी.. असंच वाटलं तर जावईबापुंना सांगून ते जा मध्ये मध्ये..‌आता नाही नाही म्हणणार ते..."


सगुणा ने होकार दिला व समाधानला तसा निरोप पाठवला.


वहिनी म्हणाली,"माई चार दिवसाच माहेरपण हवंच हो बाईला नाहीतर मनाच आजारपण जडत बघा...आता अश्याच आनंदी रहात चला ".


सगुणा म्हणाली,"हो गं वहिनी मी तर मलाच विसरली होती बघं...सारं असल तरी माहेरची सर कशालाच नाही बघं...आज आभाळ ठेंगणे झालं मला..‌ह्या सुखाची तुलनाच नाही गं..".


चार दिवसांच माहेरपण संपवून सगुणा जायला निघाली .तोच सगुणाचा भाऊ समाधानला म्हणाला,"भावजी माहेर म्हणजे मुलीचा प्राण ,तीला चार दिवस माहेरी सोडलं ना? तिच्या सा-या दुःखाचा निचरा होतो...ताईला येथून पुढे चार दिवसांच्या माहेरपणाला येऊ द्या ही विनंती करतो तुम्हाला..."


समाधान ने होकार देत वचन दिलं...,"दादा आजवर चुकलं माझं पण मी तीचं माहेरपण येथून पुढे कधीच थांबवणार नाही उलट मीच सोडेन तीला... फक्त तीने आनंदात राहावं बसं...माझं चुकलं पण हि चुक आता कधीच होणार नाही...".


सगुणा सासरी गेल्यावर पुन्हा नव्या उमेदीने जगु लागली.तिचा उत्साह दिवसेंदिवस वाढू लागला...आता ती आईही बनली होती..सासरची लाडकी झाली होती.पण समाधानने तीला कायमचं वाटेल तेव्हा दोन दिवस माहेरी जाण्याच सुख देऊन संसार सुखाचा केला होता...(स्ञीच्या जिवनात सासर व माहेराला अनन्यसाधारण महत्त्व आहे.तीला दोघही घरची ओढ असते.सासर श्रीमंत असलं तरी ती माहेरची माणसं विसरू नाही शकत.माहेरी तीच्या जीवाला विसावा मिळातो, तीचं कष्टाने पिंजलेल शरिर मन पुन्हा ताजतवान होतं...माहेर बाईला मिळालेलं वरदान आहे सारी दुःख ती त्या माहेरपणात विरून टाकते व सासरी आल्यावर पुन्हा जोमाने संसाराला लागते... नवचैतन्य,नवी उर्मी माहेरपणात तीला भेटतं असतं,सारं सुख एका बाजूला व एका राञीचा माहेरचा विसावा एकिकडी...सा-या आजारांवर,मनावर,दुखांवरच स्ञीचं रामबाण औषध म्हणजे माहेर...एक "माहेरवाशीण "माहेरच्या त्या ओढीनेच जगत असते तीच्यातील ती बालपणीची बाई जीवंत ठेवत असते...जर कि माहेर तुटलं तर स्ञी आतल्या आत तुटते...भावनीक, मानसिक आधार संपतो ... म्हणून चार दिवसांच माहेरपण स्ञीला हवंच... तीच्या स्वप्नांना बळ भरायला, तीला भावनिक आधाराला, तीच्यात चिरतारुण्य यातला... दुःखाचा विसर पडायला व संसारात पुन्हा नव्याने रमायला... बरोबर ना? तुम्हाला काय वाटल कथा वाचून ते जरूर सांगा हं...)


धन्यवाद...


©® वैशाली देवरेईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Vaishali Deore

Housewife

मी कोणी महान लेखिका नाही...शब्दांना थोडासा साज देण्याचा प्रयत्न बस

//