Login

ह्या चौकटीतून त्या चौकटीत भाग 2

Hya Chauktitun


भाग दोन

मागील भागात आपण पाहिले सुधा खूप चांगली बायको आणि एक चांगली सून ही होती..तिच्या आयुष्यात एकच खंत होती...मूल...

त्यात आपण नवऱ्याला सुख देऊ शकलो नाही ही गोष्ट खात होती..पण त्याने ह्या एका कमी मुळे बायकोवरचे प्रेम जरा ही कमी पडू दिले नाही पण आईसाठी त्याला वाईट वाटत...तिला नातवंड हवे होते मग मुलगा की मुलगी हे तिच्या लेखी गौण होते...


मामी खूप समजदार होती...अगदी मितभाषी ,लाघवी.....तिला माणसांची खूप आवड होती...आणि नेमके कोणी नातेवाईक घरी येत नसे...


सासूबाईंच्या स्वभावामुळे...खूप खोचक बोलणे असत...कोणाला गोड बोलणे येत नसत...कोणाबद्दल चांगले बोलणे हे माहीत नसे.. फक्त काड्या कुचल्या हे माहीत..आपली ती गुणाची मग ती आपली मुलगी ,आपली नात..पण सुने बद्दल त्यांचे फार काही चांगले मत नसे...


घरी जे कोणी येत ते फक्त ते सुधाच्या गोड स्वभावामुळे आणि चांगुलपणा मुळे येत.....ती खूप गुणाची आणि संयमी, सालस.. संस्कारी..वागण्याला आणि माणसे जपण्याला खूप सराईत होती.


सासू जरी कजाग होती तरी तिने 10 वर्ष निमूटपणे संसार केला...ती म्हणत, "त्यात त्यांचा काही दोष नाही, त्या तर आधीपासूनच अश्या आहेत ,दोष माझा आहे की माझे संस्कार मला त्यांच्या तोडीस तोड वागण्याची परवानगी देत नाहीत..."

आज किती तरी वर्षांनी भाची येणार म्हंटल्यावर मामी ही खुश होती...घरात तीन जणांन व्यतिरिक्त चौथी व्यक्ती येते ,म्हणजे काही नवीन गोष्टी तिच्याकडून शिकायला मिळतील, आंनदाची एक वेगळी लहर सोबत घेऊन येईल...तिचे विचार जाणून घ्यायला मिळतील..


ती आली म्हणजे सासू बाई शांत आणि काही दिवस आनंदी राहतील...वेळ सत्कारणी लागेल...आणि त्यांना विरंगुळा मिळेल...आम्ही जे सुख देऊ शकलो नाही ते ती नात देईल...तिच्या सोबतीने सासुबाई काही दुःख विसरून जातील...काही खंत, काही क्षणापूरत्या विसरून जातील...त्यांना खऱ्या अर्थाने मनमोकळे बोलतांना पाहिलेच नाही..कधी हसतांना ही पाहिले नाही...किमान शीतल आली तर ही संधी तर मिळेल...

शीतल काही दिवसांनी येणार आहे...म्हणून प्रत्येक जण दिवस बोटावर मोजता होता...


मामा ही खूप खुश होता...डोक्यावर घेऊन शीतल ला लहापणी नाचत असणारा तो मामा अजून ही हेच समजत होता ती अजून ही तशीच लहान असती तर आज ही तेच केले असते...तिच्या आवडीचे strawberry flavour चे icecream आणले असते, मग दोघांनी मिळून गच्चीवर जाऊन खाल्ले असते...तिला बागेत घेऊन गेलो असतो...गाडीवर दूरवर चक्कर मारून आलो असतो..पण आता तिच्या आवडी बदलल्या असतील.. मोठी ,उंच झाली असणार...तिच्या सोबत घालवलेले ते दिवस आता पुन्हा तसेच घालवायला मिळणार नाही...तीच म्हणेन, " मामा मी आता लहान राहिले नाही ,मी मोठी झाले रे.."


शीतल सगळ्यांच्या मनात घर करून होतीच ,मामीला मात्र ती नवखी होती ,कारण त्यांच्या लग्नात आली तेव्हा खूप लहान होती..आणि कधी कधी तिचे बोलणे होत जरी असले तरी औपचारिक असत...ख्याली खुशाली फक्त नंदेला विचारली जात.. तर कधी तरी शीतल सोबत बोलणे होत...जास्त करून तर आजीच बोलायची...मग जास्त असा संबंध आलाच नाही.....मामा ही थोडे बोलायचा ते ही तिचे काय चालू आहे...आता तू काय करतेस... तू कधी येणार आहेस भेटायला...तुझी खूप आठवण येते... वैगेरे वैगेरे... पण खूप असे संवाद गहन होत नसत....


सुधा ने ठरवले रोज तेच तेच जगण्याची झालेली सवय निदान बाजूला ठेवून शीतल आल्यावर जरा वेगळे काही करू...ती असेपर्यंत खास वैशिष्ट्य नाष्टा ,जेवण ,करू.....



शीतल म्हणजे सगळ्यांची एकुलती एक ...एकुलती एक मुलगी...एकुलती एक नात.. एकुलती एक भाची....मग काय खूप लाड होत..तिच्यावर सगळ्यांचा खूप जीव असत... पण प्रत्यक्षात काही लाड असे ह्या आजी कडून ,मामाकडून झाले नाहीत ह्याची खंत होती..आणि आता तर लग्न ठरले होते मग पुन्हा कधी ती येणार आपल्याकडे ह्याचे वाईट वाटत होते... म्हणून ही भेट खास करायची होती असे शीतल ने ही ठरवले ,तर आजीने ही ठरवले त्यात मामीचा आणि मामाचा ही होकार होता.. ती म्हणेन तसे वागायचे... तिला कोणत्या ही प्रकारे दुखवायचे नाही...आणि आपले तात्विक वाद बाजूला ठेवायचे.../ म्हणजे मी ठेवेन / असे आजीच म्हणाली....मी सुधा सोबत म्हणजे मामी सोबत शीतल असेपर्यंत जरा ही वाद घालणार नाही......माझे मत तिच्यावर लादणार नाही...ती म्हणेन तसे होऊ दे.....माझ्या नाती समोर उगा वाद नकोत मला....मी काही दिवस तरी मन शांत राहील असे वागायचा प्रयत्न करेन...