ह्या चौकटीतून त्या चौकटीत भाग 4

Hya


भाग 4



सुुधा मुलगी गुणी तशी...मुख्य म्हणजे मोठ्यांचा आदर करणारी म्हंटल्यावर सासूबाईने लगेच होकार दिला...कारण त्यांना अशीच सून हवी होती जी कमी बोलणारी आणि दबावात राहणारी...आई वडील ही संस्कारी होते...त्यांच्या संस्कारांचा प्रभाव सुधावर होता... तिच्या संसारात आईने कधी ही उगाच लुडबुड केली नाही...मोठे घर तर होतेच पण कुटुंब ही मोठे होते सुधाचे... त्यात ती सगळ्यात मोठी मुलगी...त्यात तिच्यावर एक न कळत जबाबदारी होती ती, चांगले वागण्याची..वडिलांचे नाव खराब न होऊ देण्याची.. एक सासूबाईला सांभाळण्याची त्यांचे मन जपण्याची...

सासर तसे चांगले होते असे सगळ्यांना वाटत पण इकडे सुधाला सगळे निभावून घेताना तिच्या मनाची कसरत होत...


नवरा ही पहिल्या भेटीत म्हणाला होता, बाकी काही अडचण नाही की सासुरवास नाही तुला ,पण फक्त आईचे मन मोडता कामा नये...ताई आहे पण ती विदेशात म्हणजे तिचा ही तुला त्रास नाहीच्या बरोबर...मी समजून घेईल पण तेव्हाच जेव्हा आईला तुझ्याकडून कोणतीच तक्रार नसेल..मग तुला पटत असेल तरच हो म्हण.....

सुधाची जणू कात्री झाली होती....बाबांना आणि इतरांना स्थळ आवडले होते...नाही म्हणायला जागा ठेवली नव्हती...इकडे नवरा मुलगा ही अट घालून मोकळा झाला होता... पण कोणी तिच्या शिक्षणाबद्दल बोलले नव्हते...बाबा ही नाही...म्हणजे शिक्षण हा विषय जणू ह्या पुढे संपुष्टात आला होता...आणला होता... आता फक्त घर आणि संसार..आणि मने सांभाळणे हे तिच्या पुढे ठेवण्यात आले होते.... तिची काकू आणि सासू सोबत बसल्या तेव्हा त्या म्हणाल्या होत्या,"काय तर आर्टस् शिकली आहे ,त्यात पुढे काही होत नसते हो...ह्या मुली घर सांभाळण्याच्या उपयोगाच्या असतात फक्त.."


सुधाने त्यांचे हे बोलणे ऐकले आणि तेंव्हापाडुन गप्प झाली होती ,बाबांना काही बोलली नाही.. सांगू शकली नाही...तेव्हा त्या रात्री तिच्या ह्या स
स्तीतीबद्दल एक कविता सुचली तशी तिने ती लिहिली...आणि त्याच रात्री किती तरी अश्या कविता लिहिल्या होत्या तिने...अश्रू टपकत होते..कारण समजून घेणारे असे कोणी तिच्या बाजूने उभे नव्हते..

त्या कवितांच्या संग्रहाला नाव ही छान दिले ह्या
" स्त्री जन्म चौकटीतून त्या चौकटीत "

झाले सगळे चौकटीत पुन्हा बंद झाले म्हणत तिने ह्या कविता आपल्या बहिणीला दिल्या ठेवायला..पुन्हा तुला कामा येतील..आणि मग लग्न होऊन गेली तर तिची सोबत ही तिची अनोखी आवड करत...कविता लिहीत होती..पण त्याचा थांग पत्ता ही कोणाला लागू दिला नाही कधीच... म्हणून तर बरेचदा तिचे मन मोकळे होत आणि पुन्हा सगळे निमूटपणे सहन करायला तयार होत...


दोघे आज बऱ्याच दिवसांनी बाहेर पडले होते, त्याच्या आवडीचा ड्रेस घालून दोघे ही चौपाटी फिरून ,विमान तळावर जाणार होते...तिला किती दिवसांनी आकाश मोकळे मोकळे वाटत होते... जणू तिला मनसोक्त उडावे वाटत होते...तिला जणू पंख मिळाले होते... आज निघतांना आनंदी मनातून काही शब्द सुचले होते.. त्याची लगेच कविता लिहून मोकळी झाली होती...किती तरी दिवसांनी आनंद झाल्याबाबत कविता लिहिली होती...नाहीतर कुठे तरी काहीतरी सलत होते ...अशी कविता लिहीत..कारण ही तसेच होते...आज मोकळीक मिळाली होती...कोणी तरी तिला सैल सोडले होते..... जर असेच झाले तर पुन्हा दुःखी कविता सुचनार नाहीत...शीतल खरंच एक झुळूक होऊन आली जणू...काही क्षण का असेना तिने मला सुखाचे चार क्षण जगण्याची संधी दिली .....पुन्हा मी माझी झाले.....

तसा त्याने शीतल ला msg ही केला होता... आम्ही निघालो आहोत तुला घ्यायला...तू land झाल्यावर तुझे स्वागत करायला उभे असू...


वेळ झाली होती ,आजचा दिवस छान आनंदात गेला होता...आठवणीत राहील कायमस्वरूपी असा हा दिवस होता पण फक्त सुधासाठी..

मोहित चे सर्व लक्ष येणाऱ्या विमानाकडे होते..आईच्या फोन कडे होते...त्याला सुधा सोबत मिळालेला वेळ घालवायला वेळ मिळाला नव्हता..... तिने ही काहीही तक्रार केली नव्हती..ती समुद्राच्या लाटांचा आंनद घेत बसली होती, किती तरी वेळ त्या लाटांना बघत होती..तो ही...मग हळूच त्याचे लक्ष तिच्या कडे गेले...तिच्या त्या बटा मस्त वाऱ्यावर उडतांना आज पहिल्यांदा तो बघत होता...तिचे मंत्र मुग्ध झालेले डोळे , येणाऱ्या हवेचा आस्वाद घेत होते.. गुंग झालेली सुधा खूप सुंदर दिसत होती.....ह्या आधी का आपण तिचे इतके सुंदर रूप पाहिले नाही......तिला हवे ते सुख का असेच कधी तरी दिले नाही... तिला हे सगळे आवडते हे का कळेल नाही...मावळतीला येताना सगळे सुंदर भासवे तसे का आज भासत आहे...अजून ही वेळ गेली नाही.. अजून ही मी तिला हवे ते सुख द्यायला हवे....मिठीत घ्यावेसे वाटते पण हिम्मत का होत नाही.....कारण मी तीला गमावले आहे...सतत तिला मी स्वतः चौकटीत ठेवले आहे...वाटले होते चौकटीत ठेवले म्हणजे ती आपल्या मर्यादेत राहीन...पण आज चौकटी बाहेर काढून उलट तिचे हे मोहक रूप अजून सुंदर भासले...ती चौकटी पेक्षा अशी जास्त आवडेल मला... तिला मर्यादा घातल्या आणि मीच मर्यादेत राहिलो.. तिच्या वर बंधने टाकत गेलो...म्हणूनच तिला आवडत असलेल्या गोष्टी ही ती दडपणाखाली राहून घालू शकत नाही...इतकी शिकलेली ,किती लाडाची ती माझ्या मुळे किती बदलली...


तो बघत होता किती वेळ तिच्या कडे...


तिक्यात तिची तंद्री तुटली...आणि लक्षात आले वेळ निघून गेली...


धडधडत्या ठोक्याने उठली तरी तो तिच्या कडे बघत होता...तिला समजलेच नाही त्याचे असे तिच्याकडे बघणे... कारण कधी त्याने तिच्याकडे मन भरून बघितलेच नव्हते उतक्या वर्षात..

ती, "अरे चल चल, खूप वेळ झाला आहे ,निघायला हवे आता, नाहीतर शीतल वाट बघेन..."

तो ,"बस आज ,आज कुठे मला हा समुद्र आवडला आहे ,एकदम सुंदर ,निवांत ,त्याच्या तंद्रीत, उसळणारा, तरी गूढ असा... खूप काही सांगून जात आहे तो..."

ती.."काय बोलतोस ,अरे शीतल येणार आहे ना..आपल्याला जायचे आहे तिला घ्यायला "

तो,तिचा हात धरून बसवत," अजून खूप वेळ आहे.. आज कुठे मी रमलो आहे ग , थोडा वेळ घालून आणि निघू ."

ती, "अरे नाही ,तिला जर वाट बघायची वेळ आली तर कहर होईल ,घरी फोन जाईल ,मग आई ओरडतील.."

तो ," अग आज ती येणार नाही, ती उद्या येणार आहे ,आणि तसे ही आई सोबत शेजारच्या काकू झोपायला येणार आहेत ,आणि आज आपन हॉटेल मध्ये मुक्काम करणार आहोत..आज हा दिवस तुझाच "

ती, "अरे पण हे कधी ठरलं..आपण हे ठरवलं नव्हतं..आणि मी तर सोबत काहीच ड्रेस घेतले नाहीत..पण हा खर्च खूप खर्चिक होईल ना, कश्याला उगाच हे.."

त्याला तिच्या ह्या बोलण्यावर काहीच सुचले नाही..काय बोलू आणि कसे सांगू का हे, या आधी तिला कधीच अशी खास वागणूक दिली नाही..त्या चौकटीतून कधीच बाहेर काढले नाही..ना कधी असे फिरायला घेऊन आल्याचे आठवते मग सहाजिक आहे तिचे असे विचारणे..त्या मागे नवलाई होती जी या आधीच व्हायला हवी होती...तिच्यासाठी असे काही क्षण तिच्या वाटचे तिला मिळायलाच हवे होते पण मी ही एका कर्तव्याचा चौकटीच्या आत अडकलो होतो आणि तिला ही अडकण्यास भाग पाडले होते...मग त्यातून जिथे मुक्त संचार करायचा कर ,कारण त्या बाहेर तुला जाता येणार नाही...तिला ही त्याच चौकटीच्या आत रहायची सवयच झाली होती...होती नाही आहे...नवरा, नवऱ्याची आई ,त्याची बहीण , त्याचे नातेवाईक. ह्या सगळ्या दोऱ्यात बांधून इतके वर्ष तिने काढले......तिकडून आई वडील ही सांगत ,/ कोणाला ही दुखवायचे नाही ,आपले कर्तव्य आणि संस्कार विसरायचे नाही ,थोडे कष्ट सहन करण्यात मोठेपण आहे ,मग काय पुढे आहेच की आयुष्य...म्हणून तिने ही हू की चू केली नाही..


तिला सांगावे तरी कसे...आज तुला हवे ते माग.. तुझ्या आयुष्याला एक नवी किनार लाभावी म्हणून आलो आहोत...तू खूप तरसली आहेस...मी तुला खूप तणावात ठेवले...तुला पंख होते पण मी ते जणू असून ही उडू दिले नाही..


ती, "काय ,असा काय विचार करत आहेस तू, चल घरी जर आज शीतल येणार नाही तर हा उगाच खर्च झाला, आणि उद्या तू एकटा येशील..रोज रोज आईला घरी एकटीला सोडणे बरे नाही...घरात आपण नसल्यावर त्यांना करमणार नाही...त्यांचे नियम जरा इकडे तिकडे झाले तर त्यांना झोप येत नाही..."

तो, "पण मला आज घरी जायचेच नाही, आपण हॉटेल बुक केले आहे आणि त्याचे पैसे ही फुकट जातील ,ते परत मिळणार नाही "

ती सगळे आवरते, आणि टॅक्सी ला हात दाखवते..आणि त्याला ही निघायला सांगते...

तो न राहता बसतो टॅक्सी मध्ये...आणि टॉक्सित बसल्यावर मीटर टाकताच तो ड्राइवर विचारतो ,"कुठे जायचे साहेब ? "

ती ," सांगा त्यांना कुठे जायचे ते , कोणतं हॉटेल बुक केले ते "

तिच्यात ह्या अचानक झालेल्या विचार परिवर्तनाचे त्याला नवल वाटले त्याला आश्चर्य वाटले, जी घर आणि घर ह्या गोष्टी पलीकडे काहीच विचार करू शकत नाही तिला हा हॉटेल चा विचार पटला नव्हता...आणि पटवणे शक्य नव्हते...मी आणि शीतलच्या प्लॅन मुळे आज हे शक्य झाले ,नाहीतर आज ही मला घरी माघारी जाऊन त्या रोजच्या राढ्यात ही आनंदी रात्र घालावी लागली असती....ही रात्र आठवणीत राहील असेच मी काही करेन...तिला तिच्या वाटायचे सुख मिळावे म्हणून इथून पुढे काही ही करेन....




🎭 Series Post

View all