May 24, 2022
कविता

मी अशीच....

Read Later
मी अशीच....
मी आधीपासून अशीच
मनाला पटेल तेच करायची
तुझ्यासोबत समुद्रकिनारी
अनवाणी पायाने फिरायची

मी आधीपासून अशीच
क्षितिजाकडे एकटक बघायची
तूझा हात हातात असल्यावर
त्या क्षितिजालाही काबीज करायची..

मी आधीपासून अशीच
मोकळी आणि बिनधास्त स्वभावाची
तू सोबत नाहीस म्हटल्यावर
मात्र जीवाची कालवाकालव व्हायची...

मी आधीपासून अशीच
हिंदोळ्यावर डुलायची 
तू सोबत आहेस म्हटल्यावर
झोपळ्यावरही मनसोक्त झुलायची

मी आजही तशीच
आणि तीच शांती समुद्र किनाऱ्यावरची 
अस्ताला जाणारा तोच दिनकर 
मात्र तुझी साथ नाही रे झोपाळ्यावरची...
         ©जयश्री कन्हेरे -सातपुते
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

जयश्री कन्हेरे - सातपुते

House Wife

मला लिहण्याची आणि वाचनाची खूप आवड आहे