सार्थ अभिमान आहे तुझी अर्धांगिनी असल्याचा 

Only Don't speak about the respect of ladies ,give them respect by your act

सार्थ अभिमान आहे तुझी अर्धांगिनी असल्याचा 

त्याची एकसष्टी होती, ह्यावेळी त्यांना जोरात साजरी करायची होती ,घरातली बहिण भावंडे सगळी एकत्र जमणार होती ,पण करोनामुळे सगळ्यांच्या उत्साहावर पाणी पडलं ,पण सगळ्या यंग जनरेशनने मिळून ऑनलाईन मिटिंग करु अशी कल्पना काढली, प्रत्येकाला वेळ आणि लिंक पाठवण्यात आली ,सगळे छान छान कपडे घालून आपापल्या घरात तयार होते.मिटिंग सुरु झाल्यावर बर्थ डे बॉय सगळ्यात शेवटी जॉईन होतात ,त्यांच्यासाठी सगळं सरप्राईज असतं,ते आल्याबरोबर सगळे जोरात हैप्पी बर्थडे टू यू ने विश करतात,त्यांच्या सौभाग्यवती केक आणतात ,केक कापला जातो ,सगळे ऑनलाइन आस्वाद घेतात. त्यानंतर प्रत्येक जण आपलं मनोगत व्यक्त करतो, आता सगळ्यात शेवटी वेळ येते, ती त्यांच्या सौभाग्यवतीची.

त्या बोलायला सुरुवात करतात- तुम्ही सगळ्यांनी त्यांच्या बद्दल जे भरभरून बोललात ,त्यावरून तुमचं सर्वांच यांच्यावर किती प्रेम आहे ,हे दिसून आलं ,मी त्यांच्या दोन कन्या रत्नांची आई आहे म्हणून त्यांनी कधीही माझा निरादर केला नाही ,ते ऑफिसमध्ये ज्या पोस्टवर काम करतात ,तिथल्या त्यांच्या सहका-यांना एक मुलगा किंवा एक मुलगी असचं होतं, आम्हाला जेव्हा पहिली मुलगी झाली ,तेव्हा आम्ही दोघेही खूष होतो आणि यानंतर मला मूल नको ,असच त्यांनी सांगितल होतं ,पण घरच्यांच्या आग्रहाखातर दुसरा चान्स घेतला ,दुसरी मुलगी झाल्यावर सगळ्यांची थोडी निराशा झाली होती. सासूबाई मुलासाठी अजून एक चान्स घे ,असं म्हणत होत्या.

मावश्या पण हे नसताना मला सांगायच्या मुलासाठी एक चान्स घे. परंतु हे काही तयार नव्हते ,ते परस्पर जाऊन कुटुंबनियोजन स्वत:च करून आले.मलाही माहित नव्हतं ,सगळ्यांच्या सांगण्यावरून मीही हट्ट करत होते,तसं एक दिवस ह्यांनी मला सांगितल,कुटुंबनियोजनाचं ऑपरेशन करून आलोय ,त्यामुळे आता शक्य नाही,कुणी तुला काही बोलले ,तर माझ्याशी बोलायला सांग ,माझा माझ्या कानांवर विश्वास बसत नव्हता.

मी विचारले,अहो खरंच ,तुम्ही मला न विचारता असं कसं करू शकता.

ते म्हणाले, त्यात तुला विचारण्यासारखं काय आहे,तुला त्रास नको ,म्हणून मी केलं,असं ही मी तर पहिल्या मुली नंतरच नको म्हणत होतो,माझ्या ऑफिस मध्ये माझ्या बरोबर काम करणा-या सगळ्यांना काही असो ,एकच अपत्य आहे आणि आपण दोघेही शिकलेले आहोत ,मुलगा आणि मुलगी असा भेदभाव करणं किती चुकीचं आहे,शिवाय मी सायन्स शिकलेलो आहे,त्यामुळे मला माहित आहे की,वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे,त्यामुळे या सगळ्यात तुझी काहीच चूक नाही ,हे मला मान्य आहे आणि मी तुझ्या बरोबर असताना , तुला कुणालाही घाबरण्याचे कारण नाही.तुला जर कुणी काय बोलले ,तर माझ्याशी बोलायला सांग.

पण मला तरी विश्वासात घेऊन सगळं सांगायच होतं ,त्यावर हे म्हणाले,आता तेच तर करतोय,घरात बाकीच्या सगळ्या आघाड्या तू सांभाळतेस ,अजुन परत कुटूंब नियोजनाचं ऑपरेशनही तुच करणार आणि यात तुला जास्त त्रास झाला असता ,मी निदान तुझा तेवढा तरी त्रास कमी करु शकलो , याचं मला मानसिक समाधान मिळू दे आणि असंही ह्यामुळे मला काही त्रास होणार नाही आणि हे ऑपरेशन केलेल्या आता दोन महिने झाले ,तुला माझ्यात काही बदल जाणवला का,कारण ही गोष्ट फक्त तुच सांगू शकते ,कारण माझ्या आयुष्यात तुझ्या व्यतिरिक्त ही गोष्ट मी कोणालाच विचारू शकत नाही,काय मग ,वाटतोय का काही फरक

तसं मला बाकी कसं तरी वाटल्ं आणि लाजून म्हणाले,जास्त फाजील आहात तुम्ही. पण आज मी ही गोष्ट सगळ्यां समोर सांगत आहे ,कारण त्यांनी माझ्या बरोबर लग्न केल्यावर , माझ्या अर्ध्या अंगा सारखी मला साथ दिली ,बोलण्याच्या आधी कृती करून दाखवली ,खरचं ही गोष्ट मला सांगावीशी वाटली ,कारण ही गोष्ट जरी पर्सनल असली तरी नव्या पिढीने यातून आदर्श घ्यावा . का नेहमीच कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन बायकांनीच करायचं ,जन्म ही त्यांनीच द्यायचा आणि बाकी गोष्टींचाही त्यांनीच विचार करायचा ,जर चुकून बायको गरोदर राहिली ,तर नवरा बायकोलाच फटकारणार तुला काळजी घेता येत नाही का,अरे पण बाकीची कामे तिच तर करते,निदान ही काळजी घेण्याचं काम तर तू करू शकतोस ना ,बायकांनी ऑपरेशन केल्यावर त्यांना कंबरदुखी, गर्भ पिशवीचे आजार अशा ब-याच समस्यांचा सामना करावा लागतो आणि ज्या नव-याचं बायकोवर प्रेम असेल ,तो बायको साठी हे नक्किच करु शकतो आणि त्यामुळे तुमच्या शारीरिक संबंध प्रस्थापित करताना कोणत्याही प्रकारची कमी जाणवत नाही,आज हे सगळं मी बोलू शकले कारण माझ्या नव-याने मला माझं मत व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार दिला आहे , यातून नव्या पिढीने घेण्यासारख्ं खूप आहे ,आमच्या काळात ह्यांनी जी गोष्ट केली , त्यावेळी ती खूप दुर्मिळ होती पण आता काळ बदललाय आणि काळानुसार आपणही बदलले पाहिजे,मला तर या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे तुमची अर्धांगिनी असल्याचा,ती यजमानांकडे पाहत बोलते आणि परत सगळ्यां कडे वळत बोलते ,आपल्या नवीन पिढी कडून मला हिच अपेक्षा आहे की,प्रत्येक स्त्री आपल्या पती बद्दल हेच उद्गार काढेल ,ह्यांना त्यांच्या एकसष्टीच्या खूप सा-या शुभेच्छा आणि लग्नात दिलेलं वचन पाळलं ,पाळत राहणार आणि नक्किच पाळाल हा जो विश्वास आहे तो मला रोज उठल्यानंतर मिळतो ,त्याची उतराई मी कधीच करू शकणार नाही ,धन्यवाद.

त्याला मात्र गहिवरून आलं होतं आणि तो बोलायला लागला,मला ही हा प्रसंग इतक्या छान पध्दतीने सांगेल असं वाटलं नव्हतं,हा तिचा गुण मला आज पाहायला मिळाला आणि अजुनही आम्ही एकमेकांना जाणून घेत आहोत ,असं वाटल्ं ,आपण आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत काही ना काही नवीन शिकत असतो , मला फक्त एवढंच म्हणायचं आहे,कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात दुस-यांना सांगण्याआधी आपण स्वतः ती केली पाहिजे ,तरच आपण ती दुस-यांना सल्ला देण्यासाठी पात्र असतो,तुम्ही सर्वांनी मिळून माझं जे कौतुक केलं,त्याबद्दल मी तुमचा सर्वांचा खूप आभारी आहे,पण मी फक्त एक माणूस म्हणून जगण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला.

यावर सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या,अशा प्रकारे एकसष्टीचा ऑनलाइन सोहळा साजरा झाला ,पण मनात घर करून गेला.

त्यामुळे मंडळी त्यांनी तर त्या काळात केलं ,तुम्हाला जर बायको कडून हेच शब्द ऐकायचे असतील आणि जर वेळ गेलेली नसेल ,तर तुम्हीही त्यांच्या निर्णयाचं स्वागत करू शकता.

हा लेख जर तुम्हाला आवडला असेल तर नावासहित शेअर करू शकता आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा,कारण आपल्याला काही चांगले बदल समाजात पाहायला नक्कीच आवडेल नाही का.

हसत रहा,वाचत राहा , आनंदात रहा आणि अभिप्राय अवश्य द्या.

रुपाली थोरात