Feb 28, 2024
जलद लेखन

चार दिवसांच माहेरपण हवंच..!भाग -४

Read Later
चार दिवसांच माहेरपण हवंच..!भाग -४

लग्नाचे सारे विधी व परतावाही झालं आता आजपासून तीच्या संसाराचा श्रीगणेशा होणार होता.नविन घर नविन घरातली माणसं येथिल चालीरिती ह्यांचा विचार करत तिला सासरचा मानसन्मान जपायचा होता.कारण ह्या घराला पाटिलकीचा मान होता.

आज येताना शमा आत्या व आईने सगुणाला समजावलं होतं..


"सगुणा तु आता साधीसुधी सगुणा नाहिसा तर पाटील घराची शान आहेस,त्या घराचं घरपण जपणं तुझं काम, सासरची शोभा आपणचं वाढवायची असते बघं,नव-याच मन जपणं,व सासरच्या मंडळीची मर्जी सांभाळणं आता तुझं काम... कंटाळा आला किंवा राग आला तर लगेच माहेरी येणं चुकिच असतं बरं बाई...माहेरी आपला सन्मान आपणचं जपायचा असतो बघं.आपलं घर व त्या मानसांना जपणं, त्यांच्या बोलण्याच वागण्याचं मनाला लावून न घेता पचवता यायला हवं.उठसूठ कुणाकडे तक्रार करणं म्हणजे हो मोठेपणा नाही बघं...सहन केल तर सारं हळूहळू मिळतं बघं..‌आपली किंमत उशिरा होते असं समजायचं बरं...पण सासर जपायचं..".

सगुणा म्हणाली,"म्हणजे मी आता तुम्हाला परकी काय?".


"नाही गं बाई माहेरपण कसं चार दिवसाच हवं , हक्काच व अभिमानाने मिरवता येण्यासारखं... उठसुठ आलेल्या मुलीला ना?सासरी किंमत उरते ना? माहेरी,चार दिवसाच माहेरपण शोभत बरं..".आई म्हणाली.


राञ झाली समाधानाच्या जोडीने तीला घरातल्या बर्याच गोष्टी कळल्या होत्या.तशी ननंदही होती हाताखाली तीच्यासाठी एवढ्या मोठ्या घरात वावरण अवघड होत पण कठिण नव्हतं.


दुसऱ्या दिवसापासून सगुणाचा संसार सुरू झाला.घरात सगळीकडे पुरूषांचच वर्चस्व होतं.समाधानच्या स्वभावातही तोच पगडा ,सारं काही हातात हवं,बायको नजरेसमोरून कधीच लांब नसावी व आपलं सारं बायकोनेच कराव हा स्वभाव..तस माहेरी दादाला काही प्रोब्लेम नसायचा तो आई व सगुणा कडूनही किही गोष्टी करून घेई पण इकडे स्वारी जरा हेकटच होती.सगुणा त्यांच्या डोळ्यासमोरच असावी बस...


घरची प्रथा व समाधानचा हट्टी स्वभाव त्यामुळे सगुणा ची माणसिकता जरा विचित्रच झाली.घरात तरूण ननंद व समाधानच सतत सगुणा सगुणा करणं तीला चुकीच वाटतं असे ती कधी कधी दुर्लक्ष करीत पण आजेसासु म्हणत,"अगं तु लग्नाची बायको गं..नको कंटाळूस,असतो एक एकाचा स्वभाव, तुला माहेरची सवय तुझा भाऊ नसेल ना?असा..समाधानाचा स्वभाव माहित आहे आम्हाला नको अशी दुर्लक्ष करूस...नात्यात दुरावा येतो गं ".


खरतर समजून घेणारी माणस असल्याने तीला जरा हायसे वाटे .सर्व परिवार छान होता पण नवरा जरा वेगळाच आचार विचार सारंच जरा वेगळं...त्याच वेगळेपण हिच सगुणा ची चिंता होती.कुठेही सोबत असणं,थोडही नजरेसमोरून दुर न करणं असा समाधानचा स्वभाव...तस खुपच प्रेम होतं त्याचं सगुणा वर, चिंताही तीतकीच पण तीने त्याला सोडून जाऊ नये असंच त्याला वाटतं असे...


लग्न होऊन सहा महिने झालेत.नवी नवरी मग सारे सण सासरीच त्यामुळे तीच माहेरपण नव्हतं.आता पहिलाच दिवाळसण आला होता.सगुणाला दिवाळीला तरी माहेरी जायला मिळेल ह्या आशेने ती आनंदी होती.सासूबाई म्हणाल्या,"सगुणा तु समाधानला सांग बाई दिवाळीला तरी जाऊ दे माहेरी म्हणून,माझं तर काय ऐकत नाही तो...तेवढाच तुला विसावा गं."


सासूबाईच ऐकून सगुणा ने समाधानला सांगायचं ठरवलं पण झालं वेगळंच..

"तु माहेरी जाशिल तर तिकडेच रहा, पुन्हा यायचं नाही.."

हे त्याचं वाक्य होतं..

त्यांच्या बोलण्याने घरातले सगळेच रागावले त्याला पण सगुणा ने सतत सोबत रहावं हाच हट्टीपणा किंवा विकृती होती त्याची.‌‌तीला कळतंच नव्हतं तो माहेरी का?जाऊ देत नाही ते तसं कारणही काही नव्हतं... फक्त अतीप्रेमाचा बडगा होता त्याच्यावर...

सासुबाई म्हणाल्या,"अरे माहेरपण हे मुलीच हक्काचं असतं रे.. तु तीला कसं ?आडवू शकतो.माहेर शेवटी माहेर ना?"


"अगं आई पण तीला येथे काय?कमी आहे ,भेटत ना? सगळं येथे"

"अरे माहेरची सर नसते रे दादा त्याला नको हट्टीपणा करूस असा,का?काही राग आहे का?तुझा तीच्या घरच्यांसोबत "


"नाही गं. पण मला नाही वाटत आता तीने माहेरी जावं ,बसं,आता हा विषय नको म्हणजे नको..".


आता सगळ्यांचाच नाईलाज होता.दिवाळी जवळ आली तशी तयारी सुरू झाली.समाधानच मन बदलेल ह्या आशेने सगुणा होती.आनंद मनात होताच..बघता बघता दिवाळीचा पहिला दिवस उजाडला..वासुबारसेच्या दिवशी दादा दिवाळसण घेऊन मु-हाळी आला...सगुणाचा आनंद गगनात मावत नव्हता...दादाला बघून समाधान पाठवेल असंच तीला व घरच्यांना वाटतं होतं...बोलता बोलता सासूबाई बोलल्याच,"बरं झालं तुम्ही आलात सगुणाला तुमची खुप आठवण येते...जरा चार दिवस माहेरी आली तर तीच्या मनाची घालमेल थांबेल बघा..."


पण समाधानने आईला तो काय?बोलला यांची आठवण करून दिली...आई शांतच बसली...सगुणाला काही कळतं नव्हतं इच्छा होती.पण नव-याच मन दुखवायचं नाही असं आईने व सा-या नातलगांनी सांगितले होते..तसा तो तिची काळजी ही घेत होता...ती दादाला म्हणाली,"दादा अरे मला यायचं रे ,पण ह्यांचा स्वभाव जरा वेगळाच बघं,मला तुमच्याकडे येऊच देत नाही, म्हणतात माहेरी जाण्याच सोडून बाकी काही माग पण तो विषय नको...मला समजतच नाही रे काय करू .‌‌"


दादाने सगुणाला समज दिली,"हे बघ ताई तुला सारं आहे ना? आम्ही येत जाऊ भेटायला, अगं आपली परिस्थिती नसेल आवडत त्यांना,जाऊ दे , अगं आपलं नातं इतकं पटकन तुटणार नाही मी समजवतो आईबाबांना.. आम्ही येत जाऊ भेटायला,सासरची माणसं चांगली आहेत ना?मग रहा आनंदी, आनंदाने संसार कर.."


" दादा..सारं वैभव आहे रे.पण मन पाहिजे तसं नाही ना?वागत... तिरस्कार वाटतो ह्यांचा,मन सतत माहेरी रूंजी घालत रे...काय ?करू मी ,माझी चिडचिड होते,यांचा राग येतो..".


"ताई.. अगं ब-याच बायकांना माहेर नसतं,जाऊ दे ना?पण वाद नको घालूस सोन्यासारखा संसार आहे, होईल सार ठिक बघं...ते घर तुझं आहे कधीच तुटणार नाही ते तुला जेव्हा पाठवतील तेव्हा आम्ही स्वागताला असू बघं..."


दादाच समजावणं व आईबाबांनी घातलेल्या समजूतीने ती जरा शांतच झाली.पण तीच्यातली ती अवखळ स्ञी हरवू लागली होती सगुणा शांत शांत राहू लागली होती... आता समाधानचा तिला तिरस्कार वाटू लागला होता.ती फक्त नवरा आहे बसं तेवढीच त्याला जुळली होती पण मनाने लांब जाऊ लागली होती...माझी मानसं ह्यांच्या मुळेच दुर होत आहेत असाच गैरसमज तीने करून घेतला होता..


मनात अढी आल्याने नात्यामध्ये प्रेमाचा ओलावा कमी होत होता..पण समाधानच सगुणा वर जीवापाड प्रेम होतं.तो तीला काहीच कमी पडू देत नव्हता.तरीही ती अस्वस्थ रहात होती...मनाने बरिच खचली होती ती...पण घरातील माणसांच्या जिव्हाळ्याने ती थोडीफार संसारात रमत होती..

सारं होतं तीच्याकडे एक चांगला परिवार,सधनता पण मन का? बेचैन असे तीचं तिलाच कळत नव्हतं.. तीच्या स्वाभिमानात जरा वेगळेपण जाणवू लागल होतं...


(सगुणाच पुढे काय होतं जाणून घेऊ पुढील भागात)



क्रमशः







ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Vaishali Deore

Housewife

मी कोणी महान लेखिका नाही...शब्दांना थोडासा साज देण्याचा प्रयत्न बस

//