अपुर्ण माणस असतात, प्रेम नाही भाग १२

रोहीणी आजारी असुनही, प्रतीकला भेटायला टेरेसवर गेली होती. तो घरी असताना सर्व गोष्टी त्याला जागेवर दिल्या होत्या, पण तिची बहीण घरी असुनही प्रतीकला उठला लागल म्हणून ती चिडली.

अंधार पडत आला होता. प्रतीक परत घरी जायला निघाला.

“असा न भेटताच चालला?” रोहीणी वर येत बोलली. प्रतीक ने रोहीणी कडे पाहीले तिचा आवाज जरा वेगळा वाटला, डोळेही थोडे निस्तेज वाटले.

“काय ग बरी आहेस न?” प्रतीक तिच्या जवळ जात बोलला. तशी रोहीणी मागे झाली. आज पहील्यांदा अस होत होत की, प्रतीक जवळ जात असताना रोहीणी लांब रहात होती.

“काही नाही रे, आज थोडी थकली होती, म्हणून जर झोपलेली” रोहीणी प्रतीक ची नजर टाळत बोलली. प्रतीक तिच्या गळ्याला होत लावणार तोच, रोहिणीची मोठी बहीण टेरेस वर आली.

“समजत नाही का ग तुला, थोड बर वाटल तर लगेच उठुन आलीस, कुठे पळुन नाही जाणार तो” रोहिणीची मोठी बहीण तिला रागवत बोलली.

प्रतीक ने तिचा आवाज ऐकला तसा त्याने त्याचा हात खाली घेतला होता.

“आणि तु रे, तुला पण कळत नाही का, ती आजारी आहे ते?” रोहीणी ची मोठी बहीण

“विचारल तिला, ती सरळ नाही म्हणाली मला, बघतच होतो तेवढ्यात तु आलीस” प्रतीक ने रोहिणीच्या गळ्याला होत लावून बघीतल, अजुनही ताप होता. रोहीणी आता बारीक तोंड करून उभी राहीली.

“घरी जाउन आराम कर तु” प्रतीकने रोहीणीना सांगीतल.

“”मला बर वाटतय, असही घरात थांबून कंटाळा आला होता, जरा मोकळ्या हवेत फिरेल तर अजुन बर वाटेल, तुला जायच असेल घरी तर जा” रोहिणी थोडी रागातच बोलली. इतक्या दिवसांनी आला तर आला आणि मलाच घरी पाठवतो रोहीणी मनातच बोलली.

“कस व्हायच या पोरीच?” रोहिणीच्या मोठ्या बहीणीने डोक्याला होत लावला.

“आहेस न तु थोडावेळ, ही नाही ऐकणार आता” रोहीणीची मोठी बहीण हळुच प्रतीकला बोलली. ती खाली निघुन गेली.

“कसला हा हट्टीपणा?” प्रतीक
“तुला बोलली न, तुला जायच तर जा” रोहीणी नाराज होत बोलली.

प्रतीक ने आणलेली कॅडबरी तिच्यासमोर धरली.

“काळजी करण्याचा अधिकार तर जीव लावणा-या प्रत्येकाला असतो न, मग स्वत: अस वागून कस चालेल??” प्रतीक.ने तिचा हात हातात घेतला, “बघ किती गरम आहे अंग तुझ”

“तु घेतला न आता हात हातात, लगेच बर वाटेल” रोहीणी ने त्याच हाताची बोट प्रतीकच्या बोटात गुंतवत बोलली.

“नौटंकी, जा आता जाउन गप्प आराम कर.” प्रतीक

“नको न, आताच तर आला आहेस तु” रोहीणी

“मी उचलुन घेउन जाईल तुला घरी, पाहीजे तर एक दिवस पुर्ण तुझ्या घरी बसेल तुझ्याशी बोलत” प्रतीक

“आला मोठा मला उचलुन नेणारा, चालली मी आता, पण तु फक्त येउ नकोस, मग बघते तुला” रोहीणी नाक उडवत बोलली.

प्रतीक ने रोहीणीच्या गालावर हात ठेवत, “हा चेहरा हसतानाच छान दिसतो.”

प्रतीक ने रोहिणीला घराजवळ सोडल, “काय काकु पोरीकडे लक्ष नाही काय, एवढ्या तापात तिला वर जाउ दिल?” प्रतीक रोहीणीच्या आईची मस्करी करत बोलला.

“गप रे शहाण्या, एवढीच काळजी होती तर घरी पाठवुन द्यायच होत न, थांबवल कशाला मग तीला?? रोहीणीची आई हसतच बोलली, रोहिणीला आतमध्ये घेतल.

“हे काय, मी सोडायलाच तर आलो होतो” प्रतीक घरी निघुन जातो.

प्रतीकच डेली रुटीन चालु झाल होत. प्रतीक रोज सकाळी कॉलेजला पोहोचला की रोहिणीला कॉल लावत असे, चांगला अर्धा एक तास बोलायचे दोघ. कॅम्प चे रिपोर्ट बनवणे बाकी असल्याने त्याला घरी यायला उशीर व्हायचा. मग संध्याकाळी काही त्यांची भेट होत नसे.

ऐके दिवशी बसचा संप झाला, तोही नेमकी दुपारी. प्रतीक तर त्या दिवशी घरीच होता. पण रोहीणी मात्र कॉलेजलाच अडकली होती.

“अरे प्रतीक, काकु बोलवत आहेत तुला” प्रतीक ची आई प्रतीक ला बोलली 

“कोण ग?” प्रतीक, “रोहीणीची आई रे” प्रतीक ची आई
प्रतीक घराबाहेर आला.

“काय झाल काकु?” प्रतीक 

“तुला बाईक चालवता येते का रे?” रोहीणीची आई 

“”हो येते न,” प्रतीक 

“अरे रोहीणी तिकडे अडकली आहे तिला घेउन यायच आहे” रोहीणीची आई.
प्रतीकच्या मनात तर उकळ्या फुटु लागल्या.

“पण गाडी?” प्रतीक 

“गाडी आहे रे, चालवणार कोणी नाही न, तुला चावी देते, जा घेउन ये तिला” रोहीणीची आई.

प्रतीक गाडीची चावी घ्यायला त्यांच्या घरी गेला. तिथे जाउन पहातो तर, रोहीणीचा मावसभाउ सुजेल पाय घेउन बसला होता.

“ह्याला काय झाल?” प्रतीक रोहीणी च्या आईला विचारतो.

“अरे हाच जाणार होता, पण ह्या दोघांची मस्ती चालु होती, तर ह्याच्या पायाला लागल, मग तो सुजला” रोहीणीची आई रोहीणीच्या छोट्या बहिणीकडे बघत बोलली.

प्रतीक ने रोहीणीच्या छोट्या बहिणीकडे पाहील, तीने हळुच डोळा मारला. प्रतीक ने मनातल्या मनात डोक्याला हात मारला.

रोहीणी ने तिच्या छोट्या बहिणीला सांगुन ठेवल होत की घ्यायला यायला प्रतीकच आला पाहीजे, तिला दुसर काहीच सुचल नाही तिने त्या मावसभावाच्या पायात पाय अडकवून त्याला पाडल होत.

“आई मी आलो ग जाउन, काकुनी रोहिणीला घ्यायला जायला सांगीतल आहे” प्रतीक त्याचा आईला बोलला.

“जाशील कसा?” प्रतीक ची आई

“त्यांची गाडी आहे, ती घेउन जाईल” प्रतीक.

“ठिक आहे, हळु हळु जा, आणि सांभाळुन ये” प्रतीकची आई

प्रतीक गाडी घेऊन निघाला. नेहमीपेक्षा तोडी जोरात चालवत गेला तो. कॉलेजला पोहोचून त्याने रोहिणीला कॉल लावला. तिने कोलेज पासुन बरच पुढे जाउन त्याला थांबायला सांगीतले.

रोहीणी प्रतीक जवळ आली. तिच्या कोणी मैत्रीणी तर दिसत नाही न ते बघुन ती बसणार तेवढ्यात प्रतीक बोलला.

“बॅग पुढुन घे तुझी” प्रतीक

“का?” रोहिणीला समजल नाही असा का बोलतोय तो.

“बॅग मागे राहीली तर बाईकला झटके बसतील तोल जाईल, आणि आपण पडु” प्रतीक.

तिला घ्यायला  जोरात जाणारा प्रतीक तिला घेउन येताना मात्र हळुहळु येत होता. घरी पोहोचायला पाउण तास तरी लागणार होता.

“प्रतीक मला भुक लागलीये” रोहीणी

“हा पोहोचु आपण घरी थोड थांब” प्रतीक गाडी चालवत.

रोहीणी ने डोक्याला हात मारला. तिला त्याच्यासोबत अजुन वेळ घालवायचा होता. आणि तो घरी पोहोचु म्हणून बोलत होता.

“मला आत्ता खायच आहे, थांबव गाडी.” रोहीणी थोड जोरात बोलली.

प्रतीक ने एक स्नॅक्स कॉर्नर बघुन गाडी थांबवली.

“काय खाणार?” प्रतीक

“जे तुला आवडत तेच, भेळ” रोहीणी हसत बोलली.

प्रतीक मनातच विचार करतो, मी कधी हिला सांगीतल मला भेळ आवडते ते.
“त्या दिवशी काकु बनवत होत्या तेव्हा त्या बोलल्या मला” रोहीणी प्रतीक च्या चेहऱ्याकडे बघत बोलते.

“तु न नेहमी शॉक देतेस मला “ प्रतीक ने भेळ ची ऑर्डर दिली. रोहीणी ने डोळे मिचकावले. दोघांनी भेळचा आस्वाद घेतला.

“तुझ्या मावस भावाला माझ्याकडुन सॉरी सांग” प्रतीक

“का?” रोहीणी

“कळेल घरी गेल्यावर” प्रतीक हसतो.

ते  घरी निघुन आले.

रोहीणी ने घरी जाउन राहील आणि डोक्याला हात लावला.

“सरळ तोंडाने बोलली असती तरी चालेल असत, अस पाडायची काय गरज होती? रोहीणीचा मावसभाउ

“सॉरी न, पण पाडायला नव्हत सांगीतल” रोहीणी

“तुम्हाला नंतर बघेल मी” मावसभाउ. दोघी हसतात.

“एक न आई, अपर्णा ना कोणाशीतरी सारखी बोलत असते, , बघ फोन नेहमी बिझी लागतो तिचा” प्रतीक ने तिच्या आईला सांगत होता. त्याने फोन बिझी कसा लागतो, नेटवर्कच्या बाहेर कधी असतो, सर्व समजावुन सांगीतल होत. प्रतीक च्या कानावर आल होत की अपर्णा च एका टपोरी टाईप मुलासोबत अफेअर चालु आहे. पण डायरेक्ट कस सांगायच म्हणून अस बोलुन बघत होता तो. पण झाल उलटच.

“तिचा तर नाही पण तुझाच फोन बिझी लागतो” प्रतिक चे वडील प्रतीकला रागवत बोलले.

प्रतीक ने त्याच्या मोबाईल चा कॉलचा टाईम आणि त्यांनी केलेल्या कॉलचा टाईम मॅच करून दाखवला. त्यांचा फोन तेव्हाच यायचा जेव्हा प्रतीक त्याच्या मित्र किंवा सरांशी बोलत असायचा.

प्रतीक तिथुन निघुन गेला.

प्रतीक त्याच्या दुसऱ्या वर्षातही पहील्या नंबर ने पास झाला होता. तिस-या वर्षात प्रतीक ने कॉलेजच्या सर्व प्रोग्राम मध्ये भाग घ्यायच ठरवल होत. त्याने डान्स मध्ये ही भाग घेतला होता.

“तुला येत नाचता?” रोहीणी

“हा मग, तु नाही नाचवत मला कधी कधी” प्रतीक तिची मस्करी करतो.

“कोणता डान्स करणार?” रोहीणी

“सालसा” प्रतीक रोहिणीची फिरकी घेत बोलला.

“म्हणजे दुसऱ्या मुलीसोबत चिपकुन नाचणार तु?” रोहीणी जेलस होत.

“हा आता तो डान्स तसाच आहे तर करणार काय न?”प्रतीक मासुम होत बोलला.

“जा तिच्याशी जाउन बोलत जा” रोहीणी नाराज होऊन निघाली.

प्रतीक ने तिचा हात पकडला, “तुला का राग आला?”

“जा मला नाही बोलायच तुझ्याशी” रोहीणी हात सोडविण्याचा प्रयत्न करत बोलली.

प्रतीक ने तिला मागे ओढली तशी रोहीणीची पाठ प्रतीक च्या छातीवर जाउन आदळली. रोहीणी शांत झाली. त्याचे गरम श्वास रोहीणीला तिच्या कानाजवळ जाणवले.

“गोंधळ आहे देवीचा” प्रतीक रोहीणी च्या कानात बोलला. तशी रोहीणी हसली. प्रतीकने रोहीणीला आपल्याकडे वळवल.

“चालेल न, डान्स?” प्रतीक

“हो” रोहीणी.

प्रतीक चा डान्स पहायला रोहीणी पण आली होती. त्याला नाचताना पाहुन तीला खुप भारी वाटत होत. त्याने गोंघळच्या वेशात केलेला तो गोंधळ सगळ्यांना खुप आवडला होता.

नंतर प्रतीक ची कॉलेजची सहल निघाली होती जयपुर, राजस्थानसाठी. तेव्हा पण रोहीणी ने तिचा फोटो प्रतीक च्या मोबाईल मध्ये टाकुन दिला होता.

तिथुन येताना प्रतीक ने तिच्यासाठी पण तिथला एक पारंपारीक पध्दतीचा नेकलेस आणला होता. पण घरी घेउन गेलो तर विचारतील घरातले, म्हणून तो द्यायचा कसा हा विचार करत राहीला.

तो स्टॅंड वर उतरला. त्याच्या काही मित्रांना त्यांच्या घरचे घ्यायला आले होते. प्रतीक च्या घरातुन मात्र कोणाला वेळ च भेटला नाही. तो स्टॅंडच्या बाहेर पडणार तोच, रोहीणी तिच्या मोठ्या बहीणी सोबत त्याच्यासमोर अचानक आली.

“काय मग, खाउ आणला की नाही आम्हाला?” रोहीणी ची मोठी बहीण

“हो मग, ये घरी” प्रतीक. रोहीणीची मोठी बहीण प्रतीक सोबत चालत होती.

रोहीणीला त्याच्याशी बोलायला संधीच देत नव्हती. प्रतीक ची अस्वस्थता ही वाढत चालली होती. त्याला कसही करून तो नेकलेस तिच्यापर्यंत पोहोचवायचा होता. रोहीणीची बहीण मात्र मनातल्या मनात हसत होती. जसे ते इमारतीच्या आकाराच्या एका कोपऱ्यात पोहोचले, तशी रोहीणीची बहीण बोलली, “काय द्यायच घ्यायच आहे ते घ्या पटकन, आणि कधीतरी आमच्यासाठी पण आणाव गिफ्ट” ती पुढे निघुन गेली.

“माहीत नाही तुला आवडेल की नाही, पण बघ” प्रतीकने हळुच नेकलेस तिच्या हातात दिला. तिने तो पटकन घेत रूमालात गुंडाळला. ते दोघेही घरी निघुन आले.

प्रतीक ने दुपारी पुर्ण आराम केला, आणि संध्याकाळी नेहमीप्रमाणे टेरेसवर गेला.

“हे बर आहे, कामासाठी आम्ही, आणि काम झाल की हम आपके है कौन?” रोहीणीची लहान बहीण.

प्रतीक गोंधळून तिच्याकडे बघतो. तो उभा असताना ती मागुन येउन त्याला विचारत असते.

“तुलाच विचारते मी” रोहीणीची बहीण

“मी काय केल?” प्रतीक

“हे बघ तुमच जे काही चालु आहे, त्याची साक्षीदार आहे मी, तर मला पण काहीतरी गिफ्ट मिळाल पाहीजे न?” रोहीणीची बहीण डोळे उडवत त्याला बोलली.

प्रतीक ची ततपप झाली, “तस काही नाहीये, उगाच काही बोलु नकोस”

“जा मी मदतच नाही करणार तुम्हाला” रोहीणीची बहीण लटक्या रागात निघाली.

प्रतीक ने तिच्या समोर राजस्थानी टाईप ब्रेसलेट धरल. त्याने १० १२ तसे ब्रेसलेट घेउन ठेवले होते, बाकी वाटुन दिले होते, २ ते ३ त्याच्याकडे राहीले होते, त्यातल एक त्याने तिला दिल.

रोहीणीची बहीण खुश झाली. रोहीणी ही मागुन आली. रोहीणीची बहीणीने तिला ब्रेसलेट दाखवले.

“छान आहे न?” रोहीणीची बहीण

“हो खुप छान आहे.” रोहीणी प्रतीक कडे बघत बोलली. तिला तो नेकलेस खुप आवडला होता.

प्रतीक ने तिच्या बहीणीलाही ते ब्रेसलेट दिल होत, पण तिने आवडल नाही म्हणून सरळ दुर्लक्ष केल. तशी प्रतीक ला कल्पना होतीच अस होइल त्याची. पण बाकीच्यांना आवडल्याने त्याने काही मनाला लावून घेतल नाही.

प्रतीकचे शेवटच्या वर्षाचे पेपर सुरू होणार होते. त्या दिवशी प्रतीक कॉलेजमधून घरी येत होता. त्याच्या घरासमोर रोहीणी आणि तिची आई उभी होती.

“दोन दिवस त्याच्या जेवणाच बघा, आम्ही जरा गावाला जाउन येतो” प्रतीकची आई रोहीणीच्या आईला बोलत होती.

प्रतीकला प्रश्न पडला हे कुठे चालले अचानक. पण त्याने त्याचा जास्त विचार नाही केला, दोन दिवस त्याला आरामात रहाता येइल यातच खुश झाला.

प्रतीकचे आई वडील आणि बहीण दुसऱ्या दिवशी गावाला निघुन गेले. त्या दिवशी प्रतीक कॉलेजमधून लवकर निघाला.

“काय रे आत्ता १२ वाजले कुठे चाललास, खुप काम बाकी आहेत?” सर

“ते घरचे गावाला चालले आहेत न, तर चावी नाहीये माझ्याकडे, म्हणून चाललोय” प्रतीक

“”खर न?” सर “ओके, उद्या ये लवकर”

तसा प्रतीक घरी जायला निघाला. जाता जाता त्याने रोहीणीच्या आवडीची डेरी मिल्क घेतली. प्रतीक घरी तर आला, पण लगेच कस तिच्या घरी जाऊन याचा विचार करत बसला. लहान होतो तेच बर होत, कधीही उठुन जाता येत होत उगाच मोठे झालो, प्रतीक मनातच विचार करत बसला.

रोहीणीची आई त्यांच्या काम आटपून घरीच चालल्या होत्या, त्यानी प्रतीक आलेला पाहील आणि त्याला आवाज दिला.

“चल रे येतो न जेवायला?” रोहीणीची आई.

“ह… हा आलो” प्रतीक. प्रतीकला तर तेच हव होत. “तुम्ही चला पुढे, मी आलोच”
रोहीणीची आई पुढे गेल्या. प्रतीक फ्रेश व्हायला गेला. थोडा वेळ झाला तोच, रोहीणीच्या लहान बहीणीने प्रतीकला आवाज दिला. तसा प्रतीक ने घराचा दार लावून, येतो म्हटला. आणि प्रतीक त्यांच्या घरी जाऊन बसला. लहान होता तेव्हा मोकळा फिरत हेता तो याच घरात. आताही त्याला कोणी काहीच बोलल नसत फिरला असता तरी, पण त्याला ते आता बरोबर वाटल नाही. घरात तिचे वडील सोडले तर बाकी सर्व लेडीज होत्या, आणि तिचे वडील बाहेर कामाला गेले होते, मग त्याला तिथेच बसुन राहण्याशिवाय पर्याय नव्हता. त्याला रोहीणी दिसत नव्हती, आणि तिलाच पहायला त्याला घरात फिरायच होत.

“असा काय बसला आहेस, पहील्यांदा आल्यासारखा” रोहीणीची बहीण.

“मी ठीक आहे” प्रतीक.

“ह्याला काय जात सांगायला, नंतर ती मला भांडत बसते” रोहीणीची लहान बहीण हळुच बोलते.

“काही बोललीस?” प्रतीक

“काही नाही, जरा आरामात पसरून बस.” रोहीणीची बहीण

“अग पाणी तर दे त्याला” रोहीणीची आई किचनच्या दारात, पाण्याचा ग्लास घेउन आली. रोहीणीची बहीण काही बोलणार तोच प्रतीक बोलला, “राहू द्या ओ, मीच आलो.” प्रतीकने जाउन पाण्याचा ग्लास घेतला. किचन पर्यंत जात त्याने पुर्ण घरात नजर फिरवली, रोहीणी काही दिसली नाही. तो परत जागेवर जाउन पाहुण्यासारखा बसला.

एव्हाना चहा झाला, चहा च्या वेळी पण सेम झाल, प्रतीकच उठुन गेला, त्याने रोहीणीच्या लहान बहीणीला बोलायला चान्स दिलाच नाही. नेमकी रोहीणी कॉलेजवरून घरात आली होती, आणि तिने पाहील प्रतीक उठुन चहा घ्यायला चालला होता.

जेव्हापासून तिला त्याच्या प्रेमाची जाणीव झाली होती, तेव्हापासून जेव्हा जेव्हा तो घरी आला होता, तेव्हा तेव्हा तिने त्याला कधीच उठुन दिल नव्हत, सर्व त्याला जागेवर आणुन दिल होत. तिची बहीण घरात असुन त्याला उठलेल बघुन तीने रागात तिच्या बहीण कडे पाहील. रोहीणीची बहीण थोडी बावरली. तिला टेन्शन आल आता किती भांडेल आता ही.

क्रमशः

🎭 Series Post

View all