ह्या चौकटीतून त्या चौकटीत भाग 5

ह्या Chaukti


भाग 5

सुधा ने लग्न झाल्यापासून नवऱ्या कडे ऐपती पलीकडे जाऊन कसलीच मागणी केली नव्हती..

त्याला ही ठाऊक होतेच..

तिला हवे ते ती मागायला कधीच पुढे आली नाही

बरेच दिवस तर ती आई बाबांकडून जे हवे ते घेत होती...साडी ,ड्रेस, आणि तिला दिलेल्या पैश्यात भागवत असत..

नवऱ्याकडून मागणे आवडत नसे फार...पण घर खर्च मात्र तो देत...आणि मुद्दाम काही रक्कम जास्त देत...ती समजून जात हे तिच्यासाठी ...उरले तरी हिशोब मागितला नाही त्याने...आणि कमी पडले तर ती ही मागत नव्हती.. आतली गोष्ट म्हणजे ती अजून ही ह्या घरावर आपला हक्क समजत नव्हती...खरे तर मोहित ही तिची पसंती नव्हताच...पण जमत जमत ,त्याच्या आवडी निवडी समजून घेत ,त्याला समजून घेत...थोड्या तक्रारी ,तर प्रेम ह्या प्रवाहात त्याच्या वर जीव जडत गेला...


त्याने तसे तिला सर्व स्वतंत्र दिले होते...तो तिला म्हणाला ,तेव्हा लग्न होऊन काही दिवस उलटले होते,"तुला हवे ते कर...मला तू खुश हवी आहेस ...तुला जर काही दिवस माहेरी जाऊन तुझा राहिलेला अभ्यासक्रम पूर्ण करायचा असेल तर मी तशी परवानगी ही मिळतो आई कडून...दोघे आधी ही रहात होतोच ना आता ही राहू...तू माझ्यासाठी शिक्षण अपूर्ण नको ठेवू...मला नाही पटणार तो त्याग ,संसार हा अविरत आहे...त्याला खंड नाही..मग म्हणून तू स्वतःला ह्या खुंटीला बांधून ठेवू नकोस.... "

ती काहीच न बोलता आत निघून गेली ,आणि बाहेर आल्यावर ती त्याला म्हणाली, "मोहित,मला पयधील शिक्षण नकोय, मी इथे संसार सांभाळायला आले आहे, ह्यातून जे शिक्षण मिळेल तेच माझ्यासाठी खूप उपयोगात येईल, बाकी मी फार हुशार नाही म्हणूनच माझे लग्न लावून देण्यात आले ,आई बाबांनी जे केले ते योग्य आहे आणि ते मला मान्य आहे ,ह्या पुढे माझ्या शिक्षणाचा विषय आपण नको
काढायला. "

तिला स्वतःच्या आवडी निवडी आणि शिक्षण आणि त्यावर घेतलेले कष्ट ,त्यातून मिळणार आंनद, हे क्षणात सोडून द्यावे लागले ,एक चौकट कायमची बंदकरून दुसऱ्या चौकटीत खोटे का असेना हसत हसत यावे लागले होते, कारण जेव्हा मोहित म्हणाला होत तुम्हाला शिक्षण पूर्ण करायचे असेल तर तुम्ही माहेरी जाऊ शकतात ,तेव्हा त्याच्या कडून परवानगी मिळाल्याचा आनंदात ती आपल्या आईला फोन करून सांगायला गेली होती ," हॅलो आई ,मोहित ने मला पुढील शिक्षणासाठी परवानगी दिली आहे ,आणि ते म्हणाले तू तुझे बाकी शिक्षण पूर्ण कर ,मी आईसोबत बोलेल ह्या बाबत, तर मी होकार देते ,आणि माझे राहिलेले पेपर देऊन पुन्हा सासरी येईल.."

आई ला सुधाच्या ह्या बोलण्याचा बोध झाला नाही ,पण तिला परवानगी का दिली ,जावई बापूला काहीच कसे कळत नाही, बायको आहे आता ती त्याची आणि त्याने अशी पटकन सूट देणे योग्य नाही...आता संसार हेच तिचे सर्वस्व नी हीच तिची ओळख बाकी दुसरं काही होने शक्य नाही...तिला हे खुळ आहेच पण ते जावई यांनी पुन्हा तिच्या डोक्यात भरून देणे योग्य नाही..

इकडे आईने लगेच सुधाला सांगितले जे तिला अजिबात पटले नाही,कधी पटणार ही नाही, "हे बघा सुधा आता तू लग्न होऊन गेली आहेस बाळा आणि आता तुझे सर्व निर्णय तुझ्या घरचे घेतील ,त्यात तुला काही बोलण्याचा अधिकार नाही ,जर त्यांनी हे मनापासून म्हंटले असले तरी आणि नसेल तर तुला पुन्हा ह्या घरी पाहुनी म्हणून येता येईल पण शिक्षणासाठी तुला ह्या घराचे दार कधीच खुले नसतील...मी ही शिकत होते ,मला ही काही करायचे होते पण एकदा तुमची नाळ सासरी जुळली की तुमची ओळख फक्त सून आणि बायको इतकीच , मी काय मग बसले गप्प आणि तुला ही तेच करायचे आहे...आता शिक्षण पूर्णपणे विसरायचे आहे... ही विनंती नाही हे शेवटचे सांगणे आहे...पुन्हा हा विषय नको ,मी ह्यासाठी तुला कसला आधार देणार नाहीच...बाबा ही नाही देणार...."

आई असे बोलल्यावर सुधाच्या पाया खालची जमीन सरकली, मी शिकून मोठी व्हावी हे आईच मला म्हणत होती ,आणि आज आईच म्हणते मी पुन्हा शिक्षणाचा विषय काढू नको, मी खरंच संपले माझी ओळख संपली, मी फक्त एक सून आणि एक बायको हे आदर्श जीवन जगणार...

ती बाहेर आली आणि तिने मग मोहितला सांगितले की तिला शिक्षण ह्या विषयावर बोलायचे नाही...हा विषय इथेच संपला आहे...

तेव्हा ती रडतच आत गेली ,आणि घरातील कामे करू लागली ,जे तिच्या क्षमते बाहेर होते ते ओझे ही उचलण्याचे प्रयत्न करू लागली, गव्हाचे पोते ती उचलण्याचा प्रयत्न करत होती ,तर उंच छतावर लागलेले जाळे काढण्याचा प्रयत्न करत होती, तेव्हा रडत होतीच ती...मनात खूप कालवा कालव सुरू होती...तिला आता सगळे संपले हेच वाटत होते...

तिला हे कामे जमत नाही हे मोहितच्या लक्षात आले.. आणि तो धावतच घरात आला..


जाळे काढत असतांना तिचा पाय निसटणार हे बघताच त्याने तिला सावरले, तिने डोळे मिटून घेतले ,क्षणात वाटले सगळे संपले...पण त्याने तिला सावरले होते ती त्याच्या मिठीत होती ,सुरक्षित होती...तिला आज हे संपले असते तर बरे झाले असते असे वाटत असतांना त्याने तिचे ओघळणारे अश्रू पुसले...आणि तिची तगमग समजून घेत तिला विचारले ,"नेमके काय होते तुला, माझ्या हातून काही चूक झाली का ,मी काही चुकीचे बोललो का ,की मी रागावलो तुला ,काय झाले कळेल का मला, अग मला पटकन कोणाचे मन नाही वाचता येत , पण हळूहळू ,तूला समजयला मला वेळ दे...पण काय झाले ते तर सांग....दोघांचे हे नाते नवीन आहे, आणि तुला काय होतंय हे तू स्वतः सांगितल्या शिवाय कळणार नाही.."

अजून ही ती तशीच त्याने सवरलेल्या अवस्थेत पडलेली होती ,त्याने झेलली होती तशीच...तिने डोळे उघडून त्याच्या त्या नजरेत पाहिले आणि जरा काही वेगळेच भाव दिसले.. आणि लाजून पटकन उठून बाहेर आली...साडी झटकली आणि पुन्हा धडधडत्या हृदयाने एका स्टूल वर जाऊन बसली...

तो तिच्या कडे बघत होता, तिला हे जमत नाही ,हे ओझे उचलणे ,उंच जाऊन साफ सफाई, मग ही का करते असे, तिला समजून सांगावे लागणार, तिला नाही जमत तर करू नको...

तो, "पाणी देऊ का "

ती."नाही नको "

तो, "जरा शांत हो"

ती,"हम्म"

तो, "असे काम कधी केले नाहीस तर का उगाच करण्याचा भानगडीत पडतेस, मी करत असतो हे काम ,रविवार खास ठरलेला असतो माझा ह्यासाठी"

ती, शांत...

तो..."तू काय कशामुळे ही चिडचिडत करत होतीस, सांगशील "

ती ,"आई "

तो, "माझी आई की तुझी आई "

ती, "असू द्या ,मला जरा वेळ एकट सोडा"

तो, "असे प्रश्नांपासून पळून प्रश्न सुटत नसतात, त्यांना सामोरे जाणे हेच जीवन आहे ,मी फार बोलत असेल तर sorry ,उत्तर इथेच असतात,मार्ग दिसून ही न दिसणे म्हणजे एक प्रकारे अंधळेपण ,कोषात गुंतून घेणे,मग परत त्यातून कधीच न निघावेस वाटणे म्हणजे जीवना प्रती हार समज...आणि असेच काही असेल तर सांग मला ,मी तुझी हाक ऐकायला कधी ही तयार आहे.."

ती.."माझे दुःख माझेच असू द्या ,त्याला वाट मोकळी करून देऊ नका ,कारण ती वाट ह्या लग्नामुळेच बंद झाली आहे ,आणि त्याला उपाय नाही ."

क्रमशः.....?🎭 Series Post

View all