Sep 30, 2020
नारीवादी

मला माझी किंमत कळली आहे

Read Later
मला माझी किंमत कळली आहे

नीता च्या लग्नाला ६ महिने होत आले  होते. पण ती म्हणावी तशी सुखी नव्हती.  नीतीचे  बालपण, शिक्षण सगळे गावाकडे झाले होते. गावी एका छोट्या पतसंस्थेत ती काम करत होती. तिला खरं  तर  शहरात जॉब करायचा होता पण घरचे म्हणत कि लग्न झाले कि कर शहरात नोकरी.  अमोल चे स्थळ नीताला सांगून आले होते . अमोल शहरात नोकरी करत होता आणि आई बाबा पण त्याच्याबरोबर शहरात राहत होते. अमोल ला जॉब करणारी मुलगी हवी होती तर त्याच्या आईला घरकाम करणारी.  मुलाच्या हट्टापोटी त्या नोकरी करणाऱ्या मुलीशी लग्न लावून द्यायला तयार झाल्या पण त्यांनी सांगितलं मुलगी मीच पसंत करणार. त्यांच्या  डोक्यात असं  होत कि जर आपण शहरातील मुलगी केली तर ती घरकाम करणार नाही म्हणून आपण गावातील मुलगी बघू जी नोकरी पण करेल आणि घरकाम हि. म्हणूनच त्यांनी नीता ला पसंत केले होते. नीता हि तयार होती लग्न झाल्यावर नोकरी करायला.

 बघता  बघता १५ दिवसात लग्न झाले. नीता नवीन घरी आली.  ती जशी आली   तस  दुसऱ्या दिवशी पासून सासू बाईनी  सगळ्यातुन काडता  पाय घेतला.  सगळं तिच्या वर  टाकून आपण निवांत बसायच्या. तरीही  तिने समजावून घेतले कि इतके वर्ष त्या काम करतात, त्यांना थोडी विश्रांती हवी म्हणून तिने दुर्लक्ष केले आणि सगळी काम मनापासून करू लागली.  अमोल आणि नीता चे पण पटत असे. पण नेहमी बोलताना त्याच्या तोंडी  सतत तिच्या नोकरीच विषय येई. कधी करणार असे सतत विचारी.  नव्या घरी अजून रुळली न्हवती कि हे सारखाच चालू झालं त्याच.   तीने  हि नवीन नोकरी बघायला चालू केली.  पण व्हायचं असं कि तिचा गावाकडील अनुभवाला शहरात कोणी ग्राह्य धरेंना .  तिला नोकरी मिलाळायला अडचण येऊ लागली.  ७-८ ठिकाणी मुलाखत देऊनही तिला नोकरी मिळत न्हवती.
     हे जस कळू लागलं तसं  अमोल चे वागणे बदलू लागले. अधून मधून भांडण करू लागला. आपण काहीच नाही आहोत असे तिला वाटू लागले.आता तर सासू सासरे हि तिला यावरून बोलू लागले.
          एकदा सगळे एकत्र असताना तिचे सासरे म्हणाले ," अमोल ऐकल्यास का , माझ्या मित्राच्या मुलाचं लग्न ठरलं, मुलगी शहरातच नोकरी  करते. नशीब काढलं  पोराने. दुभती गायचं मिळाली जणू त्याला." हे ऐकून तिला खूप वाईट वाटले.  सासू बाई ज्या कधी स्वतः घराबाहेर पडून एकटीने साधी भाजी आणायलाही गेल्या न्हवत्या त्याही तिला बोलू लागल्या. काय उपयोग नाही या पोरीचा .  शिक्षण घेऊन काय उपयोग तुझा ग. असे सतत टोचून बोलणे चालू होते.  कोणाशी मनमोकळे बोलावं असे जवळ कोणी  नसल्याने ती अजून निराशेत जात होती. एक एकदा तर तिला खूप चीड येई पण  उलट बोलायची हिम्मत होत नसे म्हणून गप्प बसे. रात्र  रात्र रडून काढी .अशा  सारख्या स्ट्रेस  मुळे  तिला थायरॉईड झाला हे तिला कळले हि नाही. तिचे अचानक वजन वाढू लागले. आता सासू सासरे त्याच्या वरून बोलू लागले . असाच वजन वाढत राहिला तर पूढे  मूल बाळ करताना प्रॉब्लेम होईल .नवरा  ही तिला तिच्या वजन वरून बोलत असे.  नोकरी तर करत नाहीस शिवाय हे वजन वाढवून काय अवस्था केली आहेस स्वतःची बघ जरा आरशात.  

एके दिवशी अमोल ची ऑफिस मधे  पार्टी होती म्हणून  नीता हि तयार झाली होती पण अमोल तिला बघून म्हणाला वेडी आहेस का ? तुला घेऊन मी जाणार नाही.  स्वतः ला आरशात बघ. तुला घेऊन गेलो तर माझी काय इमेज  राहील.. हसतील मला.  असे म्हणून त्याने तिला घेऊन जाणे टाळले. आता तर सासू सासरे हि तिला कोणत्या कार्यक्रमाला  बाहेर घेऊन जात नसत . तू थांब घरी म्हणून  सांगत.  तिला प्रचंड त्रास होईल या सगळ्याच.  
             एकांतात ती विचार करे मी इतकं सगळं करते या घरासाठी पण माझी किंमत कुणालाच नाही. सासू बाई दिवसभर अराम करतात, मी सगळं बघते पण एकदाही त्या म्हणत नाहीत कि तू सगळं करतेस त्यामुळे मला अराम मिळतो. सासऱ्यांच्या  आवडीचे सगळे जेवण, चहा ,पाणी सगळं वेळेवर हातात देते तरी त्याच्या तोंडून  सुद्धा एकही चांगला शब्द बाहेर पडत नाही. यांच्या बद्दल तर काय बोलावं यांच्यावर विश्वास ठेवून मी इथे आले ,त्यांच्या आई बाबांची मी इतकी काळजी घेते ते माझ्याशी कसेही वागत असले तरी पण कोणी माझ्याशी आपुलकीने बोलत सुद्धा नाही.  असेच दिवस जात होते. सतत हे ऐकून तिचा आत्मविशास  निघून गेला होता.
          एक दिवस तिच्या शाळेतील मैत्रिणीचा फोने आला. आपण भेटूया म्हणाली. घराचं सगळं आवरून  हि ५ वाजता  मैत्रिणीला भेटायला गेली.  खुप दिवसांनी कोणी जवळच बघताच  ती तिच्या गाळापाडून  रडू लागली.

तशी रूपा म्हणाली, '   वेडाबाई काय झालं रडायला. "

 नीता- काय नाही ग. खूप दिवसांनी बघितलं ना म्हणून भरून आले.

रूपा- बर  सांगा मॅडम कास चालू आहे आयुष्य ? रूळलीस का सासरी? कसे आहेत लोक?

नीता- (हिला आता काय सांगू माझं रडगाणं  म्ह्णून ती म्हणाली) आहे ग सगळे चांगले आहेत.  खूप माया करतात.

रुपाला जाणवत होते ती जे बोलत आहे ते तिच्या डोळ्यात दिसत नाही आहे.

रूपा- खरच  का? तुझे डोळे काही वेगळाच सांगत आहेत.

नीता-  ग खरच .

असे म्हणून तिने नजर फिरवली.  आता रुपाला शंका येऊ लागली. ती नीताला म्हणाली जर आपली मैत्री खरी तर तू मला सांगशील . नाहीतर मी चालले.
जवळच माणूस आत्ता कुठे भेटला आणि  जात आहे बघून नीता  म्हणाली सांगते.  पण थांब,जाऊ नकोस . आज कोण तर आपुलकीने बोलणारे बघत आहे.

नीता- सासरचे  माझ्याशी विचित्र वागतात. त्यांना मी फक्त एक घरकाम करणारी आणि नोकरी कमावून  आणणारी मशीन वाटते.  मी इथे नोकरी शोधयच खूप प्रयत्न केला पण मला इथे नोकरी मिळना  हे कळातच माझी घरात काडीचीही किंमत नाही राहिली आहे.  सतत मला नोकरी आणि आता हे वाढलेलं  वजन या वरून  घालून पाढून  बोलतात. माझं म्हणावं असं तिथे कोणीच नाही आहे.   काय कारु कळत  नाही.
मी इतके करते घरासाठी पण कोणी माझ कौतुक राहूदे, साधं माझ्याशी आपुलकीने सुद्धा बोलत नाही.


रूपा- ग मग तू हे घरी का सांगत नाहीस.?

नीता- ग तुला माहिती ना घरी कस आहे सगळं . आई बाबाना त्रास होईल म्हणून मी गप्प आहे.

रूपा- नीता,  तुझी किंमत फक्त तुच  ठरवणार , ते कोण ठरवणारे .आणि  तुझं वजनच म्हणशील तर मला वाटत सतत स्ट्रेस घेऊन तुला थायरॉईड झाला असावा. तू एकदा टेस्ट करून बघ. आणि दुसरे म्हणजे  दररोज घरातून थोडावेळ  बाहेर पडत जा. सतत त्याच वातावरणात राहून  निराशेत गेली आहेस तू.. काय होतीस तू आधी आणि आता  कशी झाली आहेस. जरा मन दुसऱ्या गोष्टीत रमवं.

नीता- ग पण बाहेर काय म्हणून पडणार.  

रूपा- आज आलीस ना . तसेच फिरायला येत जा. आणि एक सांगू का? बघ म्हणजे मला आत्ताच सुचलं आहे

नीता- बोल

रूपा- माझी बहीण  इथेच राहते. तिच्या मुलाला गणित शिकवू शकतेस का तू? ती अशी घरी कोणी येऊन शिकवणारी शोधत आहे. तेव्हडाच तुझा वेळा जाईल. आणि गणितात तू किती हुशार आहेस हे काय मी सांगायची गरज नाही.

नीता- मी विचार करते यावर.

रूपा- कर विचार . पण सकारात्मकतेने  विचार कर.

नीता- हो

 नंतर दोघी निघून गेल्या. घरी येऊन नीता ने विचार केला  रूपा  बरोबर बोलत आहे . आज बाहेर जाऊन मला जरा फ्रेश वाटतंय. सतत याचा वातावरणात राहिली तर मी वेडी होईन.  दुसऱ्यादिवशी तिने रूपा ला फोन करून कळवले कि तयार आहे.

 दुपारी ५-६ क्लास ला जाते म्हणून सांगून जाऊ लागली.  सासूला काय तिची कामे झाल्याशी संबद्ध  त्यामुळे त्या काही फारसे विचारात बसल्या नाहीत.

आता तिला खरंच फरक जाणवू लागला. ती जरा फ्रेश  राहू लागली. सकारात्मक विचार करू लागली. रूपाची बहिणीने  एकदा बोलता बोलता तिला सुचवले कि तुम्ही  इतक्या हुशार आहात , बँकांच्या परीक्षा का देत नाही.  तिला पण पटले ते . तिला वाटले ,इतके दिवस आपण हा विचार का केला नाही.  खर तर ती हा विचार करू शकली असती पण ती इतक्या निराशेत  गेलेली कि आपल्या कडून काहीच होऊ शकत नाही असे तिला वाटू लागले होते. आणि हे सर्व घरातील वातावरणामुळे झाले होते.


  दिवसभर तिला घरकामातून वेळ मिळत नसे मग ती रात्री बसून अभ्यास करू लागली.  परीक्षेचा फॉर्म भरला.  आणि परीक्षेत पासही  झाली.  तिला त्याच ठिकाणी बँकेत कलार्क  नोकरी लागली.  हे जेव्हा घरी कळलं तस सगळ्याच वागणं बदललं.  खास करून नवऱ्याचं. आता तर काय हि बँकेत लागली मग तर आपण नक्कीच बिझनेस  करू शकू असे त्याला वाटू लागले. सासू सासरे पण तोंडदेखलं  गोड  बोलू लागले.


 पण आता तिच मन मानेना. इतके दिवस मीच म्हणत होते त्यांनी नीट वागावं म्हणून पण आता वागत आहेत तर मी खुश का नाही.  कारण त्याचा वागणं तोंडदेखलं होत. तिचे नोकरीचे येणारं पैसे बघून ते असं वागत होते. पण आता तिचे मन रमेना.  जर आपल्याला  समोर दिसत आहे कि आपल्याशी फक्त पैश्यासाठी  चांगलं वागत आहे तिथं तीच मन रमेना. या लोकांनी आपल्याला किती त्रास दिला हे ती विसरू शकत नव्हती. म्हणून तिने या घरातून बाहेर पडायचं निर्णय घेतला.  जाताना फक्त  म्हणाली., " अमोल, तुम्ही आणि तुमच्या आई वडिलांसाठी , या घरासाठी मी खूप केलं. पण त्यावेळी कमवत न्हवते म्हणून तुम्ही मला किंमत दिली नाही. आणि आज तुम्ही लोक फक्त पैशासाठी माझ्याशी चांगले वागत आहेत. मला तुमच्या बरोबर बाहेर घेऊन जायची तुम्हाला  लाज वाटायची. माझी या ७-८ महिन्यात काय अवस्था झाली होती हे कोणी बघितले नाही. पण मी कशातून गेली आहे हे फक्त मलाच माहिती.  म्हणून मी निर्णय घेतला आहे कि मी आता या घरात राहणार नाही. सुखी राहण्याचा अधिकार सगळ्यांना आहे   तसा  तो मलाही आहे म्हणून मी सोडून चालले हे सगळं. कारण मी माझी किंमत ओळखली आहे.  

आता स्वतःच्या वागणुकीची लाज वाटून घेण्यापलीकडे अमोल आणि त्याच्या आई बाबांकडे काहीच राहिले न्हवते. घरची लक्ष्मी  घराबाहेर पडली होती.