अपुर्ण माणस असतात प्रेम नाही भाग ५

मोठी उलथापालथ केलेल्या प्रतीक च्या आयुष्य स्थीर करण्याच प्रयत्न रोहीणी करत होती.

गेल्या ३ ते ४ दिवसापासुन प्रतीक प्रयत्न करत होता, पण त्याच मन धजावत नव्हत. मनात विचारांची खुप गर्दी झाली. पण शेवटी घरातली भिती जिंकली. मनाचा हिय्या करत, तो त्या दिवशी संध्याकाळी त्याच्या घराच्या बाहेर पडला. सायकल होती त्याच्याकडे, तीच सायकल घेउन निघाला. कुठे निघाला त्यालाच माहीत नव्हतं, कुठे चालला आहे तो. फक्त इथुन त्याला लांब जायच होत. संध्याकाळी बाहेर खेळायला जातो म्हणून सायकल घेउन जो बाहेर पडला तो तसाच निघुन गेला.

तालुक्याच्या ठिकाणी तो पोहोचला. तिथे थोडफार खाल्ल त्याने आणि परत त्याची सायकल चालवायला लागला. अंधार पडला होता. गाव मागे राहील होत. रस्ता पूर्ण काळोखात बुडला होता. रस्त्यावरून येणा-या जाणा-या वाहनांचा प्रकाश येईल तेवढाच.

इकडे घरी बराच वेळ झाला प्रतीक आला नाही म्हणून प्रतीकची आई थोडी घाबरली. आजुबाजुला पाहील तर तो काही दिसला नाही. येईल थोड्या वेळात म्हणून तिने मनाला समजावले. पण बराच वेळ झाला तरी प्रतीक चा पत्ता नाही, तेव्हा मग ती घाबरली. प्रतीक च्या वडीलांचा ही घरी यायची वेळ झाली होती. जसे प्रतीक चे वडील घरी आले तस प्रतीक च्या आईने सगळा प्रसंग त्यांना सांगीतला. तसे तेही घाबरले. त्यांनी आजुबाजुला शोधासाठी करावयास सुरवात केली. पण प्रतीक त्यांचा कुठेही भेटला नाही. एव्हाना इमारतीत बाकीच्यांना पण माहीती भेटली, तसे त्यांनीही प्रतीकला शोधायचे प्रयत्न सुरू केले.

तेवढ्यात इमारतीमध्ये राहणारे सोनार आले. त्यांनी प्रतीक च्या वडीलांना आवाज दिला.

“ओ तुमच्या मुलाला पाहील मी, सायकल वर तालुक्याच्या गावाला जाताना.” सोनार, “चला त्या रस्त्याला जाउ त्याला पहायला, आधीच माहीती असत तर धरून ठेवले असत त्याला, चला बसा पटकन”.

तसे प्रतीक चे वडील आणि सोनार हे दोघेही त्या रस्त्याला जातात ज्या रस्त्याने प्रतीक गेलेला सोनारांना दिसतो. पण ते प्रयत्न ही व्यर्थ होतात. ती रात्र अशीच जाते. प्रतीक च्या आईचे ही रडून रडुन हाल झालेले असतात. कशीबशी ता रात्र काढली जाते.

प्रतीक रात्रभर सायकल चालवत राहतो. कुठेही थांबत नाही. तालुक्याच्या गावातून त्याने त्याच्या गावाला जाणारा रस्ता पकडला होता. एवढी ताकद कुठुन आली त्यालाही माहीत नव्हते. पहाट होत आली तसा तो २०० किलोमीटर लांब त्याच्या गावच्या जिल्ह्याच्या ठिकाणी पोहोचला. त्याला त्याच्या मामाकडे जायची खुप इच्छा झाली पण मामांना कळल तर घरी जास्त मार पडेल या भीतीने त्यांच्या घरा वरून तो परत फिरला होता. प्रतीक ने परत घरचा रस्ता पकडला होता. जाऊन जाऊन जाणार कुठे? सुरक्षितपणा घरातच जास्त राहतो. पण घरी कुठल्या तोंडाने जायचे म्हणून तो त्याच्या घरापासुनच्या काही किलोमीटर अलिकडील गावात येऊन थांबला होता. सायकल चालवुनही आता त्याला खुप थकवा जाणवत होता.

प्रतीक च्या घरी दुस-या दिवशीही शोधाशोध चालु होती. रोहीणी ही घरी आली होती. जस तीला कळल तसा तिलाही मोठा धक्का बसला.

“एक दिवस थांबला असतात तर तुला जाउच दिल नसत मी” रोहाणी मनातल्या मनात बोलते. “गेलास कुठे तु?” तीला जितकी काळजी वाटत होती तितका रागही येत होता.

प्रतीक संध्याकाळ पर्यंत त्या गावात थांबला, मग परत मनाची तयारी करत त्याच्या घराकडची बस पकडली. तो त्याच्या गावाच्या स्टॅंडला उतरला, आणि घराकडे बिचकत बिचकत जाउ लागला. इमारतीत लांबूनच अंदाज घेतला, आणि भितीने परत बस स्टॅंडवर येउन बसला. त्याला वाटल की कोणी त्याला पाहील नाही, पण एका नजरेने त्याला कधीच पाहील होत आणि तो दिसल्याची निरोप ही प्रतीक च्या घरी पोहोचला होता.

प्रतीक च्या खांद्यावर एक हात पडला. त्याच्या शेजारी राहणारा सोनु होता. वयाने लहान होता २ वर्षांनी पण अशी खरडपट्टी काढली त्याने प्रतीक ची. त्याच्या दोन्ही हाताला पकडत त्याला डायरेक्ट घरातच सोडले. प्रतीक गपचूप एका कोप-यात बसला होता. आता जे होईल त्याला सामोरे जायची मनाची तयारी करत. त्याच्या आईने त्याला फ्रेश व्हायला पाठवले. तेवढ्यात प्रतीक चे वडीलही घरी आले. प्रतीक ची तर हिम्मत नव्हती बाहेरच्या खोलीत यायची. त्यांनी प्रतीक ला पाहील पण त्याला काही बोलले नाही. चेह-यावर मात्र राग प्रतीक ला दिसला होता.

दुस-या दिवशी ईमारतीमधल्या प्रत्येकाने प्रतीक ची कान उघडणी केली होती. तो नापास झाला याची माहिती तर प्रतीक च्या घरच्यांना त्याच्या मित्रांनी दिली होती. त्यामुळे च तो घरातुन निघुन गेल्याचे सर्वांना समजले.

“मार्कशीट दाखव.” प्रतीक चे वडील प्रतीक ला मार्क शीट दाखवायला सांगतात. तस प्रतीक त्यांना मार्क शीट दाखवतो. त्यांचा चेहरा नेहमीप्रमाणे निर्विकार दिसला. तस त्याच आणि वडीलांमधल बोलण अजुन कमी झाल.

तिन चार दिवस तर प्रतीक ची हिम्मत झाली नाही रोहीणीकडे बघायची. मग तो त्याच मन कागदावर उतरवु लागला. या वेळेस त्याने कागद फाडली नाहीत, ते डायरी मध्ये लिहु लागला होता.

प्रतीक बाहेरच्या टाकी वर बसला होता. संध्याकाळ ची वेळ होती. रोहीणी तिच्या आईसोबत खाली उतरली. प्रतीक ने पाहील तिच्याकडे. तिच्या डोळ्यात अश्रू जमा होताना दिसले, आणि सोबतीला असंख्य प्रश्न. त्याने मान दुसरीकडे वळवून घेतली आणि घरात निघुन गेला. तशी रोहीणी पाणी पिण्याच्या निमित्ताने प्रतीक च्या घरात गेली आणि प्रतीक बसला होता त्या खोलीकडे गेली.

“तुझी हिम्मत कशी झाली अस वागायची?” रोहीणी ने डायरेक्ट प्रतीक ची कॉलर घट्ट पकडत रागात विचारत होती.

“एकदा पण विचार नाही आला, काकुंचा काकांचा, मा…..” बोलता बोलता ती शांत झाली, पण डोळ्यातल पाणि शांत होत नव्हत. न रोहिणीच्या नाही प्रतीक च्या.

“खुप टेन्शन आल होत, काय करू सुचत नव्हत, १ दिवस फक्त सगळ्या पासुन लांब रहावे वाटत होत.” प्रतीक

“म्हणून अस काहीही वेड्यासारख करायच?” रोहाणी

याच उत्तर नव्हत प्रतीक कडे, ते दोघ एकमेकांकडे पहात राहतात.

“रोहीणी काकु आवाज देत आहे.” प्रतीक ला रोहीणी च्या आता आवाज आला. पण ती काहीच बोलत नाही म्हणून प्रतीक तीला बोलला.

तशी रोहीणी भानावर आली. “परत असा वाग मग होते तुला” प्रतीक ला नेहमीप्रमाणे बोट दाखवत ती निघुन गेली.

काही दिवस निघुन जातात. पुन्हा नवीन वर्षाचे अॅडमीन कॉलेजला सुरू होतात. तस प्रतीक च्या अॅडमीशनचही प्रतीक ची आई त्याच्या वडीलांना विचारते.

“काय करणार तो अॅडमीशन घेउन, कला शाखेला घ्यायला सांग” प्रतीक चे वडील त्याच्या आईला सांगत होते.

“पण तो बोलतोय करेल सायन्सचा भ्यास म्हणून” प्रतीक ची आई

“नको, विषय संपला.” प्रतीक चे वडील.

आता पुढे काय आणि कस करायचे काहीच कळत नव्हत.

तीन चार दिवसांनी रोहीणी च्या आईचा आणि प्रतीक च्या आईचा हाच विषय चालु होता. त्याच्या दुस-या दिवशी रोहीणीची मोठी बहीण कॉलेज मधून येता येता प्रतीक च्या घरी थांबली.

“काय म्हणतोस प्रतीक, काय करतोयस?” रोहीणीची मोठी बहीण.

“काही नाही.” प्रतीक

“माझ्या ओळखीचे दुस-या कॉलेजचे शिक्षक आहेत, तीथे तुझ्या पुढच्या अॅडमीशनच काम होऊन जाईल.” रोहीणीची मोठी बहीण

इमारतीमधील सर्व मुलांमध्ये ती मोठी होती, तिच जास्त बाहेर फिरलेले असल्याने तिची ओळख असेलच, पण ही वेळेवर बरी आली असा विचार प्रतीक ला यायला लागला.

दुस-या दिवशी प्रतीक ला घरासमोरच्या टाकी वर बसलेल पाहुन रोहीणी त्याच्या जवळ येते.

“ताईने सांगितलय न, त्या कॉलेजला गप्प अॅडमीशन घ्यायच, कळल?” रोहीणी

“तु सदान कदा रागात काय बोलत असतेस ग?” प्रतीक

“जास्त बोलायच काम नाही, तुझ्यावरचा राग अजुन गेला नाहीये” रोहीणी प्रतीक ला जिभ दाखवत निघुन जाते.

प्रतीकच अॅडमीशन झाल, दुस-या कॉलेजला.

रोहीणी ही दहावीची परीक्षा पास होऊन तिचेही एका कॉलेजला अॅडमीशन झाल होत. दोघांचेही कॉलेज वेगवेगळे होते. पण दोघांच्या कॉलेजची वेळ योगायोगाने सारखी असल्याने दोघांची कॉलेजला जायची आणि यायची वेळ सारखीच होती. घरातल्यांससोर प्रतीक रोहीणी शी जास्त बोलत नसे. त्याच्या तिच्या विषयी असणा-या भावना घरात कळु द्यायच्या नव्हत्या.

पहीले दोन दिवस तर प्रतीक ला कळल नाही, की रोहीणीही ची वेळही तीच आहे. पण तिस-या दिवशी प्रतीक ला रोहीणी तो जात असलेल्या गाडीला दिसली.

“तु इथे?” प्रतीक

“हा मग, पळुन नाही चालली, कॉलेजला चालली.” रोहीणी

तीच उत्तर एकुन प्रतीकच मन दुखावल.

“खुप चुकीच वागलास तु, निदान आपल्या माणसांचा विचार करायला हवा होतास.” रोहीणी. “सॉरी जरा जास्तच बोलली, आणि हो, हाच वेळ हा माझा कॉलेजला जायचा, आणि हिच गाडी.” म्हणत एक सुंदर स्माईल प्रतीक ला देत रोहीणी गाडीत जाऊन बसते. तिची आलेली ती स्माईल पाहुन प्रतीक च्या जीवात जीव येतो. आणि तोही गाडीत जाणून बसतो.

रोज आपल्या आधी गाडीत येउन बसणारा पोरगा, आजकाल एवढा लेट का येउ लागला, हा प्रश्न प्रतीक च्या नुकत्याच ओळख झालेल्या मित्रांना पडला. प्रतीक ला विचारल त्यांनी पण त्याने होतो उशीर सांगुन त्याने मित्रांना टाळले होते.

मित्रच शेवटी, एक दिवस मित्र जाणूनबुजून मागे राहीले. पण प्रतीक ला काही कळु दिले नाही.

प्रतीक रोज रोहीणी ला पुढे जाउ देत होता, आणि हा ति गेल्यानंतर प्रतीक निघायचा. घरातही त्याने जाणवू दिल नाही की, ती गेल्यावर हा निघायचा ते. हा मागुन निघुन पळत जात, रोहीणीची इमारती बाहेर पडायची वाट बघायचा. एकदा का ती बाहेर निघाली की, हा मागुन जाउन तिला आवाज देत, तिच्यासोबत स्टॅंडपर्यत बोलत जायचा. आणि हे रोजच झाल होत.

त्या दिवशी प्रतीक च्या मित्रांनी प्रतीक ची गम्मत पाहीली. आणि स्टँडवर पोहोचल्यावर रोहीणी बाजुला गेल्या गेल्या हे त्याचे मित्र त्याच्यासमोर जाऊन उभे राहिले.

“म्हणून तुला उशीर होतो न??” नवज्योत

आता लपवुन काही फायदा नाही बघुन प्रतीक बोलला.

“आवडते मला ती.” प्रतीक

“मग बोलला अता आम्हाला तर काय जाउन बोंबललो नसतो कुठे, कधी पासुन आवडते??” हेमंत

“कदाचीत लहानपणापासुन” प्रतीक

“शेजारीच वाटत?” नवज्योत

“हो” प्रतीक

प्रतीक पुन्हा स्थिरावत हेता त्याच्या आयुष्यात. अजुन कुठे दुसरीकडे अडकून पडण्यापेक्षा प्रतीक डोळ्यासमोर रहावा म्हणून रोहीणी ने तिच्या मोठ्या बहिणीला प्रतीक च्या घरी बोलायला पाठवल होत. रोहीणी ला तिच्याच कॉलेजला प्रतीक च अॅडमिशन करायच होत पण तिच्या कॉलेजच अॅडमिशन फुल झाले होते. मग तिच्या बहिणीने रोहीणी ला सांगीतल की एक दुसर कॉलेज आहे, त्यांचा जागेचा प्रोब्लेम चालु असल्याने ते कॉलेज काही दिवसांतच तुझ्याच कॉलेजच्या एका इमारतीमध्ये शिफ्ट होणार आहे, तिथे प्रतीकच अॅडमिशन होईल. काही दिवसांचाच प्रश्न असल्याने रोहीणी ने तिच्या मोठ्या बहिणीला पुढे केल होत.

“तो तुझ्या बिल्डींगमधलाच आहे न, रोज तुझ्या सोबत येतो तो?? रोहीणी च्या मैत्रीणीने २ ते ३ वेळा रोहीणी ला प्रतीक सोबत पाहील होत. आणि आज ति रोहीणीला विचारत होती.

“हो, एकच टाईम आहे म्हणून येतो सोबत” रोहीणी

“नक्की का, कारण स्टँडच्या गेट पर्यंत सोबत असता, मग तु पुढे येते आणि तो मागुन??” रोहीणीची मैत्रीण

“उगाच चर्चा नको म्हणून तोच मागे राहतो, मला पुढे पाठवतो” रोहीणी सारवासारव करत.

प्रतीक चे मित्र ही आता गाडी सुटेपर्यंत गाडीला फे-या मारत राहतात, प्रतीक ला घेऊन. आता एकटाच फिरला तर लोक काय म्हणतील म्हणून त्याचे मित्र प्रतीक सोबत रहायचे. रोहीणी बसलेली खिडकी आली. की तिरक्या नजरेने एकमेकांना पहायचे. जवळपास रोजच रूटीन झाल होत त्यांच.

“अरे एवढी आवडते तुला, तर विचार न एकदा तिला?” नवज्योत

“नको रे, भिती वाटते, ती दिसायला शंत दिसते, पण भडकली ना, तर लय डेंजर आहे.” प्रतीक

“एवढा घाबरतो तिला?? प्रेम करतो मग घाबरून कस चालेल??” हेमंत

“बघुया नंतर” प्रतीक मग ते गाडीत जाऊन बसतात. ब-याच वेळा मित्रांनी बोलल्यानंतर एका क्षणाला प्रतीक ला वाटले की विचारावे, वेळ बघुन तो रोहीणी ला विचारणार होता.

नेहमीप्रमाणे रोहीणी इमारतीच्या बाहेर पडली. प्रतीक ने मागुन जाउन तिला आवाज दिला. बोलता बोलता प्रतीक ने रोहिणी ला विचारले,

“एक न, एक विचारायच होत.” प्रतीक

क्रमशः…


🎭 Series Post

View all