Dec 06, 2021
मनोरंजन

ह्याला जीवन ऐसे नाव भाग 2

Read Later
ह्याला जीवन ऐसे नाव भाग 2

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

                                                     भाग 2

भाग 1 वरुन  पुढे वाचा.

 

काशीहून पुरोहित ने मुंबईची गाडी पकडली आणि पंडित दिल्लीला जाणाऱ्या गाडीत बसला. कानपूरला गाडी बराच वेळ थांबली चौकशी केल्यावर समजलं की समोर मालगाडी बंद पडली आहे आणि तिचं इंजिन बदलून ट्रॅक मोकळा झाल्यावरच  त्यांची गाडी पुढे जाईल. पंडित तसंही कंटाळलाच होता. त्यानी कानपूरलाच उतरायचं ठरवलं. कानपूरची काहीच माहिती नव्हती, थोडी चौकशी करून त्यांनी एक लॉज गाठलं. सामान टाकून फ्रेश होऊन शहर बघायला निघाला. दोन दिवस असाच फिरत होता. परिक्रमा झाल्यावर पायी फिरणं हा काही प्रॉब्लेम नव्हता.

 

असाच फिरता फिरता तो एका नवीन वस्तीत जावून पोचला. तहान लागली म्हणून झोळीतून पाण्याची बाटली काढली पण ती रिकामी होती. उन्हाळ्याचे दिवस, घसा कोरडा पडला होता. इकडे तिकडे पाहिलं तर कुठलच दुकान नव्हत. समोरच एक धोब्याची टपरी होती, कदाचित तो पाणी देईल म्हणून त्याला विचारलं.

 

भाई थोडा पानी  मिलेगा ? बहुत प्यास लगी है .

धोब्याने त्याच्याकडे पाहिलं. पायजमा आणि शर्ट, आणि तो ही स्वता:च धूत असल्याने जरा मळकटच दिसत होता. सहा महिन्यांची परिक्रमा, त्यामुळे रंगही जरा रापला होता. कुठल्याही अंगांनी तो एका मोठ्या कंपनीतला रिटायर्ड ऑफिसर वाटत नव्हता. धोब्याने पाणी दिलं आणि जरा इकडच्या तिकडच्या गप्पा मारत त्याची चौकशी केली. मग म्हणाला

कुछ काम करोगे ?

कैसा काम ?

यही. कपडा इस्त्री कर सकोगे. ?

पंडितने क्षणभर विचार केला, काय हरकत आहे, करायला मजा वाटली तर करू काही दिवस, नाहीतरी अनुभव घ्यायलाच निघालो आहोत.

हां जी. ज्यादा आदत तो नही है, इस्त्री करना जानता हूं पर स्पीड नाही है. लेकिन चिंता ना करो थोडे समयमे वह भी या जायगी.

ठीक है, तो फिर शुरू हो जा. दो दिन देखूँगा, अगर सही लगा तो ठीक है नही तो छुट्टि. कोई पैसा नही मिलेगा मंजूर है ?

जी. मंजूर .

 

पंडित ची नोकरी सुरू झाली. त्याला मजा वाटत होती. मनात विचार आला की कोणी त्यांच्या सहकाऱ्याने बघितलं तर काय होईल ? त्याला हसू आलं. महिना झाला. धोब्याचा त्यांच्यावर आता विश्वास बसला होता. धोब्याने रात्री त्याला त्याच टपरीत झोपायची परवानगी पण दिली. एकूणच तसं छान चाललं होतं. रात्रीच्या वेळी कपडे, आणि सामान समोरच्या घराच्या आउट हाऊस मध्ये ठेवाव लागायचं. धोबी त्यांच्या मेहनती वर खुश होता. आणि धोब्याला अचानक त्यांच्या गावी जावं लागलं. शेतावर कोणीतरी मालकी हक्क दाखवला होता. पंडितला दुकान सांभाळायला सांगून ते दोघं पती पत्नी  निघून गेले. आता पंडित एकटाच, सर्वच कामं त्यालाच करावी लागत होती. दोन तीन दिवसांनंतर तो इस्त्री करत असतांनाच अतिक्रमणवाले आले आणि त्याची झोपडी उखडून टाकली आणि त्याला पण फटके मारून पळवून लावलं. पंडितने बरीच गयावया करून आणि गल्ल्यातले सर्व पैसे देऊन इस्त्री आणि लोकांचे कपडे वाचवले. संध्याकाळ पर्यन्त सामान आणि कपडे हाताशी घेऊन तो समोरच्या घराच्या फटकापाशी बसला होता. त्या घराची मालकीण एक बाई होती आणि ती बँकेत काम करायची. संध्याकाळी ती आली आणि पंडितला अस बसलेला पाहून म्हणाली

 

अरे ! पंडित क्या हुवा ? तुम्हारी झोपडी ?

मॅडमजी वो कार्पोरेशन वाले आये थे. झोपडी उखाड कर चले गए.

फीर अब ?

अब क्या, ये कपडा जिस किसीकाभी है ये देखके कल लौटा दुंगा. बस आज मुझे यहा रहने की इजाजत दे दो. बस एक दिन के लीये. प्लीज.

पंडित बहुत दिनसे लग रहा है की तुम्हारि हिन्दी को मराठी टच है ऐसा लगता है. कौन हो तुम ?

मै मराठी हूं लेकिन आपको कैसे पता ?

मी पण मराठीच आहे. पण बरीच वर्ष इथेच आहे.

मॅडम तुम्हाला भेटून खूप आनंद झाला.

हो. ठीक आहे आज तू इथे रहा. नो प्रॉब्लेम. इथे व्हरांड्यात झोपशील ?

हो मॅडम.

 

रात्री मॅडम जेवणाचं ताट घेऊन आल्या. घे. जेवून घे. म्हणाल्या. त्याच दिवशी रात्री अडीच तीन च्या सुमारास ४-५ लोक घरात घुसले. चाहूल लागून पंडित उठला. त्याला घेरून ४ लोक उभे होते. हातात लाठ्या होत्या. चांगलेच सराईत चोर वाटत होते. त्यांनी पंडितला काठीनेच दाबून धरलं होतं.

 

आवाज करेगा तो जान गवायेगा अस म्हणून एकाने भला मोठा सुरा काढला. पाचवा दार उघडण्याची खटपट करत होता. त्याच्याजवळ लोखंडी पहार होती. पंडितनी जरी चाळीशी ओलांडलेली असली तरी लेचापेचा नव्हता. तरुणपणी व्यायाम केलेलं शरीर होतं. त्यानी अंदाज घेतला आणि लाथ मारून सुरा घेतलेल्या चोराला पाडलं आणि स्प्रिंग सारखा उठून उभा राहिला. विद्युतवेगाने हालचाल करत दुसऱ्या चोराच्या हातातली काठी हिसकाऊंन घेतली आणि त्याच्याच तोंडावर जबर तडाखा हाणला. तसंच वळून जो दूसरा चोर ज्याच्या हातात सुरा होता तो उठत असतांनाच त्यांच्या पोटात लाथ घातली. दोन डाऊन. आता बाकीच्या तिघांच त्यांच्याकडे लक्ष्य गेलं आणि त्यांनी त्यांच्याकडे मोर्चा वळवला.

 

पंडितने व्हरांड्यातून खाली आंगणात उडी मारली आणि पवित्रा घेऊन तो उभा राहिला. बाकीच्या तिघांनी पण आंगणात उडी मारली. समोरा  समोर. एकमेकांचा अंदाज घेत. त्यांनी अशा प्रतिकाराची अपेक्षाच केली नव्हती. पण आता पडलेले दोघे जण पण खाली उतरले. आता सामना फारच विषम झाला होता. पांच विरुद्ध एक.

 

पंडितला आठवलं तरुण असतांना संघात प्रहार आणि क्रमिका शिकल्या होत्या, त्याची मनातल्या मनात उजळणी करत त्याने हातातली लाठी फिरवायला सुरवात केली आणि त्याच बरोबर मोठ्याने चोर चोर असा ओरडायला लागला. त्याच्या लाठीच्या माऱ्यात एक जण आला आणि खाली पडला. पंडित ने त्याच्या छाती वर पाय ठेवला आणि त्यांच्या गुढ्ग्या वर लाठीने जोरदार प्रहार केला. तो कळवळून किंचाळला. आणि तसंच पडून राहिला. पंडित आता त्यांच्या छातीवर उभा राहून काठी फिरवत होता. दोन चार फटके त्याला पण खावे लागले. पण आता आजू बाजूच्या घरातून माणसं बाहेर येत होती. तेवढ्यात सायरन ऐकू आला. पोलिसांची गस्त गाडी गल्लीत शिरली होती. ते पाहून चोरट्यांनी काढता पाय घ्यायला सुरवात केली. जो खाली पडला होता, त्याला बरोबर घेण्यासाठी एकाने पंडित वर चाकू हल्ला केला. पंडित ने तो चुकवण्याचा प्रयत्न केला पण शेवटी उजव्या दंडावर चांगली सहा इंची जखम झाली होती.

 

पण पोलिस तो पर्यन्त पोचले होते आणि त्यांनी एकाला पकडलं होतं. दूसरा अजूनही खाली विव्हळत पडला होता, त्याला ताब्यात घेतला. पंडितला त्यांनी बसवलं आणि विचारपूस करायला सुरवात केली. पोलिस आणि आजूबाजूचे लोक आले आहेत हे कळल्यावर मॅडम पण बाहेर आल्या त्यांनी आणि शेजाऱ्यांनी पण पंडित बद्दल पोलिसांना सांगितलं. थोड्या वेळाने पोलिस व्हॅन आली आणि गुंडांना गाडीत घातलं. पंडितला पण हॉस्पिटल मध्ये नेण्यासाठी बरोबर घेतलं. दुपारी उशिरा पंडित परत आला. आणि मॅडम ची वाट बघत बसला. संध्याकाळी मॅडम घरी आल्या तेंव्हा पंडित व्हरांड्यातच होता. मॅडमची वाट बघत.

अरे अजून तू इथेच ? मला भीती वाटत होती की मला न भेटताच निघून जातोस की काय ?

नाही मॅडम तुम्हाला भेटल्याशिवाय कसा जाईन ? आणि परत हे दोन तीन कपडे आहेत ते कोणाचे हे कळत नाहीये.

ते लोक येतील रे आठवण झाल्यावर. तू कशाला काळजी करतोस ? बरं मला सांग, आता तुझी जखम कशी आहे ? आता काय करणार आहेस ?

पंडित काहीच बोलला नाही आता जखम त्रास देत होती. Painkiller चा परिणाम हळू हळू ओसरत होता.

तुझं धोबी काम तर संपलं. मग आता ?

माहीत नाही. बघूया. काहीतरी शोधावं लागेल.

माझ्याकडे वाचमन ची नोकरी करतोस ? चार हजार देईन वर दोन्ही वेळेस जेवण. वर राहायला आउट हाऊस मध्ये जागा. बघ जमेल का ?

जमेल न मॅडम. बडी मेहरबानी.

 

पंडितची चौकीदारी सुरू झाली. त्याला मोठी मौज वाटली. जीवन, अनुभव समृद्ध होत होतं. हळू हळू आजूबाजूच्या लोकांनाही त्याची सवय झाली. गप्पा गोष्टी व्हायला लागल्या. लोक त्याला ओळखायला लागले. लोकांना कळायला लागलं की हा माणूस वाचमन असला तरी सर्व विषयांची याला जाण आहे आणि मग लोक त्याच्या बोलण्यात रस घेऊ लागले. पंडित एंजॉय करत होता. मॅडम तर आजकाल त्याच्याशी गप्प मारायला उत्सुक असायच्या. एक दिवस मॅडमची स्वयंपाक करणारीचा निरोप आला की ती आता येणार नाही कारण तिचं लग्न ठरलं आहे आणि ती गावी गेली.  मॅडम प्रॉब्लेम मध्ये. संध्याकाळी ती पंडितला म्हणाली की

 

पंडित मी आता डबा लावणार आहे. तेंव्हा डब्यात जस असेल तसं खावं लागणार आहे.

का मॅडम काय झालं ?

अरे स्वयंपाक करणारीच लग्न ठरलं आहे आणि ती तिच्या गावी गेली. आता दुसरी मिळे पर्यन्त डबाच  लावावा लागणार.

मॅडम मै बनावू ?

तुला येतो करता ?

पंडितला काहीच प्रॉब्लेम नव्हता. इतकी वर्ष तो घरीच सर्व करत होता.

 

सगळाच स्वयंपाक त्याला येत होता पण तरी तो म्हणाला की खूप काही येत नाही पण तुम्ही उपाशी राहणार नाही एवढ पक्क. दाल, रोटी, सबजी चावल तो कर लुंगा चिंता की कोई बात नही.

अरे वा हे छान जमलं. जा मग हात पाय धू आणि किचन मध्ये जा. काय पाहिजे ते शोधून घे अडचण आली तर मला विचार.

 

त्या दिवसांनंतर चौकीदारी बरोबरच पंडित कुक पण झाला. त्यानी केलेला स्वयंपाक फक्त मॅडमलाच नाही तर त्यांच्या ऑफिस मधल्या मैत्रिणींना पण आवडला. विशेषत: भरली वांगी खूपच आवडली सगळ्यांना.

 

पंडित, एक दिवस संध्याकाळी मॅडम म्हणाल्या, मला अस वाटतं की नवीन बाई कशाला शोधू ? तूच कर न स्वयंपाक नेहमी साठी. छानच करतोस तू. तिला जेवढा पगार मी देते  तो तुला पण देईन. चौकादारीचा पगार अलग देईन, करशील का ?

 

क्रमश:.........

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

[email protected]

जर माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा, फॉलो करा.

 

 

 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

DILIP BHIDE

Retired

Electrical Engineer. And Factory Owner Now Retired