Mar 02, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

नको मला ती चौकट..!

Read Later
नको मला ती चौकट..!

 (ही कथा पूर्णतः काल्पनिक आहे. अशी घटना वास्तवात घडतच असेल अशी पुष्टी मी करत नाही. कथा फक्त जागृतीसाठी आहे.) 


             दरवाजाच्या बाहेर अश्रू ढाळत ती उभी होती. तो दरवाजा तिच्यासाठी कायमचा बंद झाला होता. ती चौकट ओलांडायला तिला कायमचा मज्जाव करण्यात आला होता. ज्या व्यक्तीवर तिने गेली तीन वर्ष स्वतःचा विचारही न करता प्रेम केलं होत.. एका कागदाच्या तुकड्याने तिला कायमचं परकं केलं होत. 


वाणी..!

चोवीस वर्षांची तरुण युवती. वाणी एक इंजिनिअर असून एका कंपनीत चांगल्या पोजिशनवर कामाला होती. अशातच तिची ओळख त्या कंपनीच्या क्लायन्ट असणाऱ्या डॉ. सुदीपसोबत झाली. सुदीप दिसायला अतिशय देखणा होता. तो उत्तम गायनॉकॉजिस्ट होता. हळूहळू त्यांची ओळख झाली. त्यांनी मैत्रीही केली. अशात एके दिवशी वाणीचा कॉलेज फ्रेंड अनंत तिला भेटला. अनंत आणि वाणी कॅफेमध्ये बसून कितीतरी वेळ बोलत होते. सहज चर्चा करता करता अनंतने वाणीला विचारलं. "तु अजूनही सिंगल आहेस ? " अनंत. 


"यु कॅन से होते. म्हणजे मी तशी सिंगलच आहे. पण माझ्या आयुष्यात कोणीतरी आहे.. ज्याच्या मी प्रेमात आहे." वाणी. 


अनंत थोडा नाराज झाला. पण शेवटी तो तिचा खास मित्र होता. तिच्या आयुष्याच भलं झालेलं पाहून त्याला वाईट वाटणार नव्हतं. 


"एक्च्युअली वाणी.. आय रिअली लव्ह यु ! पण तुझ लाईफ ऑलरेडी सेट असेल तर त्यात मी खोडा घालणार नाही. काँग्रेच्युलेशन्स डिअर..! " अनंत. 


वाणीने काय बोलावं न समजून फक्त स्माईल दिली. 


"मला कळेल का तो लकी माणूस कोण आहे ? " अनंत तिला चिडवण्याच्या टोनमध्ये म्हणाला. 


"डॉ. सुदीप नाव आहे त्याचं.. खूप भारी आहे रे तो.. गायनॉकॉजिस्ट आहे. " वाणी. 


"गायनॉकॉजिस्ट..? तु डॉ. सुदीप राठोडबद्दल तर बोलत नाही आहेस ना ? " अनंतने साशंक होऊन विचारलं. 


"त्याच्याबद्दलच बोलतेय मी. का रे ? " वाणी.


"वाणी, आता मी जिथे राहतो ना, तिथे बाजूला एक बाई राहायला आली आहे. आपल्याच वयाची आहे. तिला मी एकदा लिफ्टमध्ये रडताना पाहिलं होत. तेव्हा तिने सहज म्हणून सांगितलं. तिचा आधीचा नवरा डॉ. सुदीप राठोड.. त्याच्या अमानुष छळामुळे.. आणि तिला मूल होत नसल्यामुळे त्याने तिला बाहेर काढलं होत. " अनंत. वाणी हे सगळं ऐकून शॉकच झाली. तिने अनंतला सांगितलं की तिला त्या बाईला भेटायचं आहे. वाणीने त्याला त्या बाईला उद्या संध्याकाळी पाच वाजता इथेच घेऊन ये असं सांगितलं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता वाणी सुदीपला घेऊन तिथे आली आणि तिने त्याला जाब विचारला. 


"कोण ही..? ही बाई कोण आहे..? मी तर हिला ओळखतही नाही. वीणा, अग माझं लग्न कस झालं असेल ? " सुदीप. 


"काहीही खोटं बोलत नाही आहे मी. ताई, तुम्ही कोण आहात मला माहित नाही. मात्र या माणसाने माझा अतिशय अमानुष छळ केला आहे.. त्यामुळे माझी कंडिशन इतकी कृश झाली होती की मला गर्भधारणा शक्यच नव्हती. म्हणून ह्याने मला हाकलून दिल. " मालिनी पोटतिडकीने सांगत होती. 


"हो का ? लग्न केलेलं का मी तुझ्याशी ? काय पुरावा आहे ? फोटो आहे एखादा ? किंवा मॅरेज सर्टीफिकेट..? काही नाही तर निदान डिवोर्स पेपर ? " सुदीपने मालिनीवर डोळे रोखत म्हणाले. 


"ताई.. हा माणूस तुम्हांला भुलवतोय.. आमचं लग्न एका मंदिरात झालेलं.. माझ्याकडे काहीही नाही. पण मी खोटं बोलत नाही आहे ओ.." मालिनी. 


"भुलवत तर तु आहेस.. वाणी, तु म्हणालीस ना की हा अनंत तुझ्यावर प्रेम करतो म्हणून त्याने तुला खरं सांगितलं.. उलट त्याला तु हवी आहेस म्हणून त्याने हे खोटं नाटक उभ केलं आहे. एकतरी प्रूफ आहे का बघ त्यांच्याकडे.. " सुदीप कळकळीने सांगत होता. 


         अनंत काही बोलणार होता तोच वाणीने त्याच्या कानाखाली वाजवली. तो तिचा खास मित्र तिचाच होऊ पाहणारा संसार उध्वस्त करू पाहतोय हे तिला रुचलं नव्हतं. ती सुदीपसहित तिथून निघून गेली. या घटनेला एक वर्ष उलटलं होत. चार महिन्यांपूर्वीच सुदीप आणि वाणीने साखरपुडा केला होता. पण सत्य काही निराळच होत. प्रेमात वाणीने आपल्या डोळ्यावर  पट्टी बांधून घेतली होती जणू..! मालिनीच्या बाबतीत केलेली चुक परत करायची नव्हती. वाणी तर मालिनी इतकी अडाणी पण नव्हती. त्यामुळे त्याने लग्नाआधीच टेस्ट करायचं ठरवलं. दुर्दैवाने टेस्टमध्ये असं समोर आलं की वाणी कधी बाळाला जन्म देऊ शकणार नव्हती. तस त्याने वाणीला खरं कारण सांगून हाकलून दिल होत. एंगेजमेंट त्याच्यासाठी मोठं डील नव्हतं. वाणी हतबल झाली होती. पण हरली नव्हती. ज्या चौकटीवरून आज त्याने तिला हाकलून दिल तिथे ती परत येणार नव्हती. पण ती त्याला असंच सुटू पण देणार नव्हती. तिने सरळ आपली मैत्रीण अंजलीकडे धाव घेतली. अंजली पोलीस होती. वाणीने मालिनीला बोलावून घेतलं होत. वाणिला मानसिक त्रास झाला होता. पण त्याहून अधिक शारीरिक त्रास मालिनीने भोगला होता. त्यामुळे तिचा जबाब घेऊन तिने गुन्हा नोंदवला. आता त्यावर योग्य ती कारवाई होणार होती. 


_____________________          आज तीन वर्षानंतर वाणी आपल्या घरात बसून आपल्या दीड वर्षांच्या मुलीला मऊ भात भरवत होती. अनंत तिच्या शेजारी बसून ते दृश्य पाहत होता. हं.. बरोबर वाचलंत.. त्यानंतर वाणी अनंतला जाऊन भेटली होती. नको मला ती चौकट म्हणत तिने एका नव्या घरात.. नव्या रूपात.. आणि योग्य साथीदारासोबत संसार थाटला होता. त्याच्या घराची चौकट तिला कुठली बंधन घालणार नाही याची तिला खात्री होती. तो ही प्रेम करत होता तिच्यावर.. तिच्या सोबत आयुष्यभर उभ राहायची तयारी होती त्याची.. तिच्याबद्दलच सत्य समजून पण..! मूल नसलं तरी चालेल म्हणूनच त्याने तिला स्वीकार केलं होत... आणि त्याने कधी मुलाची अपेक्षा केलीही नाही. पण वाणीलाच लहान मुलांची फार आवड होती. शेवटी तिच्याच हट्टामुळे दीड वर्षांपूर्वी त्यांना सरोगसीच्या माध्यमातून मुलगी झाली होती. डॉ. सुदीपला कौटुंबिक अत्याचार प्रतिबंधक कायदा २००५ अंतर्गत अटक झाली होती. मालिनीला भरपाई देण्यात आली होती. आता तिलाही लवकरच तिला तिच्या आयुष्याचा योग्य साथीदार मिळू शकत होता. मुळात अजूनही कित्येक स्त्रियांना अशाच मर्यादा घातल्या जातात. घराची चौकट हेच त्यांचं स्थान असतं का..? स्त्री मुलाला जन्म देऊ शकली नाही तर तिला त्या चौकटीतच दाबून मारून टाकणं किती चुकीचं आहे माहित नाही का..? सुदीपसारखे अनेकजण अजूनही या समाजात असतील. परंतु अशा वेळेस स्त्रीनेही खंबीर बनलं पाहिजे. कायदा स्त्रीच्या बाजूने खंबीरपणे उभा आहे. आपल्याच घराची चौकट वाईट नाही.. परंतु कोणत्याही मर्यादेत बद्ध न करणारी.. अशी खरोखरच्या आपुलकीच्या घराची चौकट प्रत्येक स्त्रीला लाभावी हिच आशा...!समाप्त. 


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

T

.

.

//