अपुर्ण माणस असतात प्रेम नाही भाग ९

प्रतीकची इच्छा नसतानाही डि एड ला अॅडमिशन करून दिलेल होत. तुला आवडेल या रोहीणीच्या शब्दावर त्याने डि एड पुर्ण केले, त्याला आवडले देखिल. पण तिच्यासोबत आलेला तो कोण या विचाराने प्रतीक पुरता हैराण झाला होता.

प्रतीकचा परत हिरमोड झाला होता. त्याच अॅडमिशन डि एडला करून दिल होत. त्या वेळी डिएड कोर्स ला खुप मागणी असल्याने अॅडमिशन ला गर्दी होती. प्रतीकला वाटल होत, असा तर कॉलेजला कुठे नंबर लागणार नाही. त्याने प्रवेश फॉर्म भरुन दिलेला होता. पण त्याच्या वडीलांनी प्राइवेट कोट्यातून प्रतीकच अॅडमिशन करून दिल होत. त्याच्या वडीलांपुढे त्याचा नाईलाज झाला होता.

नेहमीप्रमाणे प्रतीक संध्याकाळी टेरेसवर गेला होता. पण तो नेहमीसारखा बोलत नाहीये, गप्प गप्प उभा आहे बघुन रोहीणला टेन्शन आल. तिने सर्वांची घरी जायची वाट पाहिली. प्रतीक जाणार तेवढ्यात रोहीणी प्रतीकचा हात पकडला.

“थांब न, लगेच कुठे चालला?” रोहीणी 

“लगेच म्हणजे? वाजले बघ किती?” प्रतीक “अंधार पडला आता”

“तरी थांब, मला बोलायच आहे न” रोहीणी

“हमममम बोल” प्रतीक

“तुला काय झाल ते सांग?” रोहीणी प्रतीक च्या डोळयात बघत बोलली.

“कुठे काय, काय नाय” प्रतीक

“मला सांगतोयस?” रोहीणी

“इथे दुसर कोणी दिसतय?” प्रतीक

“दुस-यांशी नको, निदान स्वतःशी तरी खोट बोलु नकोस” रोहीणी.

तसा प्रतीक शांत झाला. रोहीणी प्रतीकच्या हातावर हात ठेवला. आजवर फक्त ओझरता स्पर्श होता. गपचूप पकडलेले बोट होती. आज पहील्यांदा प्रतीकचा पुर्ण हात रोहिणीच्या हातात होता. तिने पकडलेल्या हातात एक प्रकारचा विश्वास प्रतीकला जाणवला. त्याच्या डोळ्यात चटकन पाणी आले.

“बोल काय झाल?” रोहीणी

“डि एड ला अॅडमिशन केल” प्रतीक “जिथे जायच आहे तिथला रस्ताच पकडता येत नाहीये”. प्रतीक च्या डोळ्यात पाणी होत.

“घरचे पण आपल्या चांगल्यासाठीच करतात न, बघ त्यातही काही चांगल होऊ शकेल” रोहीणी

“आवड नसली की, होणार चांगल पण मनाला वाईटच वाटत” प्रतीक

“आवड तर निर्माण पण होउ शकते न, प्रयत्न तर कर” रोहीणी.

“बघु, दुसरा उपाय पण नाहीये माझ्याकडे” प्रतीक निराशाजनक हसतो.

“करशील रे तु, माहीती आहे मला, स्कॉलर आहेस न तु” रोहीणी खट्याळ होत.

प्रतीक आता मनापासुन हसला.

प्रतीकच डि एड कॉलेज सुरू झाल होत. अभ्यासाचा इतका लोड होता की त्याला आता बाहेर कुठे जायला वेळच भेटत नसे. रात्री दमून झोपून जात असे. रोहीणी लाही भेटायला त्याला वेळ भेटत नसे. प्रतीक ला तिला भेटायची फार इच्छा होत असे. पण प्रतीक च कॉलेज आता पुर्ण दिवसाच झाल होत. आता संध्याकाळी रोहीणीच खाली यायची, खिडकीत जी भेट होत असे तेवढीच. ती दिसली की प्रतीक चा अभ्यासही मस्त होत असे. प्रतीक ला आता आवड निर्माण झाली होती. प्रतीक ला चित्र काढायला भेटत होत, नाटक लिहायला भेटत होत. त्या कॉलेजचे ग्रंथालय पुस्तकांनी भरलेले होते. विविध नामांकीत लेखकांचे पुस्तक प्रतीक ने वाचुन काढली होती. अभ्यासाच्या पुस्तक सोडुन प्रतीक आता नव नवीन पुस्तक वाचून लागला. खास करून पु. ल. देशपांडेंची पुस्तक त्याला खुप आवडयला लागली होती. त्यातूनच प्रतीक ला नाटक लिहीणे, कविता लिहीणे सुरू केले होते. रोहीणीच म्हणण त्याला आता पटल होत. एक माणूस एखाद्याला इतका कसा ओळखु शकतो, प्रतीक ला प्रश्न पडला होता.

“बोलणारे मन

त्या मनाने तर सहज वाचाव,

पण मनाला काय आवडेल

हे त्या मनाला तरी कस बर समजाव?”

यथावकाश डि एड ही प्रतीक ने चांगल्या मार्कांनी पास झाला होता. पण त्या वर्षी इतके मुल पास झाले होते की, रिक्त झालेल्या जागे पेक्षा कैक पट मुल डि. एड करून बाहेर पडले होते, त्यामुळे कट ऑफ लिस्ट खुप हाय लागत होती. प्रतीक चा नंबर काही शिक्षक म्हणून लागत नव्हता. प्रतीकच्या वडीलांनी परत प्रतीक ला भांडायला सुरवात केली. एवढे पैसे भरून पण काय फायदा झाला, तुच बरा नाही लागत कुठे. उगाच पैसे वाया घालवले. अस ऐकुन प्रतीक मनातुन तुटत होता. त्याच्या वर्गातील फक्त एका मुलाचा नंबर शासकीय शाळेत शिक्षक म्हणून लागला होता. बाकी सर्व तसेच राहीले होते. एवढ माहीती असुनही प्रतीक चे वडील प्रतीकला तेच तेच ऐकवुन दाखवत असत.

प्रतीकला मन मोकळे करायच असल की तो टेरेस वर जात असे. एकतर तिथे शांतता ही होती, आणि रोहिणीला ही भेटता यायचे.

प्रतीक टेरेस वर आला. टेरेस ची चावी रोहीणीच्या बहिणीने दिली होती. त्यावरून प्रतीक ला कळल की रोहीणी अजुन कॉलेजमधून आली नव्हती. विचारांची खुप गर्दी झाली मनात.

“एकतर मी बोललो नव्हतो की मला डिएडला अॅडमिशन करून द्या. परत सायन्स करायची तयारीही दाखवली तरी त्यांच्याच मनात करायच असत त्यांना, माझ्या २०० मुलांच्या वर्गात फक्त एकाचा नंबर लागला शिक्षक म्हणून, एवढी कर मुल डि एड करून बाहेर पडली आहेत तशीच. तरी मलाच भांडतात” प्रतीक मनातल्या मनात बोलत होता. विचार करता करता कधी तो त्या टेरेस त्या कठड्यावर जाउन बसला त्यालाच कळल नाही. एकवेळ तर त्याला वाटल की झोकुन द्याव खाली स्वतःला म्हणजे सर्व सुटतील. पण ते चुकीच आहे त्याला माहीती होते. प्रतीक कठड्यावरून खाली उतरत होता तोच, त्याचा पाय टेरेसच्या कठड्याच्या आतल्या बाजुने असणा-या पाइपला अडकला. त्यामुळे प्रतीक ने दुसरा पाय वर कठड्यावर घेतला. आणि चप्पल अडकलेल्या पायाची चप्पल काढु लागला. थोडा हिसका देतात चप्पल तर निघाली पण त्याचा तोल कठड्याच्या बाहेरच्या बाजूस गेला. त्याचा हात कोणीतरी पकडला आणि प्रतीक ला आवाज आला.

“प्रतीक” रोहीणी घाबरुन जोरात ओरडली. तसा प्रतीक फक्त हसला. कारण प्रतीक ने दुसरा हात पकडुन ठेवलेला होता, तोल जरी जात होता, तरी त्याची पकड घट्ट होती. पण रोहीणी खुप घाबरली.

“बावळट आहेस का, काय करतोयस???” रोहीणी रागात प्रतीक ला विचारत होती. तिच्या ह्रदयाचा वाढलेल्या गतीचा आवाजही प्रतीक ला येत होता. प्रतीकच्या ऐवजी तीच जास्त थरथर कापत होती.

प्रतीक ने पाईपमध्ये अडकलेली चप्पल रोहीणी ला दाखवली. तसा रोहीणीच्या जीवात जीव आला. तिला वाटल होत की परत प्रतीक वेड्यासारख पाउल उचलतो की काय. पण अडकलेली चप्पल बघुन तीला जरा हायस वाटल.

“अरे पण अस कठड्यावर कोण चढुन बसत, गेला असता तोल तिकडे काय केल असत?” रोहीणी अजुनही रागात.

“अग पकडलेल होत मी, नसता गेला तोल, आणि गेला जरी अता तर सुटले असते न सगळे” प्रतीक चेह-यावर उसन हसु आणत बोलला.

प्रतीक जस हे बोलला तशी रोहीणने प्रतीक चा गळा पकडला.

“काय बोललास?? परत बोल?? सगळे सुटतील काय??” रोहीणी ला राग कंट्रोल झाला नाही.

रोहीणी प्रतीक चा गळा पकडताना त्याच्या खुप जवळ आली होती. तिचे रागाने गरम झालेले श्वास प्रतीक ला जाणवत होते. तीचा तो राग बघुन प्रतीक पहीले घाबरला. नंतर तिच्या डोळयाला काळजी बघुन गहीवरला. रोहीणी प्रतीक ला मारणार तेवढ्यात रोहीणी ची बहीण वर आली, कारण रोहीणीचा ओरडतानाचा आवाज तिच्या बहिणीने ऐकला होता.

“काय ग काय झाल, एवढ्या जोरात ओरडलीस?” रोहीणीची बहीण

तिचा आवाज ऐकून रोहीणने प्रतीक ला सोडल. प्रतीकच बोलला,

“काही नाही, चप्पल अडकली होती, तर ती काढायला गेलो तर त्या बाजुला तोल जात होता, तर हिला नेमक तेच दिसल म्हणून ती ओरडली, इकडे मी पकडुन ठेवलेल तिला दिसल नाही. म्हणून ती घाबरली आणि ओरडली.”

“अरे पण वर कठड्यावर चढुन बसायला तुला सांगीतल कोणी काही झाल असत मग?” रोहीणच्या बहिणीने रोहीणीचच वाक्य जोडल.

“काही नसत झाल, तस पकडलेल होत.” प्रतीक

“येड्या, जरा निट रहा” म्हणत रोहीणीची बहीण घरी निघुन गेली. तस रोहीणने परत प्रतीक ची कॉलर पकडली.

“अग हो, सॉरी न, परत नाही चढुन बसणार” प्रतीक रोहीणला थोड दुर करण्याचा प्रयत्न करतो. ती एवढ्या जवळ आली होती की, त्याच्या पोटात खोल खड्डा पडल्यासारख वाटत होत. तिच्या डोळ्यातला काळजी बघुन तिला मिठीत घ्यावस वाटत होत. पण ते टेरेसवर असल्याने प्रतीक ने मनाला आवर घातला होता.

“तुला बोलली होती न, तुला एकट्याला नाही सोडणार, इथेही नाही आणि वर ही नाही. तुझ्या पाठी लगेच नंबर लावेल हं मी, लक्षात ठेव” रोहीणी

“जीवाला जीव देणारा

माणूस भेटला,

की नकोसा वाटणारा जीव ही

सोडावासा वाटत नाही…”

प्रतीक मनातल्या मनात बोलला. बराच वेळ दोघही एकमेकांच्या डोळ्यात हरवले होते. कोणीही बोलत नव्हत.

रोहीणीच्या डोळ्यात आलेल पाणी प्रतीक ने हलकेच पुसल.

“वेडीच आहेस, एवढ सुंदर जग असताना, ते बर सोडुन जाईल मी.” प्रतीकने रोहीणीकडे बघत डोळा मारला. तशी रोहीणी लाजली आणि घरी पळुन गेली. प्रतीकच मन पुर्णपणे मोकळ झाल होत.

प्रतीक ने सिनियर कॉलेजला अॅडमिशन घेतल होत. ते कॉलेज सकाळच असल्याने दुपार नंतर त्याला खुप वेळ भेटत होता, एक दिवस टेरेसवर इमारतीमधील सर्व मुल पालक जमले होते, पण रोहीणी काही वर आली नव्हती. प्रतीक खुप वाट बघत होता तिची. शेवटी ती प्रतीक ला दिसली. प्रतीक ला थोड हायस वाटणार तोच तिच्यासोबत एक मुलाला त्याने पाहीला. पहीले प्रतीक ला काही वाटल नाही पण नंतर रोहीणी त्या मुलाजवळ जरा जास्तच राहत होती बघुन प्रतीकला कसतरीच व्हायला लागल. आता कोण आला हा प्रतीक विचार करत बसला.

क्रमशः


🎭 Series Post

View all