अपुर्ण माणस असतात, प्रेम नाही भाग १३

प्रतीक ने मन लावून परीक्षा दिली पण शेवटच्या पेपरच्या वेळी अपर्णाच ते पाउल त्याला थोड मागे खेचत होती. प्रतीक ने सर्व कागदोपत्री काम करून घेतले होते, यात त्याच्या मामाची मुलगी घरीच होती हे त्याच्या लक्षातच आल नाही.

“दिदी सॉरी न, आता तोच स्वतः उठुन आला तर काय करू मी?” रोहिणीची बहीण तिला  मनवत  होती. पण रोहीणी काही तिच्याशी बोलत नव्हती.

“मी त्यालाच नाव सांगेन ह तुझ” रोहीणीची बहीण. 

“काय खुसुर पुसुर चालु आहे तुमची?” रोहीणीची आई त्या दोघींच्या जवळ येत बोलली.

“काही नाही ग आई, दिदी जरा भाव खात होती” रोहीणीची बहीण 

“ते जाउ दे चला जेवायला बसुन घेउ” रोहीणीची आई 

सगळ्याची जेवण झाली.

प्रतीक घरी जायला निघणार तेवढ्यात रोहीणीची आई बोलली, “थांब रे जरा, घरी जाऊनही काय करशील”

प्रतीकला तिचे विनाकारण थांबण थोड ऑकवर्ड फिल करत होत.

“तेवढा कॉम्प्युटर बंद पडला हा बघ ना जरा” रोहीणी प्रतीकला बोलली.

प्रतीक ने त्यांचा कॉम्प्युटर चालु करून पाहीला, पण ते चालु झाला होता. पण सी ड्राईव्ह गरजेपेक्षा जास्त भरली असल्याने तो खुप स्लो काम करत होता. प्रतीक ने ते सर्व व्यवस्थित करून दिले.

प्रतीक घरी जायला निघाला तसा रोहीणी ची आई बोलली, “रात्री ८ वाजता येरे जेवायला” प्रतीक हो म्हणून निघाला.

रोहीणी दारापर्यंत आली.

“थोडा लवकर आलास तरी चालेल” मिश्कील होत रोहीणी बोलली. प्रतीक हसतच घरी निघुन गेला.

आजचा दिवस खूप हळुहळु चालत असल्यासारखा प्रतीकला भासत होता.

संध्याकाळपर्यंत चा वेळ कसातरी त्याने घालवला, त्याला चहा ची तलफ आली. घरात दुध होतच, त्याने गरम करत ठेवल.

रोहीणी तिच्या लहान बहीणी सोबत प्रतीक च्या घरी आली.

“काय करतोयस रे?” रोहीणी

“चहा, घेणार का?” प्रतीक

“तुला येतो?” रोहीणी

“हा मग” प्रतीक कॉलर ताठ करत बोलला.

“हो बाजु, मी करते” रोहीणी ने प्रतीकला बाजुला केल, तसा प्रतीक सोफ्यावर जाऊन बसला.

“घरात, पाण्याचा ग्लास उचलायला सांगीतला तर नखरे करते, आणि इथ चहा बनवुन राहीली न, थांब आईला सांगते मी. रोहिणीच्या बहिणीने रोहीणी ला टोमणा मारला.

“गप न तु” रोहीणी ने रागात सांगीतल.

प्रतीक मात्र मनातल्या मनात उडत होता. तिघांनी चहा चा आस्वाद घेतला आणि घरातच कॅरम खेळत बसले.

रात्री जेवणाच्या वेळेस मात्र रोहीणीची मोठी बहीण प्रतीकला उगाचच त्रास देत होती. त्याला वाकवून त्याच्या पाठीमागून जा, प्रतीकला चिमटाच काढ.

“ताई नको न, जेउ दे न त्याला निट” रोहीणी चिडत बोलली.

तशी रोहीणीची मोठी बहीण हसत बेडरूममध्ये निघुन गेली.

दोन दिवस प्रतीक कॉलेजला कमी आणि घरी जास्त होता.

प्रतीक ची तिसऱ्या वर्षाची फायनल परीक्षा सुरू झाली. सगळे पेपर्स प्रतीकला खुप छान गेले होते.

शेवटचा पेपर बाकी होता. ४ दिवस बाकी होते पेपरला.

प्रतीकला अभ्यास करताना वाटुन जायच की, उगाच एवढी सुट्टी दिली, एक पेपर साठी, नाहीतर कधीच मोकळा झालो असतो.

दुसऱ्या दिवशी पेपर होता, प्रतीक आदल्या दिवशी त्या पेपरची रीतीने करत बसला होता. त्या दिवशी सगळे घरात होते. प्रतीक चे मामा मामी, मोठ्या मामाची मुल ही प्रतीक च्या घरी आलेली होती.

दुपारची वेळ होती. प्रतीक च्या बहिणीला घराबाहेर पडायला मनाई केलेली होती. पण एवढया पाहुण्यांच्या घोळक्यात अपर्णा ने संधी साधून घरातुन पळ काढला. सगळ्यांना वाटत होत की, ती तिच्या आईसोबत गेली. पण प्रतीक ची आई येताना एकटीच आली. तेव्हा कळल की अर्पणा घर सोडून पळाली होती.

प्रतीक चे वडील प्रतीक सोडुन सगळ्यांवर राग राग करत होते, पण प्रतीक कडे बघत ही नव्हते. प्रतीक ने वारंवार जाणीव करून दिलेली असताना, त्यांनी फक्त प्रतीकवरच संशय घेतला याच त्यांना वाईट वाटत होत.

तो पुर्ण दिवस अपर्णा ला शोधण्यात गेला. अपर्णा च्या वही वरून एक दोन नंबर शोधुन काढले प्रतीक ने, त्यावर कॉल केले. नंतर एका कॉल वर ती निट आहे एवढच कळल.

संध्याकाळी डायरेक्ट पोलीस स्टेशन मधुन बोलावण आल. प्रतीक चे वडील आणि मामा तिकडे गेले होते.

“मला आणि माझ्या नव-याच्या जिवाला माझ्या वडिलांपासून देता आहे. अशी अपर्णा ने कंप्लेंट केली होती. प्रतीक च्या वडीलांची तर वाचाच बसली ते ऐकून. प्रतीक च्या मामांनी तिथली बाकी प्रोसेस पुर्ण केली आणि घरी निघुन आले.
जिला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपल, आजवर तिच्यावर कधी हात उगारला नाही, आज तिनेच अशी कंप्लेंट करावी, काय वाटत असेल त्या बापाला.

प्रतीक ची रीवीजन झालीच नाही, तो तसाच दुसऱ्या दिवशी पेपरला गेला, त्याचा अभ्यास आधीच झाल्याने एवढा लोड नाही आला, पण आलेल्या टेन्शन ने त्याला थोडफार विसरायला होत होत.

जवळपास महीनाभर प्रतीकवर घरात कोणीच चिडचिड केली नाही. प्रतीक ही शांत होता, त्याला त्याच्या घरच्यांची अवस्था बघितली जात नव्हती. पण बोलत कोणीतरी नव्हत.

पण प्रतीक संध्याकाळी टेरेसवर जाउन रोहीणी जवळ मन मोकळे करत असे .

पहीले तर रोहीणीची आई तिला पाठवत नसे प्रतीक वर असला की, पण एके दिवशी रोहीणीच तिच्या आईला बोलली.

“चुक तिने केली, त्यात प्रतीक ची काय चुक?” रोहीणी थोड्या मोठ्या आवाजात बोलली.

“तोंड संभाळुन बोल, तुझ्या आई समोर बोलतेस तु, आणि तुला का एवढा पुळका आला?” रोहीणीची आई तिला रागात बोलली.

“आजवर तो इतका वेळा आला घरी, एकदा तरी जाणवल का काही चुक केली त्याने की, त्याची नजर वाईट होती?” रोहीणी च्या प्रश्नाचे उत्तर तिच्या आईजवळ नव्हते.

त्यांनाही माहीत होते की प्रतीक एक चांगला मुलगा आहे.

रोहीणीने प्रतीकला बराच मानसीक आधार दिलेला होता.

थोड्याच दिवसांनी अपर्णाचा नंबर प्रतीक च्या घरच्यांना मिळाला. प्रतीक चे आई वडील, प्रतीक ला अपर्णाला भेटायला पाठवत होते. पण प्रतीक ला तिच्या बहीणीवरचा राग गेलेला नव्हता. तिने पळुन जाउन लग्न केल यापेक्षा तीने तिच्याच वडीलांच्या विरोधात पोलीसांत तक्रार केली याचा राग होता.

रोहीणी ने त्याला जायला सांगीतल तेव्हा तो गेला. थोड्या दिवसांनी ती घरी पण आली. त्यांच्या घरातली परीस्थिती जैसे थे होऊ पहात होती. अपर्णा ला लाडात घेत प्रतीककडे परत दुर्लक्ष व्हायला लागल.

प्रतीक त्याच ग्रॅज्युएशन चांगल्या मार्गानी पास झाला. ही बातमी प्रतीक ने पहीले रोहीणी ला सांगीतली. तिने नेहमीप्रमाणे डेरी मिल्क त्याला दिली.

“ऐक ना, बाबा मला बी एड ला अॅडमिशन घ्यायला सांगत आहे” प्रतीक
“चांगल आहे न मग” रोहीणी

“पण मी माझा नंबर लांबच्या कॉलेजला लावुन घेणार आहे” प्रतीक दुसरीकडे बघत बोलला.

रोहीणी काहीच बोलली नाही, तिला कळुन चुकल होत की, घरात परत तसच काही व्हायला सुरवात झाली असेल.

तिने प्रतीक चा हात हातात घेतला, ती त्याच्याच सोबत असल्याची जाणीव करून दिली.

प्रतीक ने बी एड ला नंबर लावताना, बाहेर गावच्या कॉलेजला पहिली पसंत दिली होती. जे त्याने घरी सांगीतल नव्हते.

पण शेवटी त्याचा नंबर त्याच्या तालुक्याच्या ठिकाणीच लागला होता.
प्रतीक ने ते पण अॅक्सेप्ट केल. अपर्णाच्या एका पावलामुळे प्रतीक च्या आई वडीलांना त्यांच्या नातेवाईकांचे खुप काही एकुन घ्यावे लागले होते. कारण त्यानी अपर्णा चे प्रमाणाबाहेर लाड केलेले पाहीले होते. काहींना मुलीचे लाड केल्याचा राग होता, तर काहींना प्रमाणाबाहेर लाड केल्याचा.

एके रात्री प्रतीक, आणि त्याचे आई वडील जेवण करून झोपले होते. प्रतीक चे वडील रात्री उठुन बसले, त्यांना चक्कर या याला लागली होती. त्यानी प्रतीक जवळ पाणी मागीतले. प्रतीक ने पाणी आणुन दिले. पाणी पिल्यावर त्यांना जरा बर वाटल पण त्यानी परत स्वतः ला बेडवर झोकून दिल. छातीत दुखतंय बोलत होते, प्रतीक आणि त्याची आई त्यांचे हात पाय चोळत होती, छाती दाबत होते. दोघांनाही कळत नव्हते कोय करायच ते.

रात्री १.३० चा सुमार, प्रतीक तसाच गावत निघाला, त्यांच्या इमारतीमध्ये राहणारे डॉक्टर बाजुच्या इमारतीत रहायला गेले असल्याने प्रतीक तिकडे केला, डॉक्टर ला घेउन आला. प्रतीक च्या वडीलांनी डोळे लावून घेतले होते. त्यांचा बीपी खुप वाढला होता. डॉक्टरांनी त्यांना तालुक्यातील हॉस्पिटहलवायला सांगीतले, तोवर इमारतीमधील काही लोक प्रतीक च्या घरी आले होते. एकाची गाडी घेउन ते तालुक्याला आले. तिथल्या डॉक्टरांनी ब्रेन हॅमरेज झाल्याचे सांगीतले. तिथुनही त्यांना जिल्ह्यातील हॉस्पिटल ला जाषला सांगीतले. तिथल्या हॉस्पिटल नी अॅम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली.

पण त्या हॉस्पिटल ला पोहोचेपर्यंत काळाने घात केला होता. प्रतीक च्या वडीलांची प्राणज्योत मावळली होती. प्रतीक ने सर्व नातेवाईकांना कॉल केला, जेवढे जवळ होते रहायला तेवढे हॉस्पिटल ला आले होते. हॉस्पिटल च्या बाकी प्रक्रिया नातेवाईकांनी केल्या आणि ते तसेच गावाला निघुन गेले. प्रतीक च्या वडीलांना गावाला अग्नी दिला.

जवळपास १५ दिवसांनी प्रतीक आणि घरचे घरी परत आले. डोळ्यातले अश्रू प्रतीक ने बांधुन ठेवले होते.

इमारतीतील सर्वच येउन गेले घरी.

प्रतीक ने कागदोपत्री प्रक्रिया करुन घेतली. वडीलांच्या ऑफिसला अर्ज देणे, आईच्या नावाची पेन्शन चालु करणे, मृत्यू चा दाखला, प्रतीक ची बरीच धावपळ झाली. यात जवळपास २ ते ३ महिन्याचा कालावधी गेला. प्रतीकच बरच कॉलेज बुडाल होत. शेवटी त्यानेही जाउन त्याच अॅडमिशन रद्द करून आला. घरात धावपळ करणार त्याच्या व्यतीरीक्त कोणी नव्हते आणि कोणीतरी कॉलेज इतक्या सुट्ट्या देणार नव्हते. यावेळेस त्याला त्याच्या ग्रॅज्युएशन च्या कॉलेजची खुप आठवण आली, कारण त्या कॉलेजला असता तर त्याला सहज सुट मिळाली असती.
प्रतीक च्या आईची पेन्शन सुरळीत चालु झाल्यावर प्रतीकला थोडी उसंत मिळाली.

ब-याच दिवसांनी तो रोहीणी ला भेटला. तसा त्याचा अश्रूंचा बांध फुटला. खुप पडला तो. रोहीणी ने त्याला रडु दिल.

बरेच दिवस झाले, प्रतीकच्या मोठ्या मामाची मुलगी तिच्या घरी जायच नावच घेत नव्हती. इतके दिवस प्रतीकच लक्ष नव्हत पण आता जरा मोकळा झाल्याने त्याला लक्षात आले होते.

ति बाहेर गेल्यावर प्रतीक ने तिच्या आईला विचारले, “ही कधीपर्यंत आहे घरी?” प्रतीक

“का?” प्रतीक ची आई

“ते बरेच दिवस झाले, मामा विचारत असतील न, म्हणून” प्रतीक.

“तुला माहीती नाही ती का आलीये इथे?” प्रतीक ची आई

आईच्या या प्रश्नावर प्रतीक बघत राहीला…

क्रमशः

🎭 Series Post

View all