पुरुष वादी -४
घरी पोहचल्यावर नंदिता बघते...
आज घरात वेगळीच लगबग होती...
आई बाबा जरा जास्तच खुश होते....
आणि जेवण तर पूर्ण तिच्या आवडीचे होते...
नंदिताने लगबगीने जाऊन विचारले..
"आई काय ग काय झाल? "
आज एवढी तयारी? कशासाठी?
अग माझी राणी तू लग्नाला होकार कळवला ना! मला आणि तुझ्या बाबांना जाम टेंशन आला होता की आता काय होणार ही काय कळवनार पण तू आमची लाज ठेवलीस ग पोरी जा आत जा आवर आणि जेवायला ये..
आई उत्तरली.
नंदिता थोडी लाजून आत गेली...
जेवणाच्या ताटावर खूप गप्पा झाल्या...आणि एवढ्यात नयन च्या वडिलांचा फोन आला...
बराच वेळ चर्चेनंतर बाबा टेबल कडे आले..
बर मी काय म्हणतो मुलाचे वडील म्हणता की जर पसंदी झालीच तर पुढच्या रविवारी चांगला दिवस आहे ...साखरपुडा करायचा का?
आईने तर होकार दर्शवला आणि नंदिताने सुद्धा हलकीच मान डोलावली...
कारण परीक्षा सहा महिन्यानंतर होणार होती म्हणून ती सुद्धा थोडी निवांत होती..
सायंकाळी नयनचा फोन आला..
हॅलो,नंदिता काही हरकत असेल तर सांग बर का आपण नंतर लन ठेऊ शकतो साखरपुडा कारण तुझा अभ्यास पण आहे ना!
नंदिता उत्तरली, काही हरकत नाही चालेल की उलट मला वाटतं लवकरात लवकर उरकून गेलं तर मी अभ्यासाला मोकळी...
बर बर मी बोलतो तसं वडिलांशी....
यानंतर पण खूप वेळ त्यांच्या गप्पा चालल्या होत्या...
आता पुढे क्लास कुठे लावायचा आणि कसा करायचं अशा बऱ्याच गप्पा चालल्या आणि अखेरीस खूप उशिरा दोघे फोन ठेऊन झोपी गेले...
हळू हळू दिवस सरकत होते आणि रविवार जवळ येत होता..
एवढ्यातच नंदिताने कामावर पण राजीनामा दिला...
आणि एक दिवस नयनला भेटायला गेली असताना तिने एक नवीन क्लास पहिला जो अगदी त्याच्या घराजवळील होता...
मनीच तिने ठरवले हाच क्लास लावयचा..
आणि संयोग काय तर नयन सुद्धा त्याच क्लासचे कागदपत्र घेऊन आला आणि तिच्याशी बोलण करून तो क्लास फायनल केला...
अखेरीस तो दिवस उजाडला ..
दोघांच्या रेशीमगाठी एक होण्याचा...दोघं सोबत चालणार अश्या वाटेचा...
दोघेही खूप आनंदी होते...
सोबतच त्यांचे घरचे सुद्धा खूप आनंदी होते...
नयन तर अगदीच खुश होता..
आणि नंदिता मनासारखा तिचा आदर करणारा आणि तिचे स्वप्न स्वतः जगणारा नवरा मिळवून ती खूप आनंदी होती..
मनी एकच इच्छा होती तिची की नवीन घरात तिचे स्वप्न असेच स्वीकारावे जसे नयनचे स्वीकारले..
मनात नयन विषयी तिला खूप आदर होता आणि प्रेम ते तर त्याच्या हाताची रसमलाई खाऊनच झाले होते...
आणि अतिशय धूमधडाक्यात साखरपुडा आवरला....सगळे अगदी खुश होते.
आणि अशातच लग्नाची एक महिन्यानंतरची तारीख सुद्धा ठरली...
आता मात्र एक महिना राहिला होता त्यानंतर फक्त अभ्यास असा पक्क नंदिताने मनी ठरवल...
आता लग्नाच्या तयारीमध्ये दोघांना एकमेकांना वेळ सुध्दा देणे अशक्य झाले...पण तरीही रात्री फोन होणारच...
नयन त्या बाबतीत कदाचित थोडा जास्त समजदार होता पण हळू हळू कळेलच..
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा