चार दिवसांच माहेरपण हवंच..!भाग-२

स्ञीला माहेरपण नाविन्य बहाल करत..

माहेरचे आंगण सोडून सगुणा सासरच्या अंगणात आली.. तीच्या स्वागताला सारं गाव होतं... फुलांच्या राशी सजल्या होत्या.आनंदी चेहऱ्याने सासूबाईंनी सगुणा चे औक्षण केलं... माहेरच्या घरापेक्षा सासरची भलीमोठी हवेली बघून सगुणा हरवून गेली...पण ह्या भल्यामोठ्या हवेली सोबत तीच्या खांद्यावर तेवढीच जबाबदारी पडणार म्हणून ती आनभिन्न होती...


औक्षण करत सासूबाई म्हणाल्या,"ये पोरी लक्ष्मीच्या पावलांनी घरात, आता हेच तुझं घर व हेच तुझं विश्व...".


समाधानाने हात पुढे करत सगुणाचा हात धरला ..सगुणाला जरा हिम्मत आली जिवन साथीच्या साथीने तीच्या मनातली भिती कमी झाली... हळूहळू प्रथेनुसार एक एक रसम सुरू झाली... थोरामोठ्यांचे आशिर्वाद घेत दोघांनीही विधिवत सारं पुर्ण केलं...तोच आजेसासूंनी सगुणाला आवाज दिला..


"नविन सुनबाई.. जरा इकडे ये गं...".

सगुणा त्यांच्याकडे गेली... डोक्यावर हात फिरवत त्यांनी सगुणा च्या हातात एक पितळी डब्बा ठेवला...


"आजपासून हे तुझं ..हा पाटलांचा मान ,बाण शान आहे,हे जापायचं तुला..पोरी तुला एक सांगायचं जीवनात संकट येतील पण तु आता पाटलांची मोठी सून आहेस . तुला ह्या संकटांचा सामना करत हे घर व घराची इब्रत सांभाळायची आहे बरं...सुमन आपल्या घराण्याची रितभात ह्या सूनेला समजवून सांग बाई....."


हातात हात धरत आजेसासू म्हणाल्या,"जमेल ना ?पोरी तुला?"

सगुणा ने फक्त मानेने होकार दिला...आजेसासूंची कळी खुलली...


तोच सासूबाई म्हणाल्या,"सगुणा आता दोन दिवस तु नवरी ..जरा घरातल्या रितीभाती समजून घे,जरा घरात रूळली कि मग मी जबाबदाऱ्या टाकेल तुझ्यावर...".


नंदेसासू म्हणाल्या,"हो गं वहिनी लगेच नको गं पोरीला अटकवूस ह्या रितीभातीत,सगुणा जरा रूळली कि सांगेल गं आई वहिनी तिला समजवून जरा नविन नवरीची हळद तर उतरू दे...!"


सगळ्यांनी होकार देत सगुणाला जरासा धीर दिला.दोन दिवसांचा पुजा विधीचा सोपस्कार झाला व माहेरच्या पाठवणीचा दिवस आला .पण पाटलांच्या घरातील वातावरण, येथिल प्रथा, परंपरांचे आताच सगुणाला ओझे जाणवू लागले...सतत डोक्यावर पदर , चारचौघात वावरतांना ठेवायचं भान,व मर्यादा ह्यांची तीला दोन दिवसांतच भिती जाणवू लागली...माहेरी असं काही नव्हतं..


वहिणी लग्न करून आली .सगुणा व वहिनी दोघींनाही माहेरी कधीच वेगळं बघितलं गेलं नव्हतं...स्ञी व पुरूष हा भेदभाव किंवा वेगळेपणा तीने माहेरी कधी बघितला नव्हता पण येथे सासरी ... पुरूष मंडळींना विचारांपेक्षा जास्त महत्व होत...पुरूषांचे जेवण आधी ,त्यांच्याच ताटात बायकोने जेवायचं.. पुरूषप्रधान होतं सासर...सास-यांसमोर सासूबाई एकही शब्द बोलत नव्हत्या.... माहेरी कोणतीही गोष्ट आई व वहिनीला विचारल्याशिवाय घेतला जात नव्हता हि दोन्ही घरांची तफावत होती....ती तिला ह्या दोन दिवसांत बघताच जाणवत होती...लाडकी ,मुक्तपणे , स्वातंञ्यात वाढलेली सगुणाला आता येथे जुळवून घेणे वाटतं तेवढं सोपं नव्हतं...पण ह्या उंबरा ओलांडतांना  तीने तीचं सर्वस्व देण्याचं वचन दिलेल होतं...

(सगुणाच्या जीवन काय?घडत बघू पुढच्या भागात...

क्रमशः 

🎭 Series Post

View all