एक आविष्कार सतरा भानगडी भाग ३

Mitali has got her passion as radio jockey. She is set with her routine factory in daytime and radio in evening. Suddenly Nishant calls in her show and says a poem in code words which states that he is in danger. Mitali plans a way out with others.

एक आविष्कार सतरा भानगडी -  भाग ३

एक आविष्कार सतरा भानगडी - भाग १

एक आविष्कार सतरा भानगडी - भाग २

आभरात मितालीच रूटीन छान सेट होतं दिवसा फॅक्टरी आणि संध्याकाळी १ तास रेडिओ. तिच्या शो ला खूप छान प्रतिसाद मिळाला. सगळे जण मन लाऊन तिच्या गोष्टी ऐकायला लागले.

तिच्या आज्जीनी लहानपणी खूप रहस्यमयी कथा तिला ऐकवल्या होत्या, आणि तशी बरीच पुस्काही होती, मितालीने सर्व सांभाळून ठेवलेली. त्याच गोष्टी थोड्या बदल करून, मसाला लावून ती शो मध्ये सांगत.
या दिवसात निशांत पूर्णपणे कामात गढून गेलेला, क्वचित बोलण होत घरी. मितालीचा शो मात्र रोज आवर्जून ऐकत, मेसेज करून कौतुक ही करत.
-----------------------------------------
त्याचा मुंबईला निघायचा दिवस आला.
निशांत - चला मी निघतो, मिताली तुला यायच असेल तर कॉल करेन. आणि हो जर कामात असेल तर कदाचित येईपर्यंत बोलणं होणार नाही. 
२० दिवसात मिताली फॅक्टरी आणि रेडिओ मध्ये मस्त रमली तिला स्वतः च पॅशन मिळालं होत.
निशांतचा एकदाही कॉल आला नाही. तिला आता काळजी वाटत होती, मेसेज तरी यायला हवा होता.
नलिनी - त्याचं नेहमीचं आहे, काम संपत असताना तो स्वतः च्याच जगात असतो, झालं की बोलेल तो.
मिताली - तसं नाही आई काहीतरी वेगळं वाटतंय, कळत नाहीये. त्याचा सत्कार होणार होता त्याचंही काही कळलं नाही.
नलिनी - शांत हो बेटा येईल लवकर तो.
तिला काही केल्या करमत नाही. ती नेट वरून नगरसेवक नागरेच्या ऑफिसचा नंबर काढते व चौकशी करते.
मिताली - हॅलो नागरे सरांच ऑफिस ना, मी एक पत्रकार आहे, तुम्ही काल एका शास्त्रज्ञाचा सत्कार केला असं ऐकलं त्याची माहिती हवी होती.
ऑफिस मधून एक मुलगी बोलते - नाही मॅडम आमच्या सरांनी कुठलाच सत्कार केला नाही. १ महिना झाला सर तर फॉरेनला आहेत, तब्येत खराब असल्याने.
मितालीला मोठा धक्काच बसतो. नलिनी लगेच मुंबईच्या त्याच्या रिसर्च सेंटरला कॉल करतात, तो तिथेही आला नाही असं कळत. घरी आता सगळ्यांना टेंशन येतं. नक्की निशांत गेला कुठे, काही झालं का त्याला.
------------------------------------
मिताली त्याच्या लॅब मध्ये जाऊन येते, निशांतनी सांगितल्या प्रमाणे काही अलर्ट त्याने पाठवलाय का चेक करते, तसं काही दिसत नाही ती परत निघते. बाहेर तिला काहीतरी ऐकू येतं.
- निशांतचा २० दिवस झाले पत्ता नाही, मिताली लॅब मध्ये आहे.
मिताली बाहेर येताच त्याच्या हातून फोन पडतो बराच महाग असतो, तिला संशय येतो.
मिताली - दादा किती वेळ सांगितलं इकडे यायचं नाही, निघा आता उद्या सकाळी या.
तिच्या डोक्यात काहीतरी शिजतं, ती निरज तन्मय तन्वी ला फोन करते व रात्री घरी बोलवून घेते आणि रेडिओ स्टेशनला निघते. 
मिताली - हॅलो sssss सासवड, मी Rj मिनि, चला बोलू आपण मध्ये आपले पहिले कॉलर लाईनवर आहेत.
- हॅलो मिताली माय नेम इज नीशू.
मिताली थबकतेच, निशांतचा आवाज ऐकुन, २ सेकंदात १०० प्रश्न तिच्या डोक्यात आले पण बोलणार कसं. आनंदी व्हावं की कनफ्युज.
मिताली - बोला मी. निशू, कुठलं गाणं डेडीकेट करायचं तुम्हाला आणि कोणाला मनातलं सांगायचं तुम्हाला. 
निशांत - मला माझ्या बायकोला एक गाण डेडीकेट करायचं आहे आणि एक कविता सांगायची आहे.
मिताली - अरे वा आपले पहिले कॉलर तर कवी निघाले.
निशांत - सिंघम मूव्ही मधील साथिया गाणं, सुंदर मूव्ही आहे, पुलिस आपली रक्षा करतात व चांगले मित्र असतात. आणि ही कविता -
बंदिस्त झालो तुझ्या नजर कैदी, सोडवणारीही तूच, फक्त तुझीच मैत्री बाकी सर्व शत्रू.
जळमटे गेली अन् मिळे नवी दिशा तुजला, मग स्वप्न नागरी तू धाऊनी ये. 
उद्ध्वस्त होऊ दे सर्वपरी, उलगडू दे सत्य ते चावी तू ज्याची, भ्रमंती देहांताची.
मिताली - वाह खूप सुंदर कविता आहे, तुमच्या बायकोला नक्की आवडेल.
फोन लगेच कट होतो, मिताली शो संपवून लगेच घरी पोचते मनात काळजी भीती सर्व काही घोळत असतं. रेडिओ वर जर कॉल करायला वेळ आहे तर फोन वर का नाही बोलत, काही समजत नाही, डोकं धरून ती हॉल मध्ये विचार करत बसते.नलिनी तिच्या जवळ बसतात तिला जवळ घेतात.
नलिनी - नको काळजी करू बेटा, त्याच नेहमीचच आहे जाताना काही नीट सांगत नाही, बोलतो एक आणि असते दुसराच अर्थ.
मिताली एकदम चमकते.
मिताली - आई जर आजच्या बोलण्याचा ही अर्थ वेगळा असेल तर.
नलिनी - ह्म्म्म्म.. असू शकते.
मिताली थोडी सावरते. निरज, तन्मय व तन्वी यांना घेऊन टेरेसवर जाते. निशांतच रेडिओ वरील बोलणं तिने रेकॉर्ड केलं असते. सगळे मिळून निशांतच्या कवितेतील शब्द डीकोड करतात.
सिंघम मूव्ही म्हणजे इन्स्पेक्टर जयला कॉन्टॅक्ट करायचा.
बंदिस्त म्हणजे त्याला किडनॅप केलंय आणि सोडवायचा फक्त आपण इतर कोणालाही न सांगता.
जळमटे म्हणजे संजनाच्या वस्तूंचं ड्रॉवर त्यामध्ये एक पेन ड्राइव्ह मिळाला.
स्वप्न नगरी म्हणजे मुंबई ला ये.
उद्ध्वस्त म्हणजे लॅब पूर्ण क्रॅश करायची.
उलगडू दे सत्य आणि चावी म्हणजे पेन ड्राईव्ह ओपन करायचा ज्याचा पासवर्ड मितू आहे.
आणि भ्रमंती देहांतची हे निशांतच्या रूम मधील एक पुस्तक आहे.
नीरज - हुष sssss.. अरे यार हा दादा आहे की खुफिया एजंट.
सगळे थोडे आरामात बसतात, खाली कोणीतरी लक्ष ठेऊन असल्यासारखं जाणवते, त्यांचा तो सफाईवला असतो. सर्वजण घरात जातात व रात्री २ वाजता त्या सफाईवाल्याला झोपेत असताना पकडतात आणि पोत्यात बांधतात व तोंड उघडं ठेवतात.
तन्वी - सांग कोण आहे तू, का लक्ष ठेऊन आहे आमच्यावर, नाहीतर पोत बंद करून फेकून देऊ.
तन्मय - सांग आमच्या जिजू ला का किडनॅप केलं, कुठे आहेत ते..?
त्या माणसाचं नाव धीरज असते, निशांत च्या अपहरणाबद्दल ऐकुन त्याला धक्काच बसतो.
धीरज - काय निशांतच किडनॅप, कसं शक्य आहे? हे बघा तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी एक आर्मी ऑफिसर आहे. आम्ही निशांत वर फक्त लक्ष ठेवण्यासाठी इथे वेशांतर करून वावरत होतो.
नीरज - का पण..? 
धीरज - आर्मीचा एक खूप कॉन्फिडेंशिअल प्रोजेक्ट निशांत करत होता, आम्हाला इथे देखरेखीसाठी नियुक्त केलं होत. तो प्रोजेक्ट काय आहे कशासाठी आहे आम्हाला काहीही माहिती नाही. फक्त तो निशांत कडून कोणी जास्त पैसे देऊन विकत घेऊ नये किंवा त्याच्यावर जबरदस्ती करून बळकावू नये हे बघण आमचं काम होत, इथे असताना आम्ही त्याची पूर्ण खबरदारी घेतली पण प्रोजेक्ट पूर्ण व्हायच्या आधीच अचानक इथून निघून जाण्याने आम्ही ही समजू शकलो नाही नक्की झाले काय. तो मुंबई रिसर्च सेंटरला गेला एवढंच आम्हाला कळवण्यात आलं.
सगळे जण बुचकळ्यात पडले नक्की शोध चालू कसा करायचा. शेवटी पुढचा प्लॅन इन्स्पेक्टर जय सकाळी आल्यावर करायचं ठरवतात. दुसऱ्या दिवशी सगळे निशांतच्या लॅब मध्ये जमतात. पेन ड्राइव्ह आणि देहांत भ्रमंती यांचा संबंध काय हे शोधून काढायचं राहिलेलं. त्या पुस्तकाचा सार म्हणजे जुन्या काळात ऋषी मुनी एकाच जागी बसून संपूर्ण जगभर सूक्ष्म रूपाने फिरत असा होता.
सगळे आश्चर्य चकित होतात, खरंच हे आज शक्य आहे का?
पेन ड्राइव्हचा पासवर्ड कवितेत सांगितल्या प्रमाणे मितु असतो. त्यामध्ये डिझाईनच्या काही फाईल्स व एक व्हिडिओ असतो त्यावर क्लिक करताच बाजूच्या डिव्हाईस मध्ये निशांतची थर्मल इमेज येते, जणू प्रोजेक्टर वर निशांत उभा आहे, ते त्यानी आधीच रेकॉर्ड करून ठेवलेलं असते. मितालीला खूप दिवसांनी त्याला भेटतोय असं झालं. निशांत एक्स्प्लेन करतो की आधीच्या काळात जस लोक एका ठिकाणी बसून सूक्ष्म शरीराने फिरत त्यामुळे त्यांना जगातील सगळ्या हालचाली अगदी जवळून अनुभवता येत, याच गोष्टीचा संदर्भ मी आपल्या प्रोजेक्ट मध्ये घेतलाय पण त्याला पूर्णपणे एक वैज्ञानिक आणि तांत्रिक आधार आहे. आपल्या पृथ्वीवर कुठलीही जागा, लोकेशन आपण अक्षांश - रेखांश म्हणजे लॅटीट्युड लॉंजीट्युड नी ओळखतो. जर आपण ह्या डिव्हाइस मध्ये एखाद्या लोकेशन चे लॅटीट्युड लॉंजीट्युड टाकले तर सॅटेलाईटच्या मदतीने आपण ती जागा, व्यक्ती स्पष्टपणे एखाद्या सीसीटीव्ही सारखी इथे लॅपटॉप वर बघु शकतो, तिथे असणाऱ्या लोकांना अंदांजही नसणार आपण त्यांना बघतोय. ना कुठला कॉल ना पासवर्ड थेट प्रक्षेपण. पण ही सुविधा फक्त आर्मी साठीच तयार केली आहे, अतिरेकी हवे तिथे हल्ले करतात त्यांना रोखण्यासाठी हे डीव्हाइस बनवण्यात आलं आहे.
सगळे जण सुन्न होतात, किती मोठी रिस्क आहे निशांतच्या जीवाची तरीही तो सातत्याने काम करत होता.
थोड्या वेळात सगळे मुंबई साठी निघतात, नलिनी व मोहन घरीच थांबतात कुणाला संशय नको. व निघताना मिताली लॅब क्रॅश करून देते. देहांत भ्रमंती व पेन ड्राईव्ह सोबत घेतात, जय व धीरज सुरुवातीला जोवर सत्य कळत नाही तोवर अप्रत्यक्ष पणे त्यांच्या सोबत न राहता मदत करणार असतात कारण त्यांच्या ऑफिशिअल सहभागाने निशांत निशांतच्या जीवाला धोका होऊ शकतो. दुसऱ्या दिवशी सगळे मुंबईला निघतात.
----------------------------------------------------
डिसेंबर २०२० ( मुंबई )

मिताली - इन्स्पेक्टर साहेब मी मिसेस मिताली आणि हे माझे मिस्टर डॉ. निशांत साळवे.
आम्हाला तक्रार नोंदवायची आहे, माझे दीर मी. नीरज २० दिवस आधी सासवड वरून मुंबई साठी निघाले पण नंतर त्यांचा काही कॉन्टॅक्ट नाही, आम्हाला वाटतंय त्यांना कोणीतरी किडनॅप केलंय. प्लीज मदत कराल का आमची. 

इन्स्पेक्टर मिताली कडून सगळी माहिती घेतात.
एक हवालदार लगेच एका अज्ञात व्यक्तीला फोन करून ही गोष्ट कळवतो. ती अज्ञात व्यक्ती तिच्या माणसांवर ओरडते.
"मूर्ख लोकांनो नक्की कोणाला किडनॅप केलंय, भलत्याच माणसाला उचलला तुम्ही."
इन्स्पेक्टर मिताली कडून सर्व माहिती घेतात. इन्स्पेक्टर जयच्या ओळखीने त्यांची तक्रार मुंबईच्या महत्त्वाच्या ठाण्यांमध्ये मध्ये फिरवल्या.
सर्वजण पुढे काय होईल याची वाट बघत हॉटेल मध्ये बसून असतात, हॉटेलचा पत्ता ठाण्यात दिलेला असतो.
दुपारी कंप्लेंट नोंदवताच संध्याकाळी एका हवालदाराचा फोन येतो निरज सापडलाय तुम्ही सगळे हॉटेलच्या बाहेर या आम्ही तिकडे घेऊन जाऊ.
मिताली - यस्स ssssss अब लगा ना तीर निशाणे पे. चला.
तन्वी - ताई आपल्याला काही होणार नाही न ग.
मिताली - डोन्ट वरी, जो पर्यंत त्यांना प्रोजेक्ट मिळत नाही तोवर आपल्या केसाला ही धक्का लावणार नाही ते.
तुम्ही सगळे तयारीत रहा ठरल्याप्रमाणे. 
तन्वीला हॉटेल मध्येच ठेवतात तेही दुसऱ्या रूम मध्ये वेगळ्या नावानी बुक करून जेणेकरून तिच्या पर्यंत कोणी नाही पोचणार. मितालीच्या ड्रेसच्या बटणला ट्रांस्मिटर असते व ट्रॅकर हॉटेल रूम मध्ये तन्वी जवळ असते.
तन्वी सोडून बाकीचे हॉटेल बाहेर थांबतात, एक हवालदार त्यांना पोलीस जीप मध्ये बसवतो, जीप मध्ये आणखी २ पोलीस असतात पण दिसायला कोणी पोलीस सारखं दिसत नाही, मळकट वर्दी, विचित्र चेहरे. जीप त्यांना घेऊन एका निर्जन स्थळी नेते ज्याचा अंदाज त्यांना होताच की हे पोलीस नसणार. मिताली उगाच मुद्दाम गोंधळ घालते.
मिताली - हे कुठे नेताय तुम्ही आम्हाला, प्लीज जाऊद्या आम्हाला, निरजला तुम्हीच किडनॅप केलंय ना, त्यांनी काय बिघडवलं तुमचं.
तन्मय - प्लीज सोडा आम्हाला, आम्ही कोणाला काही सांगणार नाही.
- ए चूप बसा रे, १० नाही २० पोलीस स्टेशन ला जा ज्याला सांगायचं त्याला सांगा आमच्या बद्दल. कोणी हात पण लाऊ शकत नाही आम्हाला.
त्यांना वाटलं त्यापेक्षा जास्त पोचलेले लोक होते हे. एकाचा फोन वाजतो तिकडून एक माणूस बोलतो.
- आता कोणाला पकडून आणले मुर्खांनो.
- डॉक्टर, त्याची बायको अन साळा.
- मग मागचा वेळी कोणाला उचलला.
- ते साहेब... डॉक्टर लाच
- अरे मग हे कोण आहे.
- काही समजत नाहीये साहेब म्हणून सगळ्यांनाच उचलला आणि गोडाऊनला आणलं. यांना पण जुन्या नॅशनल डेटा सेंटरलाच न्यायचं का.
मितालीचे डोळे चमकतात.
- नको आत्ता नको, मी वरती बोलतो मग सांगेल तसं करा, तोवर तिथेच हात पाय बांधून ठेवा त्यांचे.
- हो साहेब.
मिताली लगेच तिच्या ट्रांस्मिटरच बटण दाबते, तिकडे तन्वी धीरज आणि इन्स्पेक्टर जयला घेऊन निघते. इकडे किडनॅपर जवळ येताच मिताली तन्मय त्यांच्या डोळ्यावर लाल मिरचीचा स्प्रे मरतात व खिशातून क्लोरोफॉर्म काढून रुमालाने बेशुद्ध करतात व तिथेच थांबून राहतात. १० मिनटात जय, धीरज व तन्वी तिथे येतात, बाहेरील पहारेकऱ्यांच्या फडशा पाडतात.

----------------------------------------------

क्रमशः

- रेवपुर्वा

कमेंट करून प्रामाणिक प्रतिक्रिया जरूर कळवा. नावासह शेअर करावे.

🎭 Series Post

View all