नवरा असावा तर असा...भाग - ८(अंतिम - पुरुष वादी)

Husband

पुरुष वादी - ८ (अंतिम)



नयन जेवण झाल्यावर खोलीत जाणार पण आज खोलीत त्याला एक पण पुस्तक दिसत नव्हते आज त्याला चहूबाजूला फक्त सॉरी कार्ड दिसत होते त्याला काही कळेना..
आणि अखेरीस त्याने नंदिता ला बोलावले...
नंदिता आली आणि अचानक त्याच्या गळी पडली आणि सॉरी बोलू लागली..
नयन ला सर्व काही समझेना झाले..आणि अखेरीस नंदिता बोलली..
नयन मला माफ कर मी तुला खूप चुकीचं समजली रे! खूप. वाईट वागणूक दिली मी ..मला माहित आहे मी अनेक काम असे केले ज्यामुळे तुला एकट्याला खूप भोगावे लागले आहे...
अग नंदिता काय झाल ताप चढला का तुला? अशी काय बडबडेस! नयन उत्तरला..
नाही .. थांब आधी मला बोलू दे..
नयन मला माफ कर.. सर्वांचा विरोध असताना तू मला हो बोललास...
तुमच्या घराण्यात मुलींनी बाहेर जाऊन शिकलेले नाही चालत..तरी तू माझ्यासाठी नेहमी त्यांच्यासोबत भांडला..पण कधीच मला नाही कळू दिले..
आणि सर्वात मोठी गोष्ट ज्या घरच्यांसोबत तू नेहमी राहतो phkt माझ्या परीक्षेसाठी तू त्याच्यापासून दूर झाला ..नयन
मला सर्वांसाठी माफ कर नयन..
मी खरंच तुझी काहीच किंमत नाही केली ..
आणि नंदिता रडू लागली.
नयन तिला सावरण्यासाठी पुढे आला..
नंदू ए नंदू अग हे बघ तू धर्मपत्नी माझी..आपल लग्न झाल ..
आणि नात निभवण्यासाठी थोडे मागे पुढे काही गोष्टी सोडाव्या लागतात...ऐक तू जास्त काही मनावर घेऊ नकोस मी नेहमी तुझ्यासोबत आहे..
अग उदयाला माझ्यावर अशी परिस्थिती उद्भवली तर तू नाही का माझी साथ देणार ..
आणि काग प्रशंसा फक्त नारीची झाली पाहिजे का?
नंदू मी वचन दिले होते की नेहमी तुझी साथ देईल..
अब शादी की है तो निभानी तो पडेगी ना!
आता पुरे झालं जा बघु अभ्यास कर ...
एवढं बोलून नयन तिला खोलीत सोडवायला गेला..
आणि नंदिता खोलीत गेली.
आणि अखेरीस मेहनतीचे फळ कारणी लागले आणि नंदिता संपूर्ण जिल्हा मध्ये प्रथम आली ...तिचा सत्कार होणार होता आणि त्यासाठी तिला आमंत्रण सुद्धा आले.
आणि त्या दिवशी सगळ्यांसमोर नंदिता ने आपल्या परीक्षेचे श्रेय तिच्या नवऱ्याला दिले...
ज्यात तिने अनेक गोष्टी सांगितल्या..
की कशी त्याची आणि तिची भेट झाली ..
कसे तिचे स्वप्न तो स्वतः चे स्वप्न म्हणून बघतो..
आणि फक्त बघतच नाही तर ते पूर्ण सुद्धा करतो ...
अर्थात शेवटी ती खूप मजेत म्हणते की नवरा असावा तर असा..
आणि नयन अतिशय भावूक होऊन हसून स्टेज वर जातो ..
समाप्त..
मित्रानो..नयन साठी नंदिता ची एवढी साथ देणं खरंच अवघड होतं..कारण आजकाल बायकोची मित्रांसोबत जरी बाजू घेतली तरी बायकोचा बैल म्हणता आणि अशात नयन ने पदोपदी तिची साथ दिली आणि जो शब्द दिला होता तो नेहमी पाळला
खरंच नशीब लागतं असं सौभाग्य भेटायला..आणि नशीब लागत ते जपलं सुद्धा जायला..

🎭 Series Post

View all