Dec 05, 2021
माहितीपूर्ण

नवरा - बायको च नातं

Read Later
नवरा - बायको च नातं

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

नवरा बायकोचे नातं हे प्रेम आणि जिव्हाळ्याचं, लोखंडाला चुंबकापासून वेगळे करायचा प्रयत्न केला,तरी ती एकमेकांकडे ओढलेच जातात. संसार टिकवण्यात तसेच नवर्‍याच्या सुखदुःखात पत्नी खूप महत्त्वाची भूमिका बजावते. .संसार म्हटलं की,त्यात सुखं दुःख  येत असतात आणि त्यांना पती-पत्नीने धैर्याने सामोरे जायचं असतं,ज्यांना हे जमलं त्यांनी संसार वाचवले ,ज्यांना नाही जमलं,त्यांनी फारकतीसारखा मार्ग पत्करून आपला संसार धुळीस मिळवला.  शुल्लक कारणावरूनही नवरा बायकोचे भांडण विकोपाला जाऊन फारकती सारखे टोकाचे निर्णय घेतले जात आहेत.परंतु त्याचा परिणाम दोन व्यक्तीवर किंवा दोन कुटुंबावरच नव्हे,तर सर्व समाजावर होत आहे.याचा आधुनिक पिढीने अनेकदा विचार करून पुढचे पाऊल उचलावे.पती-पत्नी दोघांच्या ताटातुटीने मुलाबाळांची होत असलेली हेळसांड नक्कीच हृदयाला पीळ पाडणारी आहे....नात्यांमध्ये चढाव-उतार चालूच असतात.त्यामुळे बाळंतपणानंतर किंवा चाळिशीनंतर बायकोचे वजन वाढले, तिच्या चेहेऱ्यावर सुरकुत्या दिसू लागल्या किंवा त्याला टक्कल पडले तरीही एकमेकांवरचे प्रेम कमी होता कामा नये.

ज्या जोडप्यांना वयाच्या सत्तरीत सुद्धा आपली बायको किंवा आपला नवरा सुंदर व हॅन्डसम वाटतात ती जोडपी खूप सुखी समाधानी आयुष्य जगतात....

नमस्कार.. सौ. सोनल गुरुनाथ शिंदे... ( देवरुख - रत्नागिरी )


 


❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Mrs. Sonal Gurunath Shinde

लेखिका

MA - Economics And Sociology