A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: fopen(/home/irablogging/public_html/system/cache/irablog_session6018e8d5182071d6e899c97f37907def0630932d159b0e449aaf474d6f30a8424d27e27e): failed to open stream: No space left on device

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 176

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: session_start(): Failed to read session data: user (path: /home/irablogging/public_html/system/cache)

Filename: Session/Session.php

Line Number: 143

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

I like the girl.. Part 2
Oct 27, 2020
स्पर्धा

पसंत आहे मुलगी.. भाग 2

Read Later
पसंत आहे मुलगी.. भाग 2

भाग २

 

हाय सिड.., अभिजित त्याला दूरूनच हात करत ओरडत आला..

हाय अभ्या,..आपला गृप पाहिलास का कुठे...?” सिध्दार्थ त्याच्या हातात हात मिळवत बोलला..

अरे मी पण आताच आलोय.. तो त्याच्यासोबत चालू लागला..

तेज्याला कॉल कर बरं.. अरे ही पोरं येऊन बसलेली असतात पण कुठे बसतात कळतच नाही... सिदने अभिला म्हटले..

हा... थांब हा करतो... पण काय रे सिद.. तू मुलगी पहायला गेलेला असं आलं आपल्या कानावर... खरंय का..अभि मधेच थांबला आणि त्याने सिदला विचारले..

तसा सिद जरा आनंदाने लाजलाच.. आणि बोल्ला.. हो रे भावा.. गेलेलो.. ..

क्या बात है.. तू खरं गेलेलास मुलगी पाहायला...

मगं काय खोटं खोटं पण जातात का...?” सिदने अभिच्या डोक्यात टपली मारली...

सिद... हाय... पार्किंगमधून रियाने आवाज दिला...

ओह हाय.. रिया.. माय डार्लिंग... ये पटकन.. तिथे पार्किंगमध्ये काय करतेस... सिद लगेच पार्किंगच्या दिशेने जात बोल्ला,,

अरे गाडी पार्क करता येत नाहीए.. प्लीज हेल्प मी...

वेट वेट.. आलोच... सिद पळत गेला...

अभि इथे विचार करत होता.. की मी जे ऐकलंय ते खरंय का...

काय तू पण रिया.. तुला गाडी पार्क करता येत नाही तर आणतेस कशाला...??” सिद मजेत म्हणाला आणि तिची गाडी पार्क करू लागला..

अरे.. असं काय रे.. मला जानूने गिफ्ट केलीय.. मग तर मी रोजच आणणार गाडी.., ती तिच्या जानूचं कौतूक करत बोल्ली..

धन्य तुझ्या जानूला.. तुला गाडी शिकवली पण पार्क करायला शिकवली नाही...

तू पण ना सिध्ध्या... तिने त्याच्या पाठीत जोरात धपाटा टाकला आणि दोघं परत अभिच्या दिशेने मैदानावर येऊ लागले..

ए.. कॉल मी ओन्ली सिड.... तो तिचा खांद्यावरचा हात काढत बोल्ला..

अरे तू सिद, सिद्या, सिध्दू.. सगळंच आहे आमचा.... चॉकलेट बॉय... आमचा... तिने परत त्याच्या खांद्यावर हात टाकला आणि हसली..

अगं हा चॉकलेट बॉय आता लग्न करतोय.. अभि म्हणाला..

काय...? सिद तू...?” असं म्हणून ती तोंडावर हात ठेवून हसू लागली...

सिद रागाने तिच्याकडे पाहू लागला... का... मी लग्न करावं नाही का... सत्तावीसचा झालोय मी आला... आता नाही लग्न करायचं तर म्हातारा झाल्यावर करू का...?” तो तिच्यावर रागावून बोल्ला..

अरे.. मला खरंच विश्वास बसत नाहीए... सॉरी.. असं बोलून ती परत हसू लागली...

हे बरंय.. तुम्ही चांगलं आपलं सेट झालाय.. आणि मी लग्न करतोय म्हटलं तर हसायचं.. तो म्हणाला..

ओय आम्ही कुठंय रे सेट..?” अभि त्याच्या खांद्यावर मारत म्हणाला..

अरे तुमचा शोना, बच्चा, जानू वगैरे तर आहे ना तुम्हाला..सिद तोंड वाकडं करून भूँवया उडवत बोल्ला..

अरे आमचं सोड.. कोण आहे ती सुंदरी जिच्याशी तुझं लग्न ठरलंय..रियाने कुतुहलाने विचारले..

ए.. ठरलं नाही अजून.. फक्त बघायचा कार्यक्रम झाला...सिध्दार्थ हळूच बोलला.

बघा.. साहेब पाहण्याचा कार्यक्रम पण करून आले.. पण आपल्याला आता कळतंय.. अभि तोंड वाकडं करत बोल्ला..

अरे.. त्या आईने अचानकच ठरवलं..

ओह.. अचानकच ठरवलं आणि तुला ती मुलगी आवडली पण... राईट...?? रिया हसत म्हणाली..

सिदने केसांमधून हात फिरवला आणि लाजला...

ओह माय गॉड... सिद तू लाजतो पण... ओह... रिया आणि अभि दोघं एकसोबतच ओरडले...

तसा सिद त्यांना बोलला, ए गप बसा रे..

अरे पडली रे पडली.. सिद भावाची विकेट पडली...पुन्हा ते दोघं तोंडातून इवव.. असा आवाज काढून ओरडू लागले...

आणि मैदानावरच्या सगळ्याच मुलांची त्यांच्यावर नजर पडली...

कुणाची, कसली विकेट पडली..?” असं बोलत संकेत आला...

कसली नाही रे संक्या.. सिद लाजतच बोल्ला...

अरे तुझा चेहरा एवढा गुलाबी काय झालाय..तो हसत त्याच्या खांद्यावर हात टाकत बोल्ला..

कुठं..? गुलाबी कसा झाला..?” सिदला जरा बिथरल्यासारखे झाले.. मोबाईलमध्ये पाहत तो बोल्ला..

सगळेजण त्याच्यावर हसू लागले..

ठरलं रे ठरलं आमच्या सिदचं लग्न ठरलं... आता तिघं जण सोबत ओरडू लागले..

अरे गप बसा.. लग्न ठरायचं आहे अजून....?”

मला सांग तुला पसंत आहे ना मुलगी.... संकेतने त्याला विचारले..

सिदने हो म्हणून मान हलवली...

अऱे मग ठरलंच की... कोणती मुलगी तुला नकार देऊ शकणार आहे का...? काय रे...? असं बोलून सगळेजण परत हसायला लागले.. आणि सिदला तर आपण हवेतच उडत आहोत असं वाटू लागलं...

भावा आता लवकर बॅचलर पार्टी देऊन टाक, हयात ला नाही तर ब्लू डायमंडला.... अभिने डोळा मारला...

हां.. ब्लू डायमंड आणि हयात... तोंड बघा माझं... असं बोलून सिद पार्कींगमधल्या गाडीवर बसला...

गप चटक मसाला मध्ये चला.., छान लिंबू, कांदा घातलेली भेळ चारतो... तो पण हसत बोल्ला...

भावा.. कधीतरी मनापासून पार्टी दे रे...

अरे संक्या तू लग्नात ये ना... तुझ्या वाटचे दोन गुलाबजाम जास्त काढून ठेवतो मी...

खूप चिंगू आहेस तू सिदू... रिया पण त्यांच्या मांडीवर मारत बोल्ली..

डिअर.., आपण गरिब माणसं.. तुमच्यासारखं एसीत राहणारे नाही...सिध्दार्थ म्हणाला.

गप रे.. एसीत राहा नाही तर पंख्यात... एक पार्टी द्यायला जमत नाही तुला... रिया म्हणाली.

सगळेजण हसू लागले...

बरं ठिक आहे... लग्न झाल्यावर तरी दे....संकेत म्हणाला.

हो देईल ना... घरी या सगळ्यांनी.. बायकोला चांगलं बोकडाचं मटणच करायला लावतो...

बरं बाबा ते तर ते... आम्हाला पण बघता येईल तुझी होणारी बायको नुसती नावाला बायको आहे की.. तुझी काळजी पण घेणारी... संकेत म्हणाला..

हो ना... असं म्हणतात.. बायकोला बाकी नाही पण जेवण नीट करता यायला पाहिजे...अभि.

कारण प्रेमाचा पहिला मार्ग हा पोटातून जातो... रिया म्हणाली..

हे तू सांगत आहेस... सगळेजण तिच्याकडे पाहून म्हटले आणि परत मोठमोठ्याने हसू लागले..

सिध्दार्थ त्यांच्या घोळक्यातून बाहेर आला आणि आशूचा तो निरागस चेहरा आठवून गालातल्या गालात लाजला..

काय रे सिध्दू.., अभिने मागून खांद्यावर हात टाकला.. तसा सिद दचकला..

वहिनींचा फोटो वगैरे तरी दाखव...

सिध्दार्थने लगेच त्याच्या पुस्तकातून फोटो काढला आणि दाखवला...

वॉव.. ही तर तेरे नाम मधली निर्जराच दिसत आहे.. तो ओरडला तसे सगळेजण येऊन फोटो पाहू लागले..

सिध्दार्थ लाजतच होता..

काय सिध्दू मग फोन नंबर वगैरे एक्सेंज केले की नाही..,?” संकेत ने डोळा मारत विचारले.

 नाही रे.. अजून तिच्याकडून होकार कुठे आलाय.. आणि असं होकार आल्याशिवाय नंबर एक्सेंज नाही करता येत..

अरे कुठल्या जमान्यात आहेस तू सिध्दू.., गेला तो जमाना.. घ्यायचा नंबर बिनधास्त... रिया म्हणाली..

आता ते सगळं तिच्या येणाऱ्या होकारावर अवलंबून आहे. सिद जरा नाराजीने बोलला..

का रे.. येणार येणार.. तुला होकार येणार.. नक्की येणार... संकेत म्हणाला..

मग.. असा हॅंडसम बॉय शोधून तरी सापडणार आहे का कुठे...?” रिया म्हणाली..

सिद हसला, अरे नुसतं हॅंडसम असून लग्न होत असतंय हो.. काही तरी कामधंदा नको का... साला अजून माझं ग्रॅज्युएशन पण कंप्लिट होत नाही.. किती केट्या लागल्यात.. आता ते सर पण कंटाळले असतील...

सगळेजण सिरियस झाले...

भाऊ संकेत तुझ्या कंपनीत बघ ना कुठे काम असेल तर.. राव मला तर असंच वाटतंय की मला नोकरी नाही म्हणून ती मला नकार देईल... सिद फारच टेन्शनमध्ये बोलला..

अरे सिध्दू, काही पण काय बोलतोस... तू लिखाण करतोस ना रे.. तू तर एक लेखक आहेस.. तू का असं बोलतोय..?” रिया म्हणाली..

लेखक असून भागत नाही गं रिया...... कोणता बाप एका नवोदित लेखकाला आपली मुलगी देणार आहे.. मुळात लेखक असणे हा एक छंद झाला पण आयुष्यात इतरही काहीतरी करता आलं पाहिजे ना..

असं नाही रे सिद.. तुझं लिखाण आम्ही वाचलंय.. तू त्यावर लक्षकेंद्रित कर... बाकीच्या जॉबच्या मागे लागशील तर लेखन करणं मागे राहून जाईल.. आणि आयुष्यात तुला काय करायचं आहे याचाच तुला ताळमेळ लागणार नाही..संकेत म्हणाला..

नाही रे.. मला जॉब करायचा आहे.. सत्तावीस वर्षांचा झालोय मी.., अजूनही मी आई, बाबा आणि दादावर अवलंबून आहे.. मला आता तरी स्वावलंबी बनलं पाहिजे रे..पंधरा- सोळा हजारांची तरी नोकरी बघ मला प्लीज..

संकेतने डोळ्यानेच त्याला ठिक म्हणून इशारा केला.

मला आशू खूप आवडली आहे.. तिने मला काहीही करून नकार नाही दिला पाहिजे.. आणि जर होकार दिला तर मी तिला सांभाळण्यासाठी सक्षम असलो पाहिजे.. एवढंच वाटतं मला... सिद गांभीर्याने बोलला...

आशू वहिनी होय...?” सगळेजण त्याला गंभीर मोडमधून नॉर्मल होण्यासाठी ओरडले...आणि त्याला चिडवू लागले...

 

****

अश्विनी कुठंय... डॅनी घरात येत बोल्ला..

आहे तिच्या खोलीत.. का रे काय झालं...?” आईने हातातलं काम सोडून विचारलं..

अगं काय झालं काय.. त्या परवा आलेल्या पाहुण्यांचा होकार आला आहे..

काय सांगतोस काय...?” आई तोंडावर हात ठेवत म्हणाली..

हो.. अन पप्पा आज आपल्याकडनं पण होकार सांगणारे.. डॅनी म्हणाला.

बरं झालं रे.. मी तर देवासमोर साखरंच ठेवते.. नाही साखर नको.. जा दिनू.. पटकन जाऊन पेढ्यांचा बॉक्स घेऊन ये..आई फार आनंदात बोलली.

अगं मम्मे.. मी येतो घेऊन पेढे.. पण आधी तिला समजव... कसाबसा आज पहिल्यांदा एखाद्या पाहुण्यांचा होकार आलाय.., त्यांना सगळं खरं खरं सांगून तिला माती खायला सांगू नको... तो रागातच म्हणाला..

ती नाही सांगणार रे.. तसं असतं तर तिने वर टेरेसवरच त्यांना सांगितलं असतं ना.. किंवा असंही असेल.. तिने सांगितलं असेल आणि त्या मुलाला तरीसुध्दा ती आवडली असेल.. शेवटी तुला सांगू का.., ज्यांच्या गाठी ह्या स्वर्गात बांधलेल्या असतात ना, त्या कितीही अडथळे आले तरी जुळतातच ... कदाचित परवा आलेले सिध्दार्थ रावच तिच्या नशीबात असतील...आई भावूक होत बोलली..

बरं होईल तसं असेल तर.., आणि तिला समजव तू... शिक्षण कमी आहे, जॉबलाच नाही.. अशी कारणं सांगून लग्न मोडायचा प्रयत्न केला ना तर तिला महागात जाईल.. सांग जा तिला...डॅनी आईला धमकी देऊन परत बाहेर निघून गेला...

आई थोडावेळ विचार करत थांबली.. आणि तेवढ्यात आशू पुस्तक घेऊन खाली आली..,

आई अशी काय गं थांबलीस.. कसला विचार करतेस...?” तिने काळजीने विचारले..

अगं काही नाही..आईने डोळ्यात साठलेले पाणी पुसले...

आई काय झालं आहे..?” तिने पुस्तक बाजूला ठेवले आणि आईच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवत तिच्याकडे वळवत तिला विचारले..

आईच्या डोळ्यातले पाणी आता गालावर ओघळले आणि ती डोळे पुसत बोल्ली.. आता तुझं लग्न होणार म्हणून टचकन डोळ्यात पाणी आलं...

आशूच्या कपाळावर आट्या पडल्या, लग्नं..?? कधी ठरलं...??” तिने विचारले..

अगं काल आलेल्या पाहुण्यांनी होकार दिलाय... आई आनंदाने बोलली...

तसा आशूचा चेहरा बदलला... काय..?” ती एवढंच बोलली..

हो.. आता आपला होकार कळवायचा आहे.. बोल ना.. तुला आवडले ना ते...?” आईने विचारले...

ती जरा बावरली.. इकडं तिकडं पाहू लागली... त्यांना काही माहित नाही म्हणूनच होकार आला.. जेव्हा माझ्याबद्दल कळेल तेव्हा जो मला होकार देईल तो अजून माझ्या समोरच आला नाहीए.. ती मनातच बोल्ली..

कुठे हरवलीस.. बोल ना आवडले ना तुला ते...?”

आई तू मला हा प्रश्न न विचारलेलंच बरं आहे... कारण..

आईने तिला मधेच तोडले.. अगं बाळा नको गं आता कोणती कारणं आणूस मध्ये... चांगला मुलगा आहे तो.., लेखक आहे, त्याचे बाबा सरकारी नोकरीला आहेत.. गरीबच आहेत पण माणूसकीची माणसं आहेत.. त्यांना काही फरक पडणार नाही तुझ्याबाबत ते समजलं तरी... ऐक माझं...

आई मग तर चांगलंच आहे.. त्यांना काही फरक पडणार नाही.. पण माझ्या पण मनाचा विचार करा.. तो मुलगा अजून पदवीधर पण नाही.., तो माझ्या शिक्षणाची काय हमी देणार...?”

हे बघ आशू.. तू आधी तुझ्याकडे बघ.. तो मुलगा लाखात एक आहे.. त्याचं त्या दिवशीचं वागणं पाहून मला तर तो खूप आवडला आहे.. तो कधी तुला अंतर देणार नाही.. कोणत्याच गोष्टीमुळे.. आई वैतागून बोलली.

आशूला फार वाईट वाटले.., तिच्या डोळ्यातून गंगा जमूना वाहायला लागल्या.. हृद्यात चर्र झाले.. आजपर्यंत आईने या गोष्टीवर कधी तिला बोल लावले नव्हते.. पण आज मात्र तिचं बोलणं ऐकून ती स्वतःला थांबवू शकली नाही...

बोल.. तू पण बोल... तूच राहिली होतीस... सांगा माझा पण होकार.. माझं कुणी ऐकणारच नाही कधी.. बाबा सांगतील तेव्हा उठायचं.. दादा बोलेल तेव्हा बसायचं.. खोटं खोटं लाजायचं.. खोटं-खोटं हसायचं.. अगं आई आख्खं आयुष्यं असंच खोटं खोटं घालवायचं का..?” ती खूप रडत होती..

आईने निशब्द होऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवला... तो मुलगा तुला गुलाबाच्या पाकळीवाणी जपेल.. तुझी खूप काळजी घेईल.. हे मी तुला आश्वस्तपणे सांगते.., त्या मुलाच्या डोळ्यात मला काहीतरी वेगळेपण दिसले.. आजपर्यंत आलेल्या सगळ्या मुलांपैकी सिध्दार्थ मला वेगळा वाटला.. तो नक्की तुला समजून घेईल...आई तिचे डोळे पुसत म्हणाली..

आशू आईच्या कुशीत पडून हुमसून हुमसून रडत होती....

 

                                                                  क्रमशः