शीतल आज अमेरिकेहून मुंबईत रहात असलेल्या मामाच्या घरी काही दिवस रहायला आली होती.. आईने आणि आजीने खूप आग्रह करण्याची ह्यावेळी गरज पडली नाही...कारण तिला भारतातल्या काही आठवणी सोबत घेऊन जायच्या होत्या...
शीतलचे लग्न ठरलं असल्यामुळे तिला इथली संस्कृती जाणून घ्यायची होती...काही संस्कार आजी कडून घ्यायचे होते...तर तिला ह्यासाठी एक गुरू हवा होता...
तिला भारतीय संस्कारासोबत एका आदर्श गृहिणी ने संयमी गुण कसा अंगिकरवा.. तो कसा येईल...ह्यासाठी ही तिची खास धडपड होती...पण ह्या बाबत ती तिच्या आईकडे कधीच बोलली नव्हती...पण ते तिला आजोळी नक्की अनुभवायला मिळेल हे माहीत होते...
शीतल ज्या विषयात phd करत होती त्याच्या थिसेस साठी हा विषय तिने निवडला होता...बेस भारतीय संस्कृती हा होता.. आणि त्यात भारतीय स्त्रियांचे शैक्षणिक स्थान...
शीतल ला त्यासाठी अशी स्त्री हवी होती , जिच्या कडे हे शिकायला मिळेल आणि जी शिक्षित तर असेलच पण ती उच्च शिक्षित असेल..जी आपले संस्कार... आपले घर...आपली माणसे...त्यात तिच्या मनाची होणारी कुचंबणा , घुसमट, आणि त्यातून मार्ग काढत आपले शिक्षण आणि त्यातून बाहेर च्या जगात वेगळे असे स्थान निर्माण ही करत आहे.....अशी कोणी तरी तिच्या डोक्यात होती...पण ह्याबद्दल तिने कोणाला ही कळवले नव्हते...खुद जी गुरू असावी तिला ही माहिती करावयाचे नव्हते...
शीतल घरी येते हे समजलतावर आजीच्या आनंदाला जणू उधानच आले, मामा आणि मामी ही खूप खुश होते, किती तरी दिवसांनी त्यांची शीतल ची भेट होईल..आणि घर भरल्यासारखे वाटेल...मग गप्पा गोष्टी... बाहेर फिरणे ..ह्यात वेळ निघून जाईल....
आजी सतत मनात म्हणत ,एकच नातवंड आहे आणि ती किती तरी दिवसांनी येणार आहे म्हंटल्यावर आजीची उर भरून आले..सगळे लाड पुरवणार मी तिचे.. गोड धोड..आणि काय काय करून खाऊ घालणार माझ्या नातीला हे बरेच प्लॅन डोक्यात शिजत होते त्यांच्या.. आल्यावर कशी माझ्या कुशीत शिरेल पिल्लू.....बरेच दिवसांनी येते तिला मी जाऊ देणार नाही...माझ्या जवळ ठेवेन तिला.. तिचे काही चालू देणार नाही...किती गोष्टी बोलायच्या राहून गेल्या आहेत...तिच्या ही गप्पा ऐकायच्या आहेत...आता माझी नात आणि मी..बघ कसे मास चढते माझ्या अंगावर ..कसे तेज येते ती आल्यावर.... नाहीतर ह्या दोघांसोबत जगणे म्हणजे रटाळ झाले नुसते... कसा घरात चैतन्याचा झरा वाहिल ती येताच..नात नातू होऊ दिले असते तर आज हे घर किती प्रसन्न असते..पण ह्यांनी ठरवलेच आहे अजून तरी मुलं होऊ द्यायचे नाही म्हटल्यावर आपण पुढे काय बोलणार होतो... करता करता आज लग्नाला 10 वर्ष झालीत तरी मुल नाही ....
मुल नाही म्हणून तर जास्तच त्रास सहन करत होती ,नवरा मात्र तिला दोष देत नसत..फक्त सासुबाई नातवासाठी दुःखी होत..घराला वंश नाहीच ह्यासाठी जीव कासावीस होत त्यांचा..
आणि मग पर्यायाने सुधाचे ही मन स्वतःला खात..