शिकारी... भाग ३

"साहेब एक सांगायचं विसरले. मागच्या काही दिवसांपासून मला असं वाटतं आहे की, कोणीतरी सतत माझा पाठलाग करत आहे. मी त्या व्यक्तीला बघितले नाही." प्रज्ञा जाताना मध्येच थांबून बोलली.


मागील भागात आपण बघितले…


.प्रज्ञाने घराची बेल वाजवली. अर्पिता दार उघडायला म्हणून बेडरूम अधून येणार, तोच कसला तरी जोरदार आवाज आला आणि अर्पिता एकदम किंचाळली. तिच्या अशा किंचाळण्या मुळे प्रज्ञाने घाईत बॅगेतून तिच्याकडील चवी काढली, दार उघडून धावत आत गेले, तर अर्पिताला बघून दोघे एकदम स्तब्ध झाले.


आता पुढे…



अर्पिता जमिनीवर कोसळली होती. तिच्या आजूबाजूला रक्त सांडलेले होते. खिडकीची काच तुटलेली होती. थोडावेळ आधी जो आवाज आला तो काच तुटण्याच्या असावा हे प्रज्ञा आणि कबिरच्या ध्यानात आले. दोघे धावत अर्पिताकडे गेले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तिला उठवण्याचा प्रयत्न सुरू होता. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. गोळी सरळ अर्पिताच्या डोक्यात घुसली होती. तितक्यात बाहेरून कोणीतरी एक दगड आत भिरकावला तो सरळ कबिरच्या डोक्याला लागला. तो तसाच धावत खिडकी जवळ गेला, तर त्याला एक पांढरी सिदान कार जाताना दिसली. त्या दगडाला एक कागद गुंडाळलेला होता. कबिरने डोके चोळत तो कागद उघडला आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.


"त्यावर प्रज्ञाचे नाव होते आणि पुढे \"नेक्स्ट यु\" असे लिहिले होते." त्याने भेदरलेल्या नजरेने प्रज्ञाकडे बघितले.


प्रज्ञाला अर्पिताच्या मृत्युमुळे धक्का बसला होता. ती जोरजोरात रडत होती. तिच्या आवाजाने शेजारी जमा झाले. त्यातील एकाने पोलिसांना कळवले.

प्रज्ञाने रडत रडत कबिरच्या हातातून कागद घेतला आणि त्यातील संदेश वाचून तिचे हात पाय भीतीने थरथरायला लागले.

"परी काय आहे हे सगळं? कोण आहेत ही माणसं? मघाशी तुझ्या मागे कोणी लागलं होतं आणि आता अर्पिता सोबत हे सगळं झालं." कबिर बोलला.


"कबिर खरंच मला ह्यातील काही माहीत नाही. कोण आहे? कशासाठी हे सगळं करत आहेत? ह्याची काहीच कल्पना नाही रे मला." प्रज्ञा त्याच्या हाताला पकडून बोलली.


तितक्यात पोलिस तिथे आले. एकंदरीत परिस्थिती वरून घटना नुकतीच घडली होती हे स्पष्ट होते. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. पुढील चौकशीसाठी प्रज्ञा आणि कबिरला पोलीस ठाण्यात नेण्यात आले.


"बोला कसं झालं हे? तुम्ही कुठे होतात जेव्हा ही घटना घडली." पोलिस


कबिर आणि प्रज्ञाने सगळी हकीकत सांगितली. सोबत ऑफिसच्या रस्त्यावर कोणीतरी प्रज्ञाच्या मागावर होते हे देखील पोलिसांना सांगितले.


"ठिक आहे जा तुम्ही दोघे आता पुन्हा चौकशी साठी यावे लागेल." पोलिस संशयित नजरेने त्यादोघांना बघत होते.


"साहेब एक सांगायचं विसरले. मागच्या काही दिवसांपासून मला असं वाटतं आहे की, कोणीतरी सतत माझा पाठलाग करत आहे. मी त्या व्यक्तीला बघितले नाही." प्रज्ञा जाताना मध्येच थांबून बोलली.


"परी, तू आधी का नाही बोललीस मला हे?" कबिर


"अरे मला वाटलं माझा भास असेल, पण आज जे काही झालं त्या नंतर माझी खात्री पटली." तिच्या डोळ्यात अर्पिताच्या आठवणीने अश्रू जमा झाले होते.


"आता शांत हो परी. तू रडून ती परत येणार नाहीये. अर्पिताच्या घरी कळवले आहे. ते उद्या सकाळ पर्यंत येतील. परी तू आता एकटी राहू नकोस माझ्या सोबत माझ्या रूमवर चल. नंतर बघू काय करायचं ते." कबिर काळजीने बोलला.


ठरल्या प्रमाणे कबिर प्रज्ञाला घेऊन त्याच्या घरी गेला. तो देखील मित्रांसोबत रूमवर राहत होता. सगळे ओळखीचे असल्यामुळे प्रज्ञाला फारसे ऑड वाटले नाही.


कबिर प्रज्ञाला त्याच्या खोलीत बसवून फ्रेश व्हायला गेला तेव्हा त्याच्या मोबाईलवर एक मेसेज आला.


"निशाणा चुकला. शिकार अभी बाकी है!


प्रज्ञा तो मेसेज वाचणार तितक्यात कबिरने तिच्या हातून मोबाईल घेतला.


"ऑफिसचा काही मेसेज असेल. मी बघतो. तू फ्रेश हो." म्हणत कबिरने तिला वॉशरूमकडे जाण्याचा इशारा केला.


प्रज्ञा फ्रेश व्हायला गेली खरी. पण डोक्यात असंख्य विचार होते. तितक्यात तिच्या डोक्यात एक शंका आली.


"ह्या सगळ्या मागे ते तर नाही?" प्रज्ञाचे डोळे विचाराने एकदम मोठे झाले.


"कबिरला सांगते. नको आधी मलाच पक्के समजू दे. मग सांगेल. त्याला ह्यातील काही माहीत नाही. मी ज्या गोष्टी पासून दूर जायचे म्हणून इथे पुण्यात आले आहे. ती गोष्ट माझा पिच्छा करत असेल तर?" प्रज्ञाचे विचार चक्र सुरू होते.



कोणाचा मेसेज असेल कबिरला? काय असेल त्याचा अर्थ.
प्रज्ञा कोण बद्दल विचार करत होती? कळेल पुढच्या भागात. वाचत रहा शिकारी.


क्रमशः

© वर्षाराज

🎭 Series Post

View all