गोष्टी मनात साठत गेल्या ना की नंतर खुप त्रास होतो. कदाचित त्या व्यक्ती कडे पहाण्याचा दृष्टीकोनही बदलतो, जर दृष्टीकोनच बदलला तर ते खोटं वागल्यासारखचं होतं! झालं ना ज्या त्या गोष्टी जेव्हाच्या तेव्हा स्पष्ट केलेल्या बऱ्या असतात ना. कारण आपल्याला दिसत असतं तसं नेहमीच नसतं ना. कदाचित तुम्हाला माहीत नसलेली कारणही असु शकतात की. विश्वास महत्त्वाचा! पण, विश्वास ही कधी कधी डगमगतोच.... मग आजवर ठेवलेल्या त्याच विश्वासाच्या हक्काने एकदा विचारावं की! ....
मग कळेल की behind the story काय गल्लत झालेली ते... प्रत्येकाची व्यक्त होण्याची पद्धत वेगळी असते! पण आपली व्यक्ती दुरावु नये म्हणून साठवून ठेवणं हे ही चुकीच ना. कारण खुप गोष्टी साचत गेल्या की ते नातं कुठे तरी गुदमरून जातं ...
मग ना धड संवाद,
ना धड वाद....
मधल्या मधे गुंफून पडलेला मोडका संवाद....
आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तर मागताना थोडे वाद होतील! पण it's ok ना..... नंतर पुढे जाऊन नाती तुटण्यापेक्षा आताचे वाद जास्त बरे! बोलुन खुप प्रश्न सुटतात पण न बोलण्याने खुप निर्माण होतात. इतकही नका साठवून ठेवू की त्या गोष्टी मुळे नातं दुरावेल....
कारण नाती जपताना जर मी कधी चुकले तर तु मला सांभाळ आणि तु कधी चुकलास तर आहेच की मी तुझ्या बरोबर तुला सांभाळायला. मान्य आहे की तुटलेले धागे जशेच्या तसे जोडता येत नाही पण त्याचं तुटलेल्या धाग्याना छान नव्याने गुंफता तर येऊच शकतं ना.
फक्त थोडे प्रयत्न करायचे! मग धाग्याचे रंगही उत्तम उठुन दिसतात.... आणि तयार होते एक सुंदर नक्षी....
© किर्ती वेंगुर्लेकर