Feb 28, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

शिकारी... भाग ५

Read Later
शिकारी... भाग ५मागील भागात आपण बघितले…


"मॅडम आम्हाला आमचे काम करू द्या. नाहीतर पोलिसांच्या कामात अडथळा आणण्याचा गुन्ह्यात, तुम्हाला देखील अटक करू. जे काय विचारायचे असेल ते पोलीस चौकीत येऊन विचारा." असे म्हणत लगेच त्या हवालदाराने कबिरच्या हातात बेड्या घालून त्याला घेऊन गेले.


प्रज्ञाने कशीतरी चप्पल पायात अडकवली आणि ती देखील त्यांच्या मागोमाग पोलीस चौकीत पोहोचली.


आता पुढे…"काय गर्लफ्रेंडचा काल मृत्यू झाला आणि रात्री लगेच तिच्याच मैत्रिणी सोबत रोमान्स सुरू? छान!" इन्स्पेक्टर विशाल कबिरला बघून बोलला."नाही हो, तुमचा काही गैरसमज होतो आहे. अर्पिता माझी गर्लफ्रेंड नव्हती. माझी गर्लफ्रेंड प्रज्ञा आहे. लवकरच आम्ही लग्न करणार आहोत."


"लग्न! आणि तू? अरे तुझ्या सारखी मुलं एका मुलीसोबत राहू शकत नाहीत. तू काय लग्नं करणार? प्रज्ञा मॅडम ह्याच्यावर विश्वास ठेऊ नका." मागून येणाऱ्या प्रज्ञाला बघत इन्स्पेक्टर विशाल बोलला."इन्स्पेक्टर साहेब. माझा कबिर असा नाही. माझा विश्वास आहे त्याच्यावर." प्रज्ञा


"अच्छा, तुम्ही खरे आणि पुरावे खोटे का? आमच्या हाती लागलेल्या पुराव्यांवरून आणि साक्षी वरून अर्पिताच्या खूणामागे कबिर राणेंचा हात आहे."


"साक्ष, पुरावे? कसले पुरावे? कोणी दिली साक्ष?" कबिर आश्चर्यचकित होऊन बोलला.


"पुरावे बघायचे आहेत का? हे बघ, तुझे आणि अर्पिताचे फोटो. ह्या फोटोंमध्ये तू आणि अर्पिताच आहेत ना?" इन्स्पेक्टर विशाल त्याच्याकडील फोटो कबिर आणि प्रज्ञाच्या हातात देत बोलला.


प्रज्ञा आणि कबिर ते फोटो बघून हैराण झाले.


"परी ट्रस्ट मी. माझ्या आणि अर्पितामध्ये असे काहीच नव्हते. इन्स्पेक्टर हे फोटो परी माझ्या आयुष्यात यायच्या आधीचे आहेत.
परी तुला माहीत आहे ना. अर्पिता आणि मी आधीपासून मित्र होतो आणि अर्पितामुळेच आपली ओळख झाली." कबिर विशाल आणि प्रज्ञाला बोलला.


"हो बरोबर. अर्पिता मला ह्या फोटोंबद्दल बोलली होतो." प्रज्ञा आठवून बोलली.


"अच्छा चला समजलं की, फोटो जुने आहेत. पण साक्षीचे काय? त्या साक्षीदाराने तुझ्या विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हवलदार आत घेऊन या त्यांना." विशाल बोलला.


"तू?" प्रज्ञा आणि कबिर एकदम बोलले."इन्स्पेक्टर साहेब ह्या नराधमाला सोडू नका. ह्याने अर्पिताला त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले, तिचा फायदा घेतला आणि आता जीव घेतला माझ्या बहिणीचा." अक्षय रडून रडून विशालला सांगत होता.


अक्षय म्हणजे अर्पिताचा भाऊ. काही वर्षांपूर्वी अर्पिताचे आई-बाबा दोघेही एका कार ॲक्सिडेंटमध्ये दगावले. तेव्हा पासून अर्पिता आणि अक्षय दोघेच होते एकमेकांसाठी. दोन वर्ष आधी अक्षयचे लग्नं झाले होते आणि अर्पिता गावाहून पुण्यात नोकरीसाठी आली होती.


"साहेब ह्या माणसावर अजिबात विश्वास ठेऊ नका. ह्याला त्याची बहीण नको होती. अर्पिता त्याची सावत्र बहीण होती म्हणून हा तिचा राग राग करत असे." प्रज्ञा बोलली."साहेब मान्य आहे की अर्पिता माझी सावत्र बहीण होती पण आम्ही लहानपणापासून एकत्र वाढलो. माझा खूप जीव होता अर्पितावर." अक्षय अजूनही रडत होता."तूच मारलं असशील अर्पिताला." कबिर चिडून बोलला.


"ए. आवाज खाली. हे तुझं घर नाहीये. माझं पोलीस स्टेशन आहे. कळलं?" इन्स्पेक्टर विशाल.


"साहेब मी कसा जीव घेऊ शकतो माझ्या बहिणीचा? आता परवाच फोनवर माझी बहिण मला रडून सांगत होती की, आता कबिरला तिच्यात इंटरेस्ट राहिला नाहीये. हे बघा अर्धा तास आम्ही दोघे बोलत होतो तुम्ही बघू शकता.." अक्षय फोनची कॉल लिस्ट दाखवत बोलला.


तितक्यात एक हवलदार विशालला एक पाकीट देऊन गेला.


त्याने ते पाकीट उघडले. त्यात अर्पिताचा पोस्टमोर्टम रिपोर्ट होता. विशालने तो कागद वाचून परत पाकिटात टाकला.


"प्रज्ञा मॅडम तुम्हाला अर्पिता कधी बोलली होती का, तिच्या बॉयफ्रेंड बद्दल? काही कल्पना?" इन्स्पेक्टर विशाल कागद वाचताना बोलला.


"नाही सर. मी बऱ्याच वेळा विचारलं, तर नेहमी म्हणायची की, \" वेळ आल्यावर सांगेल.\" मला तिच्यावर संशय होता." प्रज्ञा


"कसं आहे कबिर राणे. तुम्ही कितीही ओरडलात, चिडलात तरी तुमची ह्यातून सुटका होणे शक्य नाही. कारण आता जे मी वाचत होतो ना. तो अर्पिता चा पोस्टमोर्टम रिपोर्ट होता. त्या नुसतं अर्पिता तीन महिन्यांची प्रेग्नंट होती. ही गोष्ट तुम्हाला माहित होती म्हणून तुम्ही तिचा जीव घेतला." इन्स्पेक्टर विशाल.


"काय? मला ह्यातील काहीच माहीत नाही." कबिर केविलवाणा होत बोलला."तू ऽ नालायक माणसा. तुला चांगली शिक्षा मिळेल." अक्षयने धावत जाऊन कबिर ची कॉलर पकडली.


इन्स्पेक्टरच्या बोलण्याने प्रज्ञा एकदम रागावली आणि तिथून निघून गेली.


"परी ऐक माझं. मी काही केलं नाहीये. ते मूल माझं नाही. ऐक ना.!" कबिर ओरडत होता. पण प्रज्ञाने मागे वळून बघितले नाही. डोळे पुसत ती निघून गेली.


हवलदारने कबिरला ओढत नेत लॉकअपमध्ये बंद केले.


अक्षय सुद्धा तिथून निघून गेला आणि जाताना कबिरकडे बघून एक भुवई उंचावून हसला. ज्याने कबिर अजूनच चिडला.आता प्रज्ञा एकटी होती. तिच्या जिवाचा धोका अजून टळला नव्हता. पुढील भागात बघूया अजून काय होईल प्रज्ञा सोबत? खरंच कबिर प्रज्ञाला धोका देत असेल का?क्रमशः

©वर्षाराजईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//