संध्याकाळची वेळ.
इमारतीच्या आवारात ब-याच स्त्रिया जमल्या होत्या. आता बाया म्हटल्यावर गप्पांना तर उधाण.
" काय ग, त्या अमक्याची पोरगी म्हणे त्या तमक्याच्या मागे आहे, " एक बाई
" हे तर काहीच नाही, तो तमक्याचा पोरगा, लग्न झाल्यावर तरी म्हणे त्याच्या ऑफीस मधल्या एका पोरी सोबत फिरत असतो म्हणे. " दुसरी बाई.
" काय बाई हे, ऐकायला भेटतय, हे असे लय लफडे ऐकायला भेटतात. " तीसरी बाई
" लय लक्ष ठेवाव लागत बाई, नव-यावर " पहीली बाई.
" मी नाही बाई एवढ लक्ष ठेवत, गरजच पडत नाही. " ती
" अस बेफिकीर राहुन चालणार नाही बाई, नाहीतर एक दिवस सवत आणुन ठेवायचा. " दुसरी बाई.
" सवत.? ती तर आहे मला. " ती
" काय?? " सर्व बाया गोंधळून. " आणि तुला काहीच नाही वाटत?? " पहीली बाई.
" नाही, उलट मला तर लय आवडते ती. " ती
" आं, काय?? अशी कशी ग तु?? " तिसरी बाई.
" नव-या च्या हातात असत तर, तीला मध्ये घेउन झोपला असता. " ती
आता मात्र बाकीच्या बायांना ही विचीत्र असल्याची फिलिग या याला लागते.
सर्वांचे असे चेहरे बघुन तीला आता मात्र हसु कंट्रोल झाल नाही आणि ताटी जोर जोरात हसायला लागते.
तीला हसताना बघुन त्या बायांना ती वेडी वाटायला लागते.
" अहो ती सवत म्हणजे आमच्या अहोंची बाईक, माझ्यानंतर त्या बाईकवर त्यांचा जाम जीव आहे. " ती
" आणि मला माझी लाडकी सवत खुप आवडते. " ती.
हे ऐकून तेव्हा कुठे सर्वांच्या जीवनात जीव आला, आणि हास्याचा एकच कल्लोळ उठला.
????????
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा