शिकारी... भाग ४

"परी माहीत आहे मला. हे इतकं सोपं नाहीये. मला पण अर्पिताच्या जाण्याचे दुःख आहे. पण खावं तर लागेल ना?" कबिर प्रज्ञाला समजावत होता. तितक्यात पार्सल आले.


मागील भागात आपण बघितले…


"कबिरला सांगते. नको आधी मलाच पक्के समजू दे. मग सांगेल. त्याला ह्यातील काही माहीत नाही. मी ज्या गोष्टी पासून दूर जायचे म्हणून इथे पुण्यात आले आहे. ती गोष्ट माझा पिच्छा करत असेल तर?" प्रज्ञाचे विचार चक्र सुरू होते.


आता पुढे…


प्रज्ञा फ्रेश होत होती. विचारांचे वादळ डोक्यात उठत होते. होते. अर्पिताचा चेहेरा डोळ्यासमोर फिरत होता. तिची ती शेवटची किंचाळी कानात घुमत होती. प्रज्ञाने दोन्ही हातांनी कान घट्ट बंद केले. डोळ्यातून पाणी वाहत होते. आज तिने तिची चांगली मैत्रीण गमावली होती. पण त्याचे कारण काय होते हे मात्र कळत नव्हते.
दुसरीकडे कबिर बाहेर त्या मेसेजला उत्तर देत होता.


"वेळेची वाट बघ. शिकार पिंजऱ्यात अडकू दे. मग करू पारध."


थोड्यावेळात प्रज्ञा बाहेर आली. कबिरने पटकन फोन बंद करुन बाजूला ठेवला.


"परी, जेवणाची ऑर्डर दिली आहे. थोड खाऊन घे."


"नको रे काहीच मला. अजिबात घाशा खाली घास उतरणार नाही माझ्या." प्रज्ञा आसू दाबत बोलली.

"परी माहीत आहे मला. हे इतकं सोपं नाहीये. मला पण अर्पिताच्या जाण्याचे दुःख आहे. पण खावं तर लागेल ना?" कबिर प्रज्ञाला समजावत होता. तितक्यात पार्सल आले.

कबिरने ते उघडून एक ताट वाढले.

"परी, चल माझ्या हातून खा जरा." खिडकी बाहेर एकटक बघत उभ्या असलेल्या प्रज्ञाला कबिर बोलला.

इतक्या प्रेमाने तो तिला बोलत होता, त्यामुळे त्याला नाराज करायची इच्छा प्रज्ञाला झाली नाही. तिने बळेच थोडे जेवण केले. सोबत कबिर देखील जेवला.


"कबिर, आय लव्ह यू." म्हणत प्रज्ञा कबिरच्या मिठीत शिरली. डोळ्यातील पाण्याचे थेंब त्याच्या शर्ट वर पडले.


\"\"लव्ह यू टू परी." म्हणत कबिरने तिच्या ओठांवर हलकेच ओठ टेकवले.
त्याच्या स्पर्शाने ती शहारली आणि न कळत त्याच्या बाहू पाशात अडकली. त्याने मोठी अजूनच घट्ट केली. श्वास श्वासात मिसळत होते. ती रात्र दोघे सोबत होते. दुःख विसरून प्रेमात बुडाले होते. पण नियती ने वेगळाच डाव मांडला होता. त्यांना कोणीतरी बघत होते. येणारी सकाळ प्रज्ञासाठी नवीन संकट घेऊन येणार होती, ह्याची तीळ मात्रही जाणीव त्या दोघांना नव्हती.


दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांनी दार वाजवले. कबिरने झोपेतच दार उघडले.
त्याच्या मागोमाग प्रज्ञा देखील बाहेर आली.


"मिस्टर. कबिर राणे, तुम्हाला अटक करण्याचे आदेश आहेत. हे ह्या तुमचा अरेस्ट वॉरंट." पोलिसांनी कबिरच्या हातात कागद दिला.


"पण माझा गुन्हा काय आहे? कशासाठी मला अटक करण्या येत आहे सांगा तरी." कबिर भांभावून बोलला.

"ते तुम्हाला पोलिस स्टेशनला कळेलच." एक हवलदार


"थांबा. तुम्ही त्याला असे नेऊ शकत नाही. त्याने काय केले आहे आम्हाला कळलेच पाहिजे." प्रज्ञा रडवेली झाली होती.


"मॅडम आम्हाला आमचे काम करू द्या. नाहीतर पोलिसांच्या कामात अडथळा आणण्याचा गुन्ह्यात, तुम्हाला देखील अटक करू. जे काय विचारायचे असेल ते पोलीस चौकीत येऊन विचारा." असे म्हणत लगेच त्या हवालदाराने कबिरच्या हातात बेड्या घालून त्याला घेऊन गेले.


प्रज्ञाने कशीतरी चप्पल पायात अडकवली आणि ती देखील त्यांच्या मागोमाग पोलीस चौकीत पोहोचली.


का बरं कबिरला अटक झाली असेल? कोण असेल ह्या मागे?
बघूया पुढील भागात.


क्रमशः

©वर्षाराज


🎭 Series Post

View all