Login

तुझ्याच आयुष्याची वाटेकरी व्हायचे आहे

त्यांच्या कॉलेजमध्ये गॅदरींगचे वारे वाहू लागले होते. विजयच्या ग्रुपच शेवटच वर्ष असल्याने त्यांनी डान्स मध्ये भाग घेण्याचे ठरवले होते.

ही गोष्ट आहे मैत्रीची. मैत्री ने सजविलेल्या प्रेमाची. 

ठाणे शहरातील एक नामांकीत कॉलेज होते. 

त्याच कॉलेजमध्ये विजय, राहुल, संदेश, महेश, आरती, सोनाली यांचा ग्रुप होता. विज्ञान शाखेत शिकत होते. सायली आणि आराध्या ही त्यांच्याच वर्गात शिकत होते.

विजय आणि त्यांचा ग्रुपच शेवटच वर्ष होत. अशाच कॉलेजमध्ये गॅदरींगचे वारे वाहू लागले होते. 

“ईयु, ह्याला कशाला घेतल डान्स मध्ये?” सायली त्याच्या कडे बघत आरतीला सांगत होती.

“मॅडमनी सांगीतलय सगळ्यांनी भाग घ्यायचा ते, म्हणून” आरती.

“पण तो जाड्या आहे न, तो नाचला तर स्टेज नाही तुटणार??” सायली हसत बोलली. तस आरती ने तिला डोळे वटारले.

“त्याच्यामुळे आपल्या नोट्स पुर्ण होतात, आपल्या अभ्यासात ल्या अडचणी दूर होतात, त्याला जर कळल तु अशी बोलली तर तो करेल का मदत?? आणि अस कोणालाही शरीरावरून बोलु नये” आरती रागात बोलली.

“का ग? तो तुला आवडायला लागला का काय?” सायली आरतीला चिडवते.

आरतीने सायलीच्या पाठीत धपाटा घातला, “काहीही काय बोलते ग?” तशा दोघी हसायला लागतात.

त्यांच्या कॉलेजची गॅदरींग होती. त्यांच्या शिक्षकांनी सर्वांना त्यांच शेवटच वर्ष म्हणून भाग घ्यायला कंपल्सरी केल होत.

ती सायली. रंगाने गोरी, मध्यम उंचीची. कोणालाही बघताक्षणी आवडेल अशी. श्रीमंतीत वाढलेली. बिघडलेली नाही, पण लाडावलेली. त्यामुळे थोडा डोमीनेटींग वागण होत तीच.

तो, “विजय” त्यांच्या वर्गातला सर्वात हुशार विद्यार्थी. सगळ्यांना मदत करायला तत्पर. फक्त शरीराने जाड होता. तेवढ सोडल तर एक माणूस म्हणून खुप चांगला होता. पुर्ण कॉलेजमध्ये त्याची शांत, सुस्वभावी अशी ओळख होती.

“ऐका न, तुम्हाला स्टेज ची काळजी आहे की नाही, कशाला मला घेताय” विजय त्याच्या मित्रांना सांगत होता. तसे सगळे हसायला लागले.

“ते मॅडम ला सांग मग” संदेश

“शेवटच वर्ष आहे राव, चला न करूया डान्स” सोनाली.

“बघुया” विजय.

“बघुया नाही, उद्या माझ्या घरच्या हॉलवर सर्वांनी यायच” संदेश.

सर्व घरी निघुन गेले.

संदेशाच्या घरच्या हॉलवर.

“कोणत गाण निवडायच रे?” महेश

“कोणतेही निवडा, फक्त मला झेंडा धरायला भेटेल एवढ बघा” विजय हसायला लागला.

“गप रे तु, नाही तुला नाचवल न, तर माझ नाव संदेश नाही” संदेश

“चला रे आपल्याला बारशाची पार्टी भेटणार आहे” विजय

“कोणाच बारस?” महेश

“ह्या मुलाच, हा मला नाचवणार आहे म्हणे” विजय, तसे सर्व हसायला लागतात.

“कसा आहे हा?” सायली मनातच विचार करते.

“काय ग कुठे हरवली?” आरती सायली ला विचारत होती.

“हा शांत आहे न?” सायली.

विजयची खुप बडबड चालु होती. वर्गात एकदम शांत आणि आता असा बघुन सायली ला प्रश्न पडला.

“हा आणि शांत? राहुल हॉलमध्ये येत बोलला, “तो कसा आहे न कळेल आता तुम्हाला” राहुल गुढ हसत बोलला.

सायली आरतीकडे बघत राहीली. आरतीने हो मध्ये मान हलवली.

“गाण सांगा रे पटापट” महेश

“धुम मचाले?” सायली

“त्यात झेंडा नाहीये न, मी काय धरणार मग?” विजय महेशला टाळी मारत. तस सायली ने तोंड वाकड केल.

“कोळीगीत?” आरती

“कोळीगीत ४ ते ५ झाले आहेत त्यापैकी फक्त २ सिलेक्ट होणार आहेत.” संदेश

“ब्रेक डान्स करूया? इंग्रजी गाण्यावर? राहुल

“ऐका न, कशाला मला डान्स वर अत्याचार करायला सांगत आहात, बिचारा तो ब्रेक डान्स मला शिव्या घालायचा” विजय

प्रत्येक गाण्यात राहून काही खोट निघायची. गाणच सिलेक्ट होत नव्हत, दुपार होत आली होती. संदेश ने जेवणाची साय केली होती. सर्वानी जेवण केले आणि जरा पसरले विचार करत. कारण सर्वांना जमेल असे गाण आणि डान्स बसवायचा होता.

गालावर हसणारी

ती गोड खळी,

रंगाने तिला

बांधत नाही कोणी??

काम आहे तिच

फक्त दिसण,

तरी मनाला मोहून जात

तिच ते सुंदर रूपड…

~ महेश ~

विजयने सोनालीच्या गालावर पडणाऱ्या खळी वर बोट फिरवत चारोळी म्हटली. तशी सोनाली लाजली. सगळयांनी मस्त दाद दिली. सायली तर शॉक होउन बघत राहीली.

सायली फक्त डान्स च्या निमित्ताने त्यांच्या ग्रुप मध्ये आली असल्याने विजयची माहीती नव्हती जास्त.

“ह्याच आणि सोनालीच च काही आहे?” सायली ने आरतीला हळुच विचारले.

“तु काय फक्त जोड्या लावायला आली आहेस का?? तस नाहीये काही, त्याची सवय आहे कोणावरही चारोळ्या, शायरी म्हणायचा” आरती

“हा लिहीतो पण?” सायली

“हो खुप छान लिहीतो” आरती विजय कडे बघत बोलली.

“खरच तुला आवडतो का काय?” सायली आरतीला हाताचा कोपरा मारत बोलली.

“चांगला मुलगा आहे ग तो, जिच्या पण आयुष्यात असेल खुप लकी असेल” आरती.

“हममम मग तुच जा न” सायली आरतीची मस्करी करत.

तशी आरती सायली ला मारायला धावली. दोघांचीही मस्ती सुरू झाली. दोघींची मस्ती चालु असताना दोघांचीही केस सुटली. सायली ची केस जरा मोठी आणि भरीव होती. तर आरतीचे बारीक होते.

“ह्या बघा देव्या आल्या डान्स साठी” विजय

“देव्या?” महेश

“हा अंगात देवी आल की अशाच दिसतात न त्या” बोलत विजय हसायला लागला.

आरती आणि सायली नी एकमेकांकडे पाहील, आणि विजयच्या मागे पळायला लागल्या त्याला मारायला.

थोड पळल्यावर विजय थांबला, आणि येणाऱ्या आरतीचा डायरेक्ट हात घुडघ्यावर बसत पकडला. आरती थांबली

“वो सजा भी बहोत खुबसुरत होगी

जो आपके दिल से आयी होगी,

आपकी सजा भी हमको मंजुर होगी

दोस्ती का हक अगर वो जता रही होगी…”

आरती लाजली. सगळ्यांनी टाळया वाजवल्या. आरतीने येउन विजय चे गाल जोरात ओढले, “तेरी सजा”

सायलीला आता खडूस वाटणारा विजय वेगळा वाटायला लागला होता.

“ते सावरखेड एक गाव मुव्ही मधला गोंधळ घ्यायचा?” संदेशला देवी शब्दावरून त्याला आठवल होत.

“हा त्यात झेंडा आहे पकडु शकतो मी” विजय

“मी त्याच झेंड्यात तुला बांधेल ह” राहुल रागात.

“रुठा न करो यार

दिल रुक सा जाता है” विजय छातीवर हात ठेवत बोलला.

“नौटंकी” राहुल

“चला रे, गाण फिक्स झाल, आता ड्रेस ठरवुया” महेश

मग सर्वांनी मिळून चांगल्या क्वालिटी असलेल ते गाण शोधल, त्याला अनुरूप ड्रेस ठरवले. आजचा पुर्ण दिवस त्यांचा यातच गेला.

दुस-या दिवशी सगळा ग्रुप त्यांच्या मॅडमना जाउन भेटला. ते करत असलेले गाण, आणि ड्रेस त्यांच्या कानावर घातल.

सायली ने पाहील, विजय एकदम शांत होता मॅडम समोर. इतके दिवस कधी लक्ष दिल नव्हत तिने, आज ति विजयला निरखून पहात होती.

“काय त्याला खायचा विचार आहे का?” आरती

सायली भानावर आली. “असा कसा डबल ढोलकी, ग्रुप मध्ये वेगळा आणि शिक्षकांसमोर वेगळा?”

“डबल ढोलकी नाही, त्याच्या मर्यादा पाळतो तो, प्रत्येकाच्या वयाचा मान राखतो, म्हणून तर कॉलेजमध्ये आवडता आहे सर्वांचा” आरती.

“तुला पण का?” सायलीला आता त्याच्याबद्दल जिज्ञासा निर्माण झाली.

“तुला त्याच्या खुप चौकश्या आहेत अस नाही वाटत?” आरती सायली कडे रोखुन बघत.

“ते पहिल्यांदाच असा मुलगा पाहीला न, म्हणून बाकी काही नाही.” सायली.

त्यांचा ग्रुप वर्गाकडे लेक्चर साठी चालला होता. सायलीच्या मागे विजय येत होता. विजयने सायली चे मोकळे सोडलेले केस पाहीले. त्याने तिचे उडणारे केस हलकेच पकडले

“या भुरभुरणा-या केसांना

वारा जसा छेडतो,

त्या उडणा-या केसांत जीवही

तितकाच गुंततो…”

सायली पहीले चिडली की कोणी तिच्या केसांना ओढल, पण जशी विजयची चारोळी ऐकली, तिची हर्ट बिट स्कीप झाली.

दोन क्षण तर तिला कळलच नाही काय झाल. विजय जाउन जागेवर बसला, सायली तरी तिथेच थीजली होती तिच्या केसांना पकडुन.

तेवढ्यात त्यांचे सर आले, सायलीला अस मध्येच उभ पाहुन त्यांनी विचारले, “काय ग बरी आहेस न, अशी का उभी आहेस, जा बस जागेवर”

तशी सायली भानावर येत जागेवर जाउन बसली.

“तिच्या केसांना आज चारोळीचा चटका बसलाय” महेश

तक सरांनी विजय कडे पाहील. विजयने फक्त खांदे उडवले.

“वर्गात आहेस याच तरी भान ठेव” सरांनी विजयला प्रेमाने दटावले. आणि त्यांच्या लेक्चरला सुरवात झाली. इकडे सायली मात्र अजूनही अस्वस्थ होती. आज तिच लक्षच लागत नव्हत लेक्चर मध्ये. कोणीतरी आज तिच्यावर पहील्यांदा चारोळी केली होती. दुसर कोणी असत तर कानाखाली वाजवली असती तीने, तिच्या केसांना कोणी हात लावलेला तिला आवडत नसे. पण ती का चिडली नाही याचाच विचार करत होती. शब्दांमध्ये इतकी ताकत असते तिला आज जाणवल होत. जस लेक्चर संपल, तशी सायली ची मैत्रीण तिच्या जवळ आली.

“काय ग, त्या दिवशी त्या राकेश ने केस पकडली तर त्याचा गाल लाल केलास, आणि आज विजयने पकडली तरी काहीच बोलली नाहीस? सायली ची मैत्रीण आराध्या.

“ते सर आले होते म्हणून” सायली ने काहीतरी सांगायच म्हणून सांगितले.

कॉलेज सुटल्यावर सगळे डान्स प्रॅक्टिस साठी संदेशाच्या हॉलवर गेले. सगळ्यांनी पहीले पुर्ण गाण निट ऐकुन घेतल. त्यानुसार स्टेप्स बसवणार होते. त्यांच्यासाठी मॅडमनी एक कोरिओग्राफर पण पाठवला होता. सगळयांच्या जोड्या करण्यात आल्या. विजय आरती सोबत, महेश सोनाली सोबत, सायली राहुल सोबत, तर संदेशच्या सोबतीला आराध्या होती.

पहील्यांदा सर्वांना एका लाईन मध्ये उभे केले होते. सायलीच्या मागे विजय आला आणि त्याच्या मागे आरती होती. कोरिओग्राफर स्टेप्स बघत होता. पण एवढा वेळ शांत बसेस तो विजय कसला.

“दादा ऐक ना, मला झेंडा दे पकडायला, एखाद्याच्या पायावर पाय पडला तर मलाच भांडातील” विजय मस्करीत बोलुन गेला.

तशी आरतीने त्याची कॉलर पकडली, तुला सांगीतल न इथे थांबायला तर गुपचुप थांब”

आरतीचा अवतार बघुन विजय गुपचुप उभा राहीला. त्याने पुढे सायलीला पाहील तिने केस बांधली होती. विजयने तिची काही केस पकडुन पुढे टाकली,

“तुझी केस यार नाकात जातात” विजय. तस सायली ने मागे वळून पाहिले आणि केस पुढे घेतली.

कोरिओग्राफरला वेळ लागतोय बघत विजय ने त्यानी डान्स साठी ठरवलेल गाण म्हणायला सुरवात केली. त्याचा आवाज चांगला होता. सुरांच ज्ञान होत. त्याचा गोड आवाज एकुन सायली त्याच्या आवाजात हरवली.

नंतर मात्र खट्याळ होत

“चुरा के दिल मेरा गोरीयां चली” गाण म्हणत विजयने आरतीला धक्का मारला. तशी आरतीने त्याच्या पाटील धपाटा घातला. तसे सगळे हसायला लागले.

“अरे विजा, डान्स साठी आलोय, गाण्यासाठी नाही” राहुल

“पण हा चोरीओग्राफर बघ न किती वेळ घेतोय” विजय

“चोरीओग्राफर?” महेश

“इंग्लिशमध्ये कोरिओग्राफर ची स्पेलिंग कशाने सुरू होते?” संदेश

तेव्हा बाकी बाकीच्यांची ट्युब पेटली. सगळे परत हसायला लागले.

सायलीला तसच उभ बघुन आराध्या ने सायलीला हलवल, “कुठे हरवल्या मॅडम?”

“छान आवाज आहे याचा” सायली

“बोलली न तोच गोड आहे न, मग आवाज तर असणारच न” आरती.

“हो ग आज मी पण पहील्यांदा एकतेय” आराध्या. “पण गाण होउन त्यावर २ जोक्स झाले, तुला आता आठवतय?”

सायली “हा काय? आणि तुला काय ग माहीत तो गोड आहे? चाखुन पाहीलस की काय त्याला?” सायली ने आरतीला चिडवल. तशी आरती तिला मारायला तिच्या मागे पळते. सायली मागे बघत असते, आणि ती विजय वर जाउन धडकते. ती पडणार तेवढ्यात विजयने तिचा हात पकडला.

“एसे सितम न करो

हम गरीबों पर,

इन आँखो की कैद का जुर्माना

हम भर नही पायेंगे……” विजय ने नेहमीच्या शैलीत शायरी केली.

सायली ने विजयच्या डोळ्यात पाहील, आत्मविश्वासाने भरलेली ती नजर पाहुन ती त्यात हरवत चालली होती.

“त्याला बघुन झाल असेल तर करूया डान्स?” आराध्या.

सायली पटकन तिच्या जागेवर जाते.

कोरिओग्राफर कधीचा फोनमध्येच होता. ते पाहून संदेश चिडला.

“हे बघ इथे तुला डान्स बसवायला बोलावले आहे फोनवर बोलायला नाही” संदेश

“हा न, थांब न जरा” तो पण तो-यातच बोलला.

राहुलला त्याच्या तोंडातुन दारुचा वास आला.

“तु दारू पिऊन आला आहेस?” राहुल

“त्या याच्याशी तुम्हाला काय?” कोरिओग्राफर

क्रमश:


🎭 Series Post

View all