Feb 22, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

शिकारी... भाग ९

Read Later
शिकारी... भाग ९
मागील भागात आपण बघितले…


"तू." कबिर त्याला बघून शिन आवाजात ओरडला.

"हो मीच. माझ्या मार्गतले सगळे काटे निघालेत. एक तू बाकी आहेस. विचार करत होतो तुला मारू की जिवंत सोडू? पण नाही तुला जिवंत सोडला तर उद्या मलाच धोका आहे. म्हणून तुला मारावेच लागेल." तो बोलला.आता पुढे…

"तुझं मी काय बिघडवले आहे की, तुला मला मारायचे आहे? पण तू मला मारच आता जगून तरी काय उपयोग? काही दिवसांपूर्वी पोलिसांकडून समजले की, माझ्या प्रज्ञाने आत्महत्या केली." कबिर बोलला.कबिरच्या बोलण्यावर तो एकदम जोरात हसला. कबिरला समजत नव्हते तो असा का हसतो आहे?
खोलीतून हसण्याचा आवाज येताच बाहेर चहा पिऊन आलेला हवलदार पळतच आत आला.

"कोण आहे इथे?" हवलदार साठे आत येत बोलला.


"मी." तो मागे न वळताच बोलला.

त्याच्या आवाजातील जब्बर हवलदार साठेच्या ओळखीची होती. तोपर्यंत साठे त्याच्या समोर येऊन उभा राहिला.


"स स साहेब, विशाल साहेब तुम्ही? इथे?" हवलदार साठे सलाम ठोकत बोलला.


"हो मीच. ह्याची केस माझ्या कडेच होती, म्हणून म्हटलं एकदा भेटाव. तुम्ही कुठे होते साठे? मी आलो तेव्हा इथे पाहाऱ्यावर कोणीच नव्हते. असे कोणी नसताना मारेकरी आले म्हणजे?" इन्स्पेक्टर विशाल हा तोच माणूस होता जो कबिरला मारायला आला होता. त्याने साठेला चांगलेच बजावले."साहेब. घसा सुकला होता म्हणून चहाचे दोन घोट घ्यायला गेलो होतो. चूक झाली साहेब, माफ करा." साठे घाबरत बोलला.


"ठिक आहे जा तुम्हीं. मी आहे इथे. जा जरा पाय मोकळे करून या." इन्स्पेक्टर विशाल एक भुवई उंचावून बोलला.


"नाही साहेब मी बसतो बाहेर. तुम्हाला काही लागलं तर?" साठे.


"साठे सांगितलं ना या तुम्ही. माझं बोलून झालं की, फोन करतो तेव्हा या." इन्स्पेक्टर विशाल जरा रागावून बोलला.विशाल काही न बोलता डोळ्यानेच हवलदार साठेला न जाण्याचा इशारा करत होता. पण विशाल समोर साठेचे काही चालले नाही.


"हो, तर कुठे होतो आपण? हा प्रज्ञा, काय बोलला तू? प्रज्ञाने आत्महत्या केली! आणि तुला आता जगण्यात रुची नाही?" विशाल परत एकदा तसाच हसला."विशाल ह्यात हसण्या सारखे काय आहे?" कबिर."चल मग तुला सांगतोच आता की, मी तुला मारायला कोणाच्या सांगण्यावरून आलो आहे! मी तर एक प्यादा आहे. पण मास्टर माईंड कोणी वेगळाच आहे. तुला जेव्हा हे कळेल तेव्हा तू मरणाची वाट न बघता, स्वतः च जीव देशील आणि माझं काम सोपं होईल. अरे सांगू कशाला तुला भेटेलच ना." विशाल दाराकडे बघून बोलला.

तशी इतक्यावेळ बाहेर पदराने चेहेरा झाकून बसलेली एक स्त्री टाळ्या वाजवत आत आली. तिने आत येताच खोलीचा दरवाजा बंद केला आणि पदर बाजूला केला. तिला बघून कबिर चक्रावला. काय सत्य आणि काय असत्य हे त्याला कळत नव्हते. तो नुसता तिच्याकडे बघत होता.
डोळ्यात अनेक प्रश्न होते. ती मात्र हसत होती. डोळ्यात कसलीच भावना नव्हती. ना भीती, ना प्रेम, ना अजून काही. काहीच नव्हते. होते ते फक्त शिकारी हास्य. कबिरला विश्वास बसत नव्हता की, ही तिचं आहे की तिच्या सारखी दिसणारी अजून कोणी तरी.


मनात प्रश्न उठत होते. ती मात्र तशीच छद्मी हसत होती. काहीतरी जिंकल्याचा सुख होते त्यात, जसा जसा शिकार झाल्यावर शिकारी च्या डोळ्यात एक वेगळीच चमक असते
तसे तिचे डोळे चमकत होते.


कोण असेल ती? तुमच्या मनात देखील हाच प्रश्न असेल ना. पुढच्या भागात सगळं कळेलच.क्रमशः


© वर्षाराज

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//