नवरा असावा तर असा...भाग -५(पुरुष वादी -५)

Husband....

पुरुषवादी - ५

 आता दोन्ही घरांमध्ये लग्नाची लगबग चालू होती...

पहिले खरेदी नंतर सर्व कार्यक्रम.. अतिशय लगबगीने सर्व काही चालल होत..

हळू हळू लग्नाचा दिवस सुद्धा जवळ आला...आता लग्नाला फक्त एक आठवडा बाकी होता..

अर्थात थोडा विरंगुळा म्हणून दोघांनी भेटायचं ठरवलं..

दोघे त्यादिवशी भेटले ...पण नेहमीप्रमाणे गप्पा नव्हत्या आज! नंदिता खूप शांत होती..

अखेरीस नयन ला कळून चुकले काहीतरी बिनसले आहे ....आणि अचानक तो तिथून गायब झाला..

नंदिताला काही कळेना म्हणून तिने खूप शोधले पण कुठेच नाही बराच वेळानंतर नयन हातात रसमलाई घेऊन आला...

ती बघून नंदिता खूप खुश झाली ...

आणि घडाघडा नयन सोबत बोलायला लागली..

नयन मला खूप टेन्शन येतं आहे रे आता एक महिना लग्नात चालला आहे आणि नंतर चा एक महिना लग्नाच्या इतर रीतींमध्ये जाणार आणि माझ्याकडे फक्त तीन महिने राहणार ..

नयन मला वाटते आपण घाई केली रे... अरे मी खूप मेहनतीने ती परीक्षा पास झाले होते पण आता वाटत मी नापास होणार मला खूप टेन्शन येतं नयन...

आणि बोलता बोलता ती रडून गेली..

अग अग नंदिता थोडी शांत हो..अग सर्व काही उत्तम होईल तू काळजी नको करू मी आहे ना..तू कुठेच कमी नाही पडणार अभ्यासात मी स्वतः लक्ष देईल ...ऐक शांत हो...

नयन च्या खूप समझुती नंतर नंदिता शांत झाली...

काही वेळा नंतर घरून फोन आल्यानंतर नयन ने तिला सुखरूप घरी पोहचवले... 

अखेरीस आठवडा संपला आणि लग्न आले...

म्हणता म्हणता महिना उलटला आणि दोघे सुखाने एक नवीन नात्यात गुंतले...

पण आज एवढ्या दिवसांनी नंदिता चिडली..कारण तिने ते गृहस्थ आज तिच्या लग्नात पाहिले तिला वाटले आई बाबांनी बोलवलं पण त्यांनी बोलवलं नाही ...आणि अचानक ते गृहस्थ स्टेज वर येऊन एकदम नयन च्या गळी पडले .. नंदिताला काही समझेनासे झाले आणि त्यानंतर त्या गृहस्थाने जे वाक्य बोलले ते ऐकून तर तिला धक्काच बसला...

काय नयन हे भारी केलं रे तू! ज्या मुलीने माझा अपमान केला तिलाच नांदायला आणलास तू? 

त्याला मध्येच थांबवत नयन बोलला असा काही नाही तू जा जेवणाचा आस्वाद घे ..

आणि तो चलाता झाला..

इकडे मात्र नंदिता काहीच बोलेना ..

नयन ला खूप वाईट वाटले...

शेवटी त्याने परत कोणाकडून तरी रसमलाई मागवली पण आज नंदिता खूप चिडली होती तिला खूप प्रश्न होते ...

की हे सर्व कारस्थान होत? आणि अर्थात हा तोच मुलगा होता जो मास्क लावून बसलेला होता...आणि याने हे सर्व मित्रासाठी केले..

पण आई वडीला खातिर ती काही नाही बोलली आणि फक्त लग्न सुरळीत पार पाडण्याची वाट पाहू लागली... 

अखेरीस लग्न पार पडले आणि सगळे घरी निघण्यास प्रस्थान झाले...

मनी खूप प्रश्न असताना नंदिता शांत होती..आणि मला त्या सर्व प्रश्नांची उत्तर द्याची आहे पण तू बोलशील तर मी सांगेल अशी परस्पर मनाची दुविधा चालली होती..

अखेरीस घरी पोहचल्यानंतर खोलीत एक क्षण असा होता की आता तो बोलू शकत होता आणि ...

अखेरीस नंदिता बोलली..

क्रमशः 

🎭 Series Post

View all