"हो! माझा बॉयफ्रेंड आहे, लग्न नंतर सुद्धा" .. प्रिया असा म्हणत तिच्या नवऱ्याशी भांडून रूम मधून रागात बाहेर आली. दरवाजा जोरात आदळला आणि पायऱ्या उतरून हॉल मध्ये आली.
त्याचा झाला असा होता कि प्रिया ला शनिवारी halfday असल्याने तिने नितीश ला कॉल करून सांगितल होता " नीतिश आज मला halfday आहे तर आज आपण संध्याकाळी डिनर ला जाऊया बाहेर"
प्रिया च ऑफिस सुटला नितीश ला कॉल लावला पण तो मीटिंग मधे असल्याने त्याने कॉल रेसिइव्ह केला नाही.
प्रियाने आपली scooty पार्किंग मधून काढली, हेल्मेट घातला आणि निघाली घराकडे. तस प्रिया च घर आणि ऑफिस ४-५ km . पण रस्त्यात २ सिग्नल लागायचे.
लाल सिग्नल लागला आणि प्रिया ने गाडी थांबवली, आणि बायकांनी नेहमीची सवय- तिने गाडीच्या आरशात बघितला, हेल्मेट पुन्हा व्यवस्थित केलं आणि बघते तर काय मागे एक चेहरा तिच्याकडे बघत होता, तिला कुठेतरी बघितल्या सारख वाटलं. मागे वळून बघितला तर त्याने छान अशी मोठ्ठी smile दिली, आणि तो होता तिच्या शाळेतला जवळचा मित्र पियुष.. अरेय हाय पियुष .. इकडे कसाकाय ? मुंबई मध्ये कसाकाय आलास?
आणि तेवढ्यात सिग्नल सुटला पण प्रिया ला इतका आनंद झालेला कि तिला सुचलंच नाही.. मग तोच म्हणाला "" अग पुढे गाडी थांबाव मग बोलू"
"अरे..! कुठेस सध्या? काय करतोस? इकडे कधी आलास ?
अग हो थांब जरा..! चल इकडे छान coffee मिळते, तिकडेच बोलूयात.
बोल आता ..मुंबई मध्ये कसाकाय?
अगं शिक्षण झाल आणि लगेच जॉब मिळाला इकडे मुंबई मधेच . मग इकडेच चालूये जॉब ,..
अच्छा! सांगायच कि मग भेटलो असतो आपण, लहानपणीचा पहिला मित्र आहेस तू माझा. बालवाडी पासून तर शाळेपर्यंत आपण मित्र च नाही पण बेंच पार्टनर सुद्धा होतो ना...! आणि माझ्या लग्नाला पण तुला जमलं नाही..
हो! माझ्या phD च काम चालू होता तेंव्हा..! पण तू मात्र अजून तशीच आहे हं ! तुझा संसार कसा चाललंय बाकी? खरं तर मी कॉल करणार होतो तुला पण आता तुझं लग्न झालय मग कशाला संसारात ढवळाढवळ .!
असा म्हणून परक नको करू आता..! आपली मैत्री अजुनहि तशीच आहे. मला आठवत ना माझ्या आवडीची भाजी असली माझ्या शाळेच्या डब्ब्यात तर तूच मला तुझा डबा द्यायचा. आणि हो काय रे ? लग्न वैगेरे केला कि नाही ?
नाही ग..! ह्या जबाबदारी मध्ये इतका अडकलो होतो कि जमलंच नाही ..!
ठीके चल... आपण शोधुयात तुझ्या साठी बायको..
असा प्रिया म्हणाली आणि मागून मोठ्याने आवाज आला .." प्रिया...!, इकडे काय करतेस? कोण आहे आणि हा? अश्या अनोळखी मुला सोबत coffee घेत बसलिये? अच्छा म्हणून माझा कॉल नाही उचलला..!!
अहो तुम्ही कॉल केलात? सायलेंट होता फोन..!
ऐका माझा , हा माझा मित्र...!!
मला काही ऐकायचं नाही. आत्ताच्या आत्ता घरी चल..!!
सिटूएशन हॅन्डल करायला प्रिया घरी गेली पण तिला मात्र जाम म राग आलेला नितीश चा..!
घरी आल्यावर मात्र तिने बोलायला सुरवात केली.
" अहो. तो माझा लहानपणाच मित्र पियुष, त्याला लग्नाला जमलं नव्हता आणि आज तो सिग्नल वर अचानकच भेटला.. आणि रस्त्यावर गप्पा मारण्या पेक्षा कॉफी हाऊस मध्ये गेलो..! आणि काय हो ? लग्न केला तर तुम्ही आणि मी दोघांनी सारखाच वचन घेतलेलं ना?
लग्नानंतर मुलगा घरी late येतो आणि सांगतो कि मित्रांसोबत होतो तर ते चालत,
पण मुलीने मात्र लग्न नंतर बाहेर गेलेला का नाही चालत? तेंव्हा का संस्कार आड येतात मुलीचे?
लग्न झाल्यावर मुलगा ऑफिस पार्टी वरून late आला तर तो मॉडर्न,
पण सुनबाई ची ऑफिस पार्टी का अडते?
आणि लग्न झालेली बाई आणि तिचा मित्र सोबत आहे म्हनजे असा नाही कि त्यांच्यात काही हवाच.. स्वच्छ आणि निखळ मैत्री नसू शकते का?
मैत्रिवर डाग लावणं गरजेचं आहे का?
आणि हो आहेत मला बोईस मध्ये फ्रेंड , पण आमची मैत्री स्वच्छ आणि निखळ आहे,
हँ आमच्यात पण जोक्स होता आम्ही पण एकमकेंना टाळ्या देतो,
कधी कधी शिव्या पण देतो,,
शाबासकी देतो आणि कधी भांडतो सुद्धा..
पण हा मित्र तुम्हला boyfrnd वाटत असेल तर आहे मला boyfriend ..!
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा