पुरुषवादी -२
घरात पाऊल ठेवून वरती बघतेच तर ती जोरात ओरडली..
तू!
तिचे असे बोल ऐकून सर्वच थोडे संभ्रमात गेले..
आणि नंदिताचा जो पारा चढला... ती एकदम सुरूच झाली..
अग आई या मुलाला बघण्यासाठी तुम्ही मला बोलावलं .. हा..अग याला मुलींशी बोलण्याची अक्कल नाही आणि याच्याशी मी लग्न करू ...
अग नंदू काय झाल आणि पाहुण्यायंशी कुणी असा बोलत का? आई नंदिताला बोलली...
अग आई मी सांगते तुला ..अग सकाळी मला थोडा उशीर झाला निघायला आणि मी थोडी घाईतच होते...आणि सिग्नल लवकर क्रॉस करण्यामध्ये मी याच्या गाडीला धक्का देत गेली पण चुकीने तर या महाशयांनी मला इतके गोड सुनावले की बस...
म्हणतात कसे...मुलींना गाडी येत नाही ! देव जाणे घरचे गाडी का देतात...फक्त भास मारायची असते आणि नवऱ्याचे पैसे उडवणार आधी आई बापाचे नंतर नवऱ्याचे .....
देव जाणे अश्या मुलींशी कोण लग्न करत असणार...
एवढ्यात आई तिला रोखून बोलली..
अग, नंदू खर की काय कारण हे तर आल्यापासून वेगळेच सुरगात आहे.
म्हणे मुलींनी सर्व गोष्टी केल्या पाहिजे पुढे गेल्या पाहिजे ...आपण आदर केला पाहिजे त्यांचा त्या देवीच रूप असता दुसरं ... लक्ष्मी असते ती... बाई बाई बाई यांचं तर तोंड थकत नव्हत..
आई थोडी टोचून बोलली..
आणि एवढ्यात तो मुलगा उत्तरला..
अच्छा तर तू होतीस ती सकाळची पनौती! मुलगा चींडून बोलला..
पनौती! अरे काही काय बोलतोस? नंदिता चिडून बोलली...
हो म गाडी येत नाही चालवते कशाला आणि काग माझा सांगितलं स्वतः च सांग नंतर कशी बोलून गेली मला!
अग आई माफी ही मागत होति मान्य करतो मी पण नंतर काय बोलली माहीत मला ...
म्हणे तरफड तिकडेच काय एवढं माज म्हणे तुला देव करो तुला बायकोचं नाही मिळावी आणि नशीब तर बघ हीलाच बघण्यास आलो आहोत आपण! मुलगा मोठ्याने हसून बोलला..
ए स्वतः ला काय खूप मोठा शहाणा समझोस का ! जा नाही करणार लग्न तुझ्यासोबत ..
आई बाबा मला हा असा नवरा नको जो माझी इज्जत पण नाही करत...
नंदिता चिडून खोलीत गेली..
इकडे मात्र रामायण महाभारत झालं आणि अखेरीस मुलगा गेला आणि या संबंधाला पूर्णविराम लागला...
आजचा दिवस खरतर जरा जास्तच अवघड होता पण एवढ्यात नंदिताच्या फोन वर एक मेसेज आला ....
आज नंदिता चा निकाल होता....
काही महिन्यांपूर्वी तिने एक सरकारी परीक्षा दिली होती आणि त्यात ती पहिल्या फेरीत उत्तीर्ण झाली होती आणि पुढची फेरी ६ महिन्यानंतर होती...
नंदिता तो मेसेज वाचून खूप आनंदी झाली आणि तिने आनंदात आईबाबांना ही बातमी दिली...पण ती बघते कोणीतरी आई बाबांना भेटायला आले आहे म्हणून ती थांबून नंतर सांगायचा विचार करते...
काही वेळानंतर आईच खोलीत येते आणि दोघी एकदम बोलतात..
माझ्याकडे एक आनंदाची बातमी आहे
आधी तू सांग आई मग मी माझी सांगते ...
अग एक खूप चांगले संबंध आले आहे....तुझ्या लग्नाची बोलणी करायला ...आपले नातेवाईक आहे .. आणि सर्व काही उत्तम आहे...
आईचे बोल ऐकून नंदिता एकदम चिडली
अग आई तुला कळत का आजच एक मिटल लगेच दुसर उभ केल तुम्ही ...
मी आधीच सांगते मी सहा महिने लग्न नाही करणार मला परीक्षा द्यायची आणि मग मी सरकारी नोकरी करेल ...मी पाहिली फेरी उत्तीर्ण झाली..
आईला ऐकून खूप आनंद झाला ..शेवटी तीच बोलली की मी बोलून बघते बाबांसोबत ...मग तर झालं..!
एवढं बोलून आई गेली..
आणि नंदिता परत स्वप्न बघण्यात गुंग झाली.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा