पुरुषवादी -३
दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी नंदिताचे बाबा तिच्याजवळ आले आणि म्हंटले ..
नंदू अग आम्हला पण वाटत तू खूप मोठं व्हावं...खूप शिकावं ..पण खर सांगू बापाला खरा आनंद मुलीला सासरी पाठवताना होतो ग बाळा पण काळजी करू नको ...
मी बोललो त्या नवीन नातेसंबंधांशी...
नयन परांजपे नाव आहे त्याच....
व्यवसायाने शेफ आहे....
आणि बाकी तू बघून घेशील अशी आशा करतो..
त्यांनी होकार दर्शवला आहे की लग्नानंतर त्यांची सून घराला चार पैसे आणून देईल..अजून काय हवं!
पण मुलाची अशी इच्छा की एकदा तू त्याला वैक्तिक भेटाव..
जमेल का तुला ? आणि नाही पटल तर आम्ही सहा महिने विषय घेणार नाही ..काय बोलतेस ?
वडील उत्तरले.
नंदिताने विचार केला ...नाही म्हणू आणि परत येऊ... म्हणजे ६ महिने ताण नाही ...
पण नंदितला माहीत नव्हतं नशिबाने काय लिहून ठेवल..
ठरल...तर २२ तारखेला ४ वाजता एका केफे मध्ये त्यांची भेट ठरली...
नंदिता नेहमीप्रमाणे तिथे पोहचली...मुलगा आधीच उपस्थित होता.
नंदिता येत आहे त्या दिशेने बघतच मुलाने मनी ठरवलं होत लग्न करणार तर हिच्यासोबतच... आणि गालातल्या गालात तो हसून गेला..
नंदिता पण त्याला बघून हलकीच हसली...
काही वेळा नंतर त्यांच्या गप्पा चालू झाल्या...
मग मुलाकडून काय अपेक्षा ...मुलगी कशी हवी अशा बऱ्याच गप्पा त्यांच्या चालत होत्या ...
आणि अशातच नयनने एक टिफीन नंदिताला दिला...
तिने विचारलं हे काय आहे?
तर नयन उत्तरला अग काही नाही रसमलाई आहे ..
अरे वाह...रसमलाई मला खूप आवडते..तुला कसा माहीत पण? आणि तू बनवलीस?
नंदिता अगदी खुश होऊन बोलली...
हो ..अग मला तुझी आवड तर नव्हती माहीत पण ही माझी खासियत आहे म्हणून घेऊन आलो...
दोघेही हलकेच हसले...
काही वेळानंतर अखेरीस नयनने विचारले..
नंदिता,तुला नेहमी अशीच स्वादिष्ट रस मलाई खायला आवडेल का? अर्थात तुला माझ्याशी लग्न करायला आवडेल का?
नयन तू खरच खूप छान आहेस पण मी खर सांगू मी आधीच ठरवून आली होती नकार कळवायचा आहे...पण खरंच सांगते तू जिंकलास रे ...
पण...
मी सरकारी नोकरी साठी खूप प्रयत्न केले आहे आणि अखेरीस त्याच्या दुसऱ्या फेरीत मी उत्तीर्ण झाले आहे आणि त्यात मी लग्न वगैरे केले मला खूप अवघड होईल रे !
म्हणून मला नाही वाटत की सध्या या गोष्टींचा विचार करावा ...
आणि नंदिता शांत झाली..
नंदिता...ऐक मी जबाबदारी घेईल...मी तुला पूर्ण परिक्षेपर्यंत आणि त्यानंतर सुद्धा साथ देईल .विश्वास ठेव माझ्यावर ...
नंदिता मध्येच त्याला तोडून बोलली...
नयन हे बोलण खूप सोप्पा आहे पण करताना तुला नकेनाऊ येतील ....
नंदिता ..तू माझ्यावर विश्वास तर ठेऊन बघ ...मी खरा नाही उतरलो तर पुढे तुझी इच्छा...
एवढं बोलून नयन गप्प बसला..
ठीक आहे ...मी तुला संधी देते पण तुला वाटते तेवढी सोपी नाही मी आधीच सांगते...नंदिता हसून बोलली .
अग साध्या गोष्टी तर मला पण नाही आवडत म्हणून तर शेफ झालो...
चल निघायच ?
हो हो...आणि दोघे प्रस्थान झाले..
क्रमशः