Feb 25, 2024
पुरुषवादी

नवरा असावा तर असा ... भाग -६( पुरुष वादी)

Read Later
नवरा असावा तर असा ... भाग -६( पुरुष वादी)

पुरुषवादी -६


नयन ... कारे मी कोण आहे तुझी?
काय नात आहे आपलं? आणि मी किती महत्वाची वाटते रे तुला? नयन विश्वास माहीत काय असतो ...
अरे... एकतर खूप जपून मी तुला हो बोली रे..पण तुला माहित तू काय केलंस तू माझा विश्वास तोडला ...नंदिता अचानक रडायला लागली..
अग नंदिता हे बघ मी तुला सर्व सांगतो...
हे बघ त्यादिवशी सिग्नल वर तू जशी त्याला बोलली ना मी अगदी आश्चर्यचकित झालो.. ग! कारण मी खरंच इतकी निर्भिड मुलगी नाही पाहिली ...
आणि मी बघता क्षणी तुझ्या प्रेमात पडलो...
त्यानंतर मी तुझा शोध पण घेतला पण. तू भेटलीच नाही..
आणि नेमका मी त्या दिवशी तुला पाहायला येणार होतो माझ्या मित्रासोबत पण मला अचानक काहीतरी काम आले आणि तो एकटाच आला परिवारासोबत...
आणि नंतर त्याने मला तुझा फोटो दाखवला आणि पूर्ण घटना पण सांगितली...
त्यानंतर मला वाटल की आपण विचारून बघु...पण मी तुला सांगणार होतो पण संधीच नाही भेटली ...
मला माफ कर ना नंदिता ..
अग आज आपली एक नवीन सुरवात आहे ना जुन्या गोष्टी मागे सोडू ना ..
नंदू... प्लिज
नयन अगदी केविलवाणा होऊन बोलला...
नंदिता ने एक नजर टाकली आणि हल्कीच मान डोलावली आणि पटकन नयनला मिठी मारली...
सकाळ झाली...
आणि पुढच्या कार्यक्रमांना सुरवात झाली...
हळू हळू दिवस सरकत होते..
सुरवातीला सर्वच छान चालू होते ...अगदी परिकथेप्रमाणे ..
सगळं व्यवस्थित चालू होते..आणि अचानक नंदिताच्या फोन वर तिच्या परिक्षेसंबंधी मेसेज आला..
तशी एकदम ती सावरली की आपल्याला आपली परीक्षा द्यायची पण खूप प्रयत्न करून सुद्धा तिला एक महिना काही नाही करता आल..
मनात तिची भीती कायम होती आणि त्याचा परिणाम तिच्या अभ्यासावर तर होतच होता पण आता घरात पण वाद होत होते...
आता अगदी शुल्लक कारण होते...
नंदिता लवकर उठून आवरून क्लास करण्यासाठी रवाना झाली तर लगेच सासूबाई म्हणता ...
काय ग नंदिता कुठे सवारी?
आई क्लास करून येते..नंदिता उत्तरली.
आता माझ काय म्हणणं आहे नंदिता थोडे दिवस थांबली अस्ती ना कसं नवीन सुनेने असा नाही फिरू ग! चांगल नाही वाटत ना! जा बघू मध्ये ! तुला करायचं तर कर पण थोडे दिवस नाही गेली ते क्लास बंद नाही ना होणार! सांग बघू !
नंदिता थोडी उदास झाली पण आत जाऊन काही बोलली नाही...
काही वेळा नंतर नयन तिथे आला..
काय ग? क्लास कोण करणार? आवर की!
नयन विचारू लागला.
अहो..आई नाही बोलल्या थोडे दिवस.
नंदिता उत्तरली.
काय तू पण चल आवर पटकन आता आधीच क्लास कडे खूप दुर्लक्ष केलं आहे आता नको अजून ..
नयन उत्तरला..
नंदिता हसली आणि पटकन तयारी करू लागली..
काही वेळात दोघे निघाले
दोघे निघाले..
आईने फक्त एक कटाक्ष टाकला..
बाबा आणि ताई घरातच होत्या..
क्रमशः
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Varsha Gite

//