Login

ह्या सासू सुनेच्या जोडीला तोडच नाही

Caring family

रमाने सासरी पाऊल ठेवले तसे तिने स्वतःला घरात गुंतवुन ठेवले,छोटी मोठी कामंसुद्धा लक्ष देऊन करायची.. घरात चारच माणसं होती, सासू,सासरा नवरा आणि रमा...माणसं कमी जरी असली तरीसुद्धा सकाळ पासुन ते संध्याकाळपर्यंत तिला स्वतःसाठी तासभर फुरसत न्हवती.. आणि त्यात ती फार हौशी होती.. उपास तापास ,व्रत वैकल्य भारीच तिला हौस...हळदी कुंकु तर आवर्जुन ठेवत होती...कुठेच कमी पडत न्हवती..पाहुणे आले तरी जिथल्या तिथे ती सर्व पहायची....

घरातले सर्वच खुश असायचे तिच्यावर ,कारण ती जातीने सर्व गोष्टीवर लक्ष द्यायची...जो तो सून असावी तर रमासारखी असेच बोलायचा...रमा ऑफिसच कामही पाहायची,तिथे सुद्धा परफेक्ट होती..रमासुद्धा खुप खुश असायची. जिथे तिथे फक्त कौतुक होत रहायचं.. कौतुक कोणाला नको असते...

रमाने गोंडस मुलीला जन्म दिला..गरोदरपणात तिला पाठीचा त्रास सुरू झाला ,सिजर झाले होते.. प्रचंड त्रास झाला होता..तिने भरपुर डॉक्टरांना पाठीचा त्रास दाखवला... पण काही उपयोग नाही..

सहा महिन्याचा काळ लोटला,ती पुन्हा ऑफिसला जाऊ लागली..पण तिला उठता बसता पाठीत कळ यायची....थोडया दिवस तिने पाहिले... पण तिला जमतच न्हवते ,शेवटी तिने राजीनामा दिला...रमाला फार वाईट वाटायचे पण पर्याय न्हवता.....

नवऱ्यालाही तिचा त्रास  कळत होता...तोही तिला सपोर्ट करायचा... पण तरीही रमाला  पाहिल्यासारखं ऍक्टिव्ह राहता येत न्हवतं..कुठेतरी हरवली ती,स्वतःच्या विश्वात गुंग राहु लागली.. आवडीने सर्वांच जेवण बनवणारी आता जेवन बनवण्याचा कंटाळा करू लागली...बाहेर फिरायला जाणारी आता घरातच राहु लागली... तिचा दिनक्रम बदलला..हसरी रमा चेहरा पाडुन राहु लागली...


गावी जत्रेला सर्व कुटुंब गेले होते,पुढे पुढे असणारी रमा आज पाठीच होती.. गप गप स्वतःच्या विश्वात.. आणि लांबचा प्रवास आणि त्यात पाठीचे दुखने.. खरं तर तिला गावी यायचं न्हवते पण एकटी कशी राहणार ,म्हणुन सासू तिला घेऊन आली होती.. सासूच्या आग्रहाखातर आली ती.....

रमा मुलीला दुध पाजत होती..पलीकडच्या खोलीतुन तिला संभाषण ऐकू आले......

तिच्या नवऱ्याची काकी तिच्या सासूला बोलत होती. "काय गं, काय तुझी सुन आळशी ..नुसती बसुन आहे आल्यापासुन... जरा पुढे येत नाही कामाला हात लावत नाही"...

सासू: तसं अजिबात नाही ,तिला त्रास होतोय डिलिव्हरी नंतर म्हणुन ती ह्यावेळी शांत आहे,मला माहीत आहे माझी सून कशी आहे..प्रत्येक काम चोख असते तिचे.. आता तिला त्रास होतोय तर समजुन घ्यायलाच हवे..खरं तर ती येणार न्हवती पण मीच तीचे मन रमेल म्हणुन घेऊन आली तिला......तिने माझ्या शब्दाचा मानही ठेवला...बरं तुमची सून पाच वर्ष झालं एकदाही जत्रेला नाही आली,येणार आहे का????

हे ऐकताच जाव निघून गेली......

रमाचे डोळे पाणावले...तिला आत्मिक समाधान लाभले .सासूने तिची बाजू घेतली होती आणि ती योग्यच होती.त्यादिवसानंतर रमाच्या मनात सासूविषयी आदर कित्येक पटीने वाढला...

थोडी वर्ष लोटली,डॉक्टरांच्या गोळ्यामुळे रमाचा पाठीचा त्रास नाहीसा झाला..ती पुन्हा कामावर रुजू झाली...मुलीला सासू सासरे सांभाळायचे...सुखी कुटुंब होते.. त्या नात्याची वीण घट्ट होत गेली होती,एकमेकांचा आदर करत होते सर्व आणि प्रेमही म्हणुन रमाचे कुटुंब आनंदी कुटुंब होते....

एक दिवस रमाची  सासू घसरून पडली...पायाला दुखापत झाली..चालताही येत न्हवतं..रमाने दवाखान्यात नेहले.... एक्स रे काढल्यावर कळले की हाड मोडले आहे,ऑपरेशन करावे लागेल....पण तरीही त्यानंतर खुप काळजी घ्यावी लागेल..

ओपरेशन झाले.. दोन महिने सासू बेड वर होती ..रमाने सर्व काही जिथल्या तिथे केले...कोणत्याही कामाला हात लावू दिला नाही ,दोन महिने रमाने खास सासूसाठी रजा काढली ..

एक दिवस  रमाच्या सासूला  बघायला तिची जाव आली होती.रमा किचन मध्ये होती.. रमाला माहीत होतं की, ती काकी काही तरी बोलणार आणि बोललीच..

बरं  बाई तुझी सून सगळं बेडवर देतेय ...नशिबवान आहेस हो तू,नाही तर मी....

रमाची सासू हसली आणि तिला बोलली "जे आपण पेरतो तेच उगवते."..

रमा चहा घेऊन आली...सासू सुना एकमेकींकडे पाहून हसु लागल्या...

रमा सारखी गोड सुन आणि तिच्या सासुसारखी समजुन घेणारी सासू असेल तर प्रत्येक घर सुखी होईल.."तु तु  मै मै " हा प्रकार न होता "तू तिथे मी"नक्कीच होईल..

.
©®अश्विनी पाखरे ओगले..
लेख आवडल्यास नक्की लाईक, कंमेंट आणि शेअर करा.