अपूर्ण माणस असतात, प्रेम नाही. भाग ४

आवड नसतानाही विज्ञान शाखा घेतली. शेवटी व्हायचा तोच परीणाम झाला.

“कधीपर्यंत असा टाळणार आहेस मला??” रोहीणी

प्रतीक मागे बघुन सुटकेचा श्वास सोडणार तेवढ्यात त्याला समोरून तीचा आवाज येतो. तसा तो चमकून तिच्याकडे बघतो. त्याच्या डोळ्यात अश्रू जमा होताना दिसले.
“तुला बोलली होती न, तुला सोडणार नाही म्हणून??तरी मला चुकवून तु चालला??” रोहीणी

“तस नाही काही जरा इकडे काम होत म्हणून” प्रतीक काहीतरी सांगायचे म्हणुन बोलला.

“तुला नसेल सांगायच तर नको सांगून, पण मला त्रास देणारी गोष्ट बोलली तरच तीचा त्रास कमी होत. मार्ग निघतात.” रोहीणी.

घर आणि शाळा एवढाच काय तो प्रतीक चा विस्तार होता. त्याला जास्त कोणी मित्र नव्हते. आणि कोणाला काही मनातल बोलु शकेल अस तर कोणीच नव्हतं. आणि हिला मात्र न सांगता कस काय समजत म्हणून याचे डोळे भरून आले होते.

“विषय राहीले परीक्षेमध्ये.” प्रतीक

“अच्छा, मग याच्याशी मला चुकवून जाण्याचा काय संबंध?” रोहीणी

“ते तुझ्या ताईला सांगुन मोठ्या तो-यात घेतल होत विज्ञान शाखा आणि पहिल्याच प्रयत्नात नापास झाले. म्हटल तुला काय वाटेल??” प्रतीक.

“मला काय वाटेल याचा विचार तु का करतोयस?” रोहीणी थोडी खट्याळ होत.

काय बोलुन गेलो मी म्हणुन प्रतीक ने जीभ चावली, “म्हणजे तुझ्या ताईला काय वाटेल न?? आता तुला कळल तर तु जाऊन सांगशील ना तिलाच??”

“ज्या गोष्टी बोलायला नको त्या नाही बोलत मी, पण ज्या तु बोलायला हव त्या तु बोलत नाहीस.” रोहीणी

“म्हणजे?” प्रतीक त्याला समजतच नाही काय बोलली ती.

“काही नाही रे, नाही सांगणार मी ताईला.” रोहीणी “घरात सांगितले?”

“वेडी आहेस का? कुट्ट्यात टाकुन कुटतील मला.” प्रतीक

“मला तरी वाटत तु सांगावस, कधीतरी कळेलच न.” रोहीणी

“ते तर आहेच, बघु सांगेल वेळ आली की, वार्षीक परीक्षेत करतो पुर्ण प्रयत्न.” प्रतीक

“जा आता, आणि खाऊन घे, नाहीतर बोलतील भुक नाही म्हणून.” रोहीणी

“भुत आहेस का ग तु?? म्हणजे कस कळत तुला??” प्रतीकला पुन्हा धक्का बसतो, कारण तो आता तरी घरी काही खाणार नव्हता.

रोहीणी हसत “दिसत चेह-यावर ते, आणि गप्प जेवून घ्यायच.” त्याच्याकडे डायरेक्ट बोट दाखवत. 

“हो माते, जेवून घेईल.” प्रतीक

रिलॅक्स वाटत असल्याने थोड्या नाटकी अंदाजात तो बोलतो. ती हसत जाते आणि प्रतीक घरी येतो. जेवणात नव्हता पण त्याला आता भुक लागली होती. तो जेवतो थोडा अभ्यास करून झोपी जातो.

प्रतीक पुर्ण प्रयत्न करतो, सगळा अभ्यास समजुन घेण्यासाठी. त्याला थोडफार समजायला ही लागल असत. पण तो पर्यंत पुढचा अभ्यास आलेला असतो. त्याला खुप जड होत होत. तरी तो त्याच्या परीने खुप प्रयत्न करत होता. त्याला नुकताच कवीता करायचा छंद लागला होता. मनातल बोलायला कोणी नव्हत अशा वेळेस तो कवितेचा आधार घ्यायला लागला. याची भूक त्याने कोणालाही लागु दिली नाही. कवीता लिहुन झाली की मन शांत व्हायच आणि मन शांत झाल की या कागदाचे करायचे काय म्हणुन तो फाडुन फेकुन द्यायचा.

अशातच कॉलेजमध्ये १४ फेब्रुवारी ला प्रेम दिवसाची हवा सुरू झाली. त्या कॉलेजमधल्या वातावरणाने प्रतीकला ही वाटले की रोहीणी शी बोलाव. पण या विषयावर कशी रिलॅक्ट होईल त्याला माहीत नव्हत. तो शिकायला तालुक्याच्या ठिकाणी जरी असला, तरी रहात असणा-या गावात वातावरण हे तस नव्हत. तिकडे प्रेम म्हणजे फक्त वाया जाणे एवढच विचार होता. त्यामुळे प्रतीक ने एक कागदावर एक प्रेमाची चारोळी लिहीली. त्या कागदाच्यामागे त्याच आणि रोहीणीच नाव लिहील होत. लिहुन झाल्यावर त्याच मन शांत झाल. पण तो कागद त्याला फाडावासा वाटला नाही. नंतर फाडेल म्हणून त्याने तो कागद जपुन स्वतः जवळ ठेवला. २ ते ३ दिवस झाले फाडेल म्हणून पण तो तसाच राहिला. पॅंटच्या खिशात. दुस-या दिवशी ती पॅंट धुवायला गेली. ती धुवत असताना प्रतीक च्या आईला तो कागद सापडला. तो पुर्ण भिजलेला असल्याने त्यावरची नाव दिसत नव्हती पण त्या कागदावर गाण्यासारखे लिहलेल दिसत होत. त्याच्या आईने प्रतीकला विचारल त्याची तर पाचावर धारण बसली. आता काही खर नाही, विचार करत तो काही बोलणार एवढ्यात त्याला तो पुर्ण भिजलेला कागद दिसला. त्यावर काहीच निट दिसत नव्हत. ते बघुन तो गाण्याचा कागद आहे अशी त्याने थाप मारली.

“गाण्याचा आणि तुझा काय संबंध?” प्रतीक चा आई

“ते आमच्या ग्रुपने कॉलेजच्या गॅदरींगमध्ये डान्स बसवला आहे, त्याच गाण आहे ते.” प्रतीक

“दुसर काही नाही ना?” आई

“नाहीत, दुसर काही नाही” प्रतीक

आणि तो कॉलेजला निघुन गेला. तसाही त्याला त्या गॅदरींगमध्ये काहीच इंटरेस्ट नव्हता. आणि कवितेबद्दल त्याने कधी कोणाला सांगीतले नव्हते. त्यामुळे त्याचा त्या गॅदरींगशी काही संबंध नव्हता. प्रतीकच कॉलेज सुरू झाल्यापासून त्याच वेळापत्रक बदलल होत. सकाळी कॉलेज आणि संध्याकाळी ट्युशन यामुळे रोहीणीशी त्याला जास्त बोलायला वेळ भेटत नसे.

रविवारी मात्र न चुकता तो ईमारतीच्या टेरेसवर जायचा. टेरेस च्या कुलुपाची चावी रोहीणी कडेच असल्याने त्यांच्याकडे चावी मागायला प्रतीक जात असे. तो टेरेसवर गेल्यावर काही वेळातच रोहीणी ही टेरेसवर यायची. ते दोघच असेपर्यंत खुप गप्पा मारायच्या. पण बाकी मुल आले की सर्व खेळायला सुरवात करायचे. फक्त वय वाढत होतो, पण न त्यांचा नजरेचा खेळ बदलला नाही खेळताना नकळत होणारे स्पर्श.

संध्याकाळची ट्युशन आटपून घरी यायाला उशीर जरी झाला तरी जेवण झाल्यानंतर बाहेर फिरायला जाणे प्रतीक सोडत नव्हता. त्याने बाहेर पडायची वेळ आणि रोहाणीची तिच्या घराच्या खिडकीत यायची वेळ एकच असायची.

खिडकीच्या कठड्यावर
ती रोजच उभी राहायची,

वेळेचं आणि जागेच
तिचच समीकरण मांडायची,

समीकरण मांडताना गालावर 
छान खळी पडायची,

तिला चोरून पाहताना
मनाची मात्र धडधड व्हायची,

                       ~ महेश ~

कधी प्रतीकच फिरण चुकीचे रात्रीच तर दुस-या दिवशी घरी येऊन विचारण व्हायच काय रे काल फिरायला नाही गेलास?? त्याच उत्तर देताना मात्र प्रतीकची ततपप व्हायची.

“काय डेंजर मुलगी आहे राव??” प्रतीक मनातल्या मनात.

“ते आम्ही रोज जेवण झाल्यावर बसतो ना खिडकीजवळ तर दिसतो हा, काल दिसला नाही म्हणून विचारल.” रोहीणी प्रतीक च्या डोळ्यात बघत बोलली. प्रतीक ची हिम्मत झाली नाही तिच्याकडे बघायची. हल्ली असच व्हायच त्याच, तीने प्रतीक च्या डोळ्यात पाहुन काहीतरी विचाराव पण प्रतीक मात्र दुसरीकडे बघायचा. तिचे प्रश्नच असे असायचे सर्वांसमोर प्रतीक ला की प्रतीक ला झटका बसायचे की काय उत्तर द्याव ते. रोहीणीच्या डोळ्यात पाहील का त्याला हरवायला व्हायच. दुसर काहीच सुटायचे नाही. म्हणून कोणी सोबत असल की तिच्या डोळ्यात तो पहायचाच नाही. आणि रोहीणी मात्र असे प्रतीकला झटके देत त्याची मजा घ्यायची.

असच एके दिवशी रोहीणीच्या वर्गातली एक मुलगी प्रतीक सोबत बोलत होती. ट्युशनला सुट्टी असल्याने प्रतीक लवकर घरी येत होत तर रस्त्यात रोहीणीच्या मैत्रीणीला तो दिसला आणि तिनेच आवाज दिला. तसा प्रतीक कधीच आजवर स्वतः हुन कोणत्याही मुलीशी बोलला नव्हता, एकच मुलीशी स्व4हुन बोलायचा ती म्हणजे रोहीणी. त्या मैत्रीणशी बोलता बोलता तो घरी आला. वेळ आहे म्हणून तो टेरेसवर गेला. पण आज रोहीणी काही आली नाही. बराच वेळ वाट बघितल्यावर कंटाळून तो खाली निघुन आला.

रोहीणी तिच्या आई सोबत खाली उतरली. त्यांच्या भिशीचे काम असल्याने त्या दोघी प्रतीक च्या घरी आल्या. रोहीणीची आई प्रतीक च्या आईशी बोलत होती. तर प्रतीक चोरून चोरून रोहीणी ला पहात होता. पण आज ती काही त्याच्याकडे पाहत नव्हती. त्या दोघी घरातुन जाणार तेवढ्यात रोहीणी प्रतीक ला बोलते,”त्या मुलीशी कशाला बोलत होतास रे?? चांगली नाही मुलगी ती.” थोडी रागात बोलली.

“कोणती ग?” प्रतीक ची आई

“आहे आमच्या वर्गात, कोणाशीही बोलत बसते” रोहीणी
“वागण चांगल नाही तिच, लांब रहायच तिच्यापासुन समजल?”

तिच अस हक्काने बोललेल प्रतीक च्या काळजचा ठोका चुकवून गेला. तिच्या डोळ्यातला जेलसीसोबतची काळजी प्रतीकला दिसली. काय बरोबर काय चुक त्याला काहीच समजत नव्हतं, आता जे होईल ते हेईल म्हणत प्रतीक ने आज पहिल्यांदाच बाकींच्या समोर तिच्या डोळ्यात पाहील. आणि तसा तो तिच्या डोळ्यात हरवत गेला.

“समजल ना, नको बोलत जाऊन कोण आहे ती” प्रतीक ची आई प्रतीक ला हलवत बोलते.

“हा ते, मी नाही बोललो तीच आलेली बोलायला.” “ नाही बोलणार परत.” प्रतीक.

तशी रोहीणी ने त्याला नेहमी सारखी स्माईल दिली. तेव्हा कुठे त्याच्या जिवात जिव आला

विज्ञान शाखेचा अभ्यासाचा प्रयत्न तर पुर्ण करत होता. पण पास होण्याइतपत त्याला काही जमल नाही.

याचा व्हायचा परीणाम तोच झाला. प्रतीक नापास झाला होता. २ ते ३ मार्कांनीच नापास झाला. पण त्याच्या मनाला खुप लागल त्याला. १ ली ते १० फर्स्ट क्लास ने पास होणारा आज नापास झाला, याचा त्याला खुप त्रास होत होता. घरी कळल तर काय होईल या विचारानेच त्याला भितीने कापर भरल. २ ते ३ दिवस तर घरात कोणाला काही बोलला नाही. एककी गुपचुप रहायला लागला. जेवण कमी केल होत. घरात कोणी विचारलच तर बर नाही वाटत बोलायचा.

रोहीणी ही तीच्या नातेवाईकाकडे गेली होती. शेवटी मनाशी काहीतरी विचार केला. दोन वेळा प्रयत्न करून पाहीला पण नाही करू शकला. पण ह्या वेळेस मात्र त्याने मनाची पुर्ण तयारी केली आणि तो एक पाऊल उचलणार होता.

क्रमश: ……

🎭 Series Post

View all