हल्ली लिहत नसतो

It's about the writer ,who has stopped writing his article since he lost his love.

हल्ली लिहत नसतो-

सहज बोललो, हल्ली लिहत नसतो. तिनी पण लगेच प्रश्न केला, " छंद  मोडला कि हाउस मिटली ?" शांतच राहलो , उत्तर नव्हतच माझा कडे.

रुद्ररुप धारन करून बसणारा समुद्र एकाएकी शांत झाला असता, त्याच स्पष्ठीकरन तरी काय आणी कस दयायच. मनात हुळ-हुळ सुरूच होती. जुनी पाने चाळायला सुरवात केली. आठवनींचा संग्रहच समोर उभा  राहला. त्यात सुखा-दुखात भिजलिली पाने, कुणाच्या आठवनींत काळोख पडलेली पाने, तर कुठे तरी मधेच सप्न तुटलेली पाने हाती लागली. वाटलंय जुन्या पानांन मधंन तरी तिनी केलेल्या प्रशनाचे उत्तर नक्किच उमझेल, पण या पानांन मधंन तर आणखिच किती तरी नविनच न-उमजनारे प्रश्नच निघुन आलेत.

-सागर सु. गांगडे