हुरहूर एका वधूची.....

एका वधूची मनाची अवस्था...

  हुरहूर एका वधूची......                                              आज ही माणसं माझी आहेत... यांना माझी माणसं म्हणताना जो विश्वास जो हक्क मला वाटतो तोच उद्या तुझ्या घरातल्या माणसाबद्दल मला वाटेल का रे ??? लग्न होऊन मी तुझ्या घरी येईन तुझ घर कधी (आपल) घर होईल का रे ?? आज जरी मी काही चुकले तरीही माझी माणसं मला सोडून जाणार नाहीत... मला एकटे सोडणार नाहीत याची मला खात्री वाटते तीच खात्री मला तुझ्या ( आपल्या ) घरात वाटेल का रे ?? माझ्या मताना किंमत असेल का रे तिथे ???? आता नवीन घर नवीन मानस नवीन माणसाच्या नवीन आवडीनिवडी मे जुळून शकेन का रे ??? त्याच्याशी ते जुळवून घेऊ शकतील का ?? माझ्याशी त्यांना काय वाटेल घरात एक माणूस वाढलं की घरात एक अडचण वाढली हे झालं जगाच पण तुझ काय ???? तुला मे माझ जग मानायचे की जगासारख तू ही एक परका होऊन जाशील मनातील प्रत्येक एक भावना तुला सांगू शकेन का मी ???माझी चूक ही चूकच ठरेल की गुन्हा ठरेल ??? तुझ्यासोबत राहायला मिळणार तुझा हात हाती येणार याचा आनंद नक्कीच आहे रे ?? ते तर स्वप्न असते प्रत्येक मुलीचे पण तुझा हात हाती येताना बाकी हात मात्र मागेच सुटणार ना ??? कधी त्याची आठवण झाली की मला कुशीत घेशील ना कधी माझी आई हो कधी वडील बन कधी मिञ होशील ??? मनात माझ्या खूप खूप प्रश्न आहेत उत्तर त्याची तुझ्याकडे ही नसतील वेळ येईल स्वतः सोबत उत्तराना घेऊन माझ्या प्रत्येक निर्णयात मला सोबत करशील ना आज मी तुझी झाले ते नाते जपविण्यास मला मदत करशील ना ???? आयुष्याच्या प्रत्येक निर्णयात सोबत देशील ना.....