Nov 30, 2021
कविता

एक अनोळखी नातं...नवरा आणि बायको

Read Later
एक अनोळखी नातं...नवरा आणि बायको

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
एक अनोळखी नातं.. पती आणि पत्नी 

एक जमवले गेलेले नाते नवरा बायको... म्हणजेच पती आणि पत्नी.. पुर्वी कधी एकमेकांना पाहीले ही नसते.. आता जन्मभर एकमेकांसोबत एकत्र राहणार.. आधी अनोळखी मग हळुहळू  होत जाणारी ओळख... हळूहळू होत जाणारे स्पर्श मग येणारे रुसवे ..फुगवे.. हट्ट.. भांडण.. अबोला.. 

हळुहळू घट्ट होत जाणारी वीण... मग एकजीव तृप्तता लग्न मुरायला थोडा वेळ लागतो... हळुहळू मुरत जाते.. एकमेकांना नीट  ओळखले जाते.. वृक्ष वाढत जातो... वेल बिलगते... घट्ट फूले.. फळे येतात.. नाती घट्ट होतात.. हळुहळू एकमेकांशिवाय करमत नाही.. वय वाढत जाते... ओढ वाढत जाते... एकमेकावर अवलंबून राहणे वाढत जाते.. एकमेकांशिवाय चुकल्या चुकल्यासारखे होते... नंतर मनात हळुहळू भिती वाटत राहते. 

ही गेली तर मी कसा जगु... 
हा गेला तर मी कशी जगु... 

इतके एकमेकांत गुंततात... आणि स्वतः चे स्वंतत्र अस्तित्व विसरुन जातात... 
  किती अजब नाते कोण कुठले.. एक जमवले गेलेले नाते.. 
नवरा बायकोचे... 


???

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now