Feb 23, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

पती-पत्नी....एक नातं विश्वासाच भाग चार

Read Later
पती-पत्नी....एक नातं विश्वासाच भाग चार


मागच्या भागात आपण पाहिलं की, चित्रा तिच्या सासूच्या खोलीत झोपली आहे आणि सासूच चित्रासोबत हितगुज सुरू आहे….


सासू -"चित्रा आपण बायका नेहमी पराधीनच असतो ग! आईकडे भाऊ-वडील मग नवरा, म्हातारपणी मुलगा. सतत कुणीतरी पुरुष आपल्यावर सत्ता गाजवत असतो. आपल्या आजूबाजूचा समाजही त्याच मानसिकतेचा आहे. अजयला तू सांभाळून घे. त्याला खरच तुझी खूप गरज आहे. आपण त्याच माणसावर रागवतो ना ज्याच्यावर आपला हक्क असतो? हो ना?"

चित्रा-"हम्म."

सासू -"झोप आता. सकाळी मीतच्या शाळेची तयारी करायची आहे. डब्बा बनवायचा आहे ना?"

चित्राची सासू निद्रा देवीच्या आधीन झाली. पण चित्राला मात्र झोप येत नव्हती.

चित्रा मनातल्या मनात विचार करत होती…

\"मान्य आहे अजयच माझ्यावर खूप प्रेम आहे, पण म्हणून त्यांनी माझ्या अंगावर हात घातला? माझ्या अश्रूंमुळे ज्यांचा जीव तळमळायचा त्यांनी आज माझ्या चारित्र्यावर संशय घेतला? माझ्या मनाच्या, भावनांच्या वेदना त्यांना जाणवल्या नसतील का?\"

सकाळी चित्रा स्वाती यांची रोजची काम सुरू होती. संजयने अजयला बोलावलं.

अजय -"दादा तू बोलावलं मला?"

संजय -"हो. का ते तुलाही माहिती आहे. काय झालं अजय एकदम एवढं चिडण्याचं कारण मला सांगशील?"

अजय-"दादा मी चित्राला सगळं दिल! प्रेम-पैसा. तरीही ती दुसऱ्या पुरुषासह…..."

संजय -"अजय खरं सांग तुझा स्वतःचा तरी विश्वास बसतो का या गोष्टीवर?"

अजय -"नसता बसला, पण हा बघ
चित्राचा मोबाईल. हा नंबर तिने \"मित्र\" म्हणून सेव केला आहे. रोज सकाळी सुप्रभात, रात्री शुभ रात्री. काय आहे हे? याशिवाय शेरो-शायरी. हे मला अजिबात सहन होत नाहीये. मी तीला घटस्फोट देणार आहे."

संजय -"केवळ मोबाईलवर कुणीतरी चित्राला मेसेज पाठवले म्हणून तू तिला चारित्रहीन ठरवू शकत नाही. अरे आजकाल कुणीही, कुणाला मेसेज पाठवत. तुला हे सगळं आवडत नाही, असं कधीतरी तू चित्राला सांगितलंस का? आणि जर ती बदमाश असती तर तिने ते मेसेजेस डिलीट केले असते. तो नंबर एखाद्या मैत्रिणीच्या नावे सेव केला असता. माझं म्हणणं कळतंय का तुला?"


अजय -"दादा तू तिला पाठीशी घालू नको किंवा तिची बाजूही घेऊ नको. माझा निर्णय झाला आहे."

संजय -"बर ठीक आहे. माझे एक म्हणणं ऐकशील?"

अजय -"हो."

संजय-"तू चित्राचा मोबाईल स्वतः जवळ ठेव. तिला तो देऊ नको."

अजय -"तो मी आधीच घेतला आहे."

संजय -"अस्स! आता एक महिना आपण चित्राच वागणं बघू आणि जर तसं काही वावग वाटलं तर मी तुला तुझ्या निर्णयात पाठिंबा देईन."

अजय -"ठीक आहे."


अजय ऑफिसला निघून गेला. संजय ने स्वातीला सगळं चित्राला सांगायला सांगितलं.

स्वाती -"चित्रा, बाई कधीच स्वातंत्र नसते. आपण तर आर्थिक दृष्ट्या ही आपल्या नवऱ्यावर अवलंबून आहोत, त्यामुळे ते ठरवतील त्या गोष्टी योग्य असो की अयोग्य, चूक असो अथवा बरोबर, आपल्याला केवळ होकारार्थी मान हलवण्याशिवाय पर्याय नाही."

चित्रा -"आपण स्त्री आहोत म्हणजे आपल्या भावना, इच्छा, मन, यांना काहीच अर्थ नाही का? किंवा नवरा म्हणेल तसं, त्याला आवडेल असंच वागायचं संवेदनाहीन कटपुतळीसारखं?"

स्वाती -"तुझं म्हणणं बरोबर आहे, पण बळी तो कान पीळी आणि निदान तुझ्या मुलाचा-मीतचा तरी विचार कर. एक लक्षात ठेव बाईचं बाईपण हीच खरी बाईची ताकद असते."

चित्रा-"आणि कधी कधी कमजोरी सुद्धा! एका बाईला दुसऱ्या बाईचं बाई पण कधीच समजणार नाही का?"

स्वाती -"समजून उपयोग तरी काय? चल येते मी. तुला जर तुझ्या आईशी कधी बोलावसं वाटलं तर, माझ्या फोनवरून तू तुझ्या आईशी बोलू शकतेस."
©® राखी भावसार भांडेकर.


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//