अपुर्ण माणस असतात प्रेम नाही - भाग २

इतरांसमोर व्यक्त होउनही, कधी कधी जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले जाते. तर प्रेमाला कधी व्यक्त होण्याची वाट ही पहावी लागत नाही.

रोहीणी च्या हाताला जरा जास्तच लागल होत, तीचा चेहरा रडवेल झाला. 

आता मात्र प्रतीक घाबरला. कारण तो करायला एक गेला आणि झाल भलतच होत. का केल म्हणून उत्तर तरी काय देणार होता तो. तो फक्त तिच्या हाताकडे बघत राहीला.

तेवढ्यातच प्रतीक ची आई, त्यांच्या बाजुने चालली होती. रोहीणीला ब्लेड लागताना तिचा झालेला आवाज ऐकून, त्याची आई तीथे आली. आता तर प्रतीक ला घाम फुटायला लागला होता. 

" काय ग, काय झाल?? " प्रतीक ची आई. 

" काय नाय ओ काकु, माझाच हात मला लागला, ब्लेड होत हातात, तर त्यासोबत ते पण लागल. " रोहीणी. 

" नक्की ना, हा प्रतीक तर त्रास नाही देत ना?? " प्रतीक ची आई, कारण झालेली जखम जरा जास्तच होती. 

 ( काय कॉन्फिडन असतो राव, आईचा आपल्या मुलावर ????) 

" नाही ओ काकु, आम्ओही फक्त गप्पा मारत होतो. हे माझ माझा लागलय मला. " रोहीणी. 

 रोहीणीच उत्तर ऐकुन तर प्रतीक तिच्याकडे बघतच राहीला. तीला डोळ्या़नीच का म्हणून विचारले? तीनेही  दोन्ही खांदे उडवत एक सुंदर स्माईल त्याला दिली. त्या क्षणाला प्रतीक ला वेगळे काही जाणवले. तिच्यापासून लांब राहण्याच्या प्रयत्नात तो परत तिच्याच डोळ्यात हरवत  होता.  तिच्या हाताला झालेली जखम इतकी मोठी नव्हती तरी, एवढी तरी होती की दुस-या कोणी असत तर गोंधळ घालून प्रतीक ला ओरडा नक्की बसला असता. प्रतीक च्या मनात विचारांच द्वंद्व जणु पेटल होत. त्याला रोहीणी आवडत नव्हती अशातला काही भाग नव्हता, त्याला तर ती आवडायला लागली होती. पण ती दिसायला खुप सुंदर होती, गोरी पान. आणि हा मात्र रंगाने सावळा होता. त्यामुळे त्याच आर्कषण आहे फक्त एवढाच समज होऊन तो विषय सोडुन द्यायचा होता. 

कोजागीरी ची रात्र तर जागलीच पण त्या नंतरही प्रतीकच्या डोक्यातील द्वंदामुळे बरच जागरण झाल. उशिरा झोपल्या मुळे तो उठला ही उशीरा होता. त्यामुळे सकाळी सकाळी त्याला वडीलांची बोलणी खावी लागली होती. तस त्याने वर बेड वर पाहील त्याची बहीण अजुनही झोपली होती आणि तिला कोणीच काही बोलले नव्हते. तस ते नेहमीच झाल होत, घरात जास्त जीव हा शेंडे फळ म्हणुनअर्पणाला लावला जायचा. तिच्यावर आजवर कोणी हातही उचलला नव्हता तिची चुकी असो वा नसो आणि प्रतीक ला मात्र कधी कधी झालेल्या चुकीमुळे मारही खावा लागायचा. मार खावा लागला म्हणून प्रतीक ला कधीही वाईट वाटले नव्हते, कारण चुक आपल्याकडून झाली तर शिक्षा तर होणारच ना, वाईट ह्याच गोष्टी च वाटायच की त्याच्या बहीणीइतक प्रेम त्याला घरात मिळत नव्हत. त्याला नवीन कपडे ही  ( सणांव्यतिरीक्त) तेव्हाच भेटायचे जेव्हा त्याच्या आई वडीलांना त्या कपड्यावर कोणीतरी काहीतरी बोलायचे. बहिणला मात्र ती मागेल तेव्हा मिळत जायचे. यामुळे प्रेमासाठी आसुसलेला प्रतीक रोहीणी कडे आकृष्ट झाला. 

दिस-या दिवशीपासून प्रतीक च रुटीन परत सुरू झाल. सकाळी लवकर उठणे अभ्यासाला बसणे. ३ तासानंतर अर्धा तासाची विश्रांती मग परत अभ्यास असा दिवसभरात वेळापत्रक झाल होत. १० वी च वर्ष म्हणून घरात त्याला काम लावत नसत.

एवढ्या सर्व वेळापत्रकात त्यांच बोलण्याच्या कधीही खंड पडला नाही. तिने काळजीने केलेली विचारपुस त्याला तिच्याकडे ओढुन घेउन जायची. 

ऐके दिवशी तर प्रतीक च डोक दुखायला लागल होत, जवळपास ३.३० तास अभ्यास करून. त्याला विश्रांतीची खुप गरज होती. पण त्या दिवशी घरी वडील असल्याने त्याची हिम्मत झाली नाही उठायची. प्रतीक ला डोक्याला हात लावून बसलेला बघुन ती त्याच्या घरात आली. घरच्यांशी थोड्या गप्पा मारून डायरेक्ट प्रतीक बसला होता तिथे आली. 

" अरेरे स्कॉलर बस, आराम कर थोडा, नाहीतर मेंदू येईल बाहेर. " रोहीणी. 

तिचा अचानक आलेल्या आवाजाने प्रतीक जरा चमकला. डोक दुखत असल्याने क्षण भर त्याला काही सुचले नाही. 

" हा, का?? " प्रतीक

" अरे म्हटल थोडा आराम कर, चल बाहेर जरा, मला मदत पाहीजे तुझी. " रोहीणी

" अग थोडा बाकी आहे, मग जाऊ. " प्रतीक

" उठतो का आता?? " रोहीणी रागात " काकांना झालय विचारून, चल लवकर" ती बोलून बाहेरच्या खोलीत आली. 

" अरे प्रतीक जा रे, रोहीणी ला तिच्या अभ्यासात काही अडचण आहे तेवढी बघ तर " प्रतीक ची आई, " तुला थोडा आराम पण भेटेल. 

" अभ्यासापासून आराम काय तर अभ्यासातील अडचण सोडवायची " प्रतीक मनातल्या मनात पुटपुटत. " हा जातो " 

रोहीणी प्रतीक ला तिच्या घरी घेउन गेली. त्याला आधी थंड लिंबु सरबत दिल. 

आणि त्याच्या समोर ल्युडोचा गेम घेऊन बसली. 

" हे काय?? " प्रतीक गोंधळून

" माझी अडचण, ते कोणी खेळायला नव्हत ना " प्रतीककडे डोळे मिचकावत बोलली. 

तिच्या या उत्तराला ऐकुन प्रतीक तीला पहातच बसला. 

डोळ्यासमोर चुटकी वाजवत " कुठे हरवला?? " रोहीणी

" काही नाही, चल खेळुया " प्रतीक

चांगला १ ते २ तास खेळले दोघ, गप्पा मारल्या, इतक्या की प्रतीक चा मन पुन्हा फ्रेश झाल. 

" अभ्यास जास्त महत्त्वाचा आहे माहितीये, पण शरीराला मर्यादा पलीकडे कष्ट देऊन अभ्यास होत नसतो. " रोहीणी. 

" माहीताये मला, पण मग पप्पांना कोण सांगेल ना. पुर्ण दिवस जरी अभ्यास केला, आणि संध्याकाळी थोडा मोकळा बसलो तरी मी पुर्ण दिवस अभ्यास नाही केला अस वाटत त्यांना. " उसासा टाकत " जाउ दे, माझ्यासाठी सांगत असतात, चल जातो मी बाय" प्रतीक. 

" चल बाय, आणि हो मी नेहमीच हाक मारेल अशा वेळी, नाही सोडणार तुला एकट" रोहीणी. 

प्रतीक ने तिच्याकडे बघत स्माईल दिली. 

" अनामिक ओढ, दाटते मनात

गुंततो जेव्हा, मी तुझ्या डोळ्यात... " 

~ महेश ~

प्रतीक च्या नकळत ह्या ओळी मनात येउन जातात. 

बघता बघता प्रतीक चे १० वी चे वर्ष सरते. परीक्षेच्या तारखा जाहीर होतात. इमारतीमधील जवळपास सर्वच प्रतीक ला भेटुन बेस्ट ऑफ लक देऊन जातात. 

" या लोकांना पण कळत नाही, उद्यापासून पेपर आहे आणि याला बेस्ट ऑफ लक काय देत आहेत, उगाच टाईमपास " प्रतीक चे वडील रागात बोलत होते. 

" मला माहीती होत अस होणार, म्हणून मी माझा अभ्यास आधीच करून ठेवला होता. " प्रतीक वडिलांकडे बघत. 

तेवढ्यात रोहीणी तिच्या आईसोबत प्रतीक च्या घरी आली. रोहिणीच्या आईनेही प्रतीक ला बेस्ट ऑफ लक केल. त्यांच्या शुभेच्छा स्वीकारून प्रतीक डायरेक्ट बेडरूम मध्ये गेला. 

" अग आई, त्याला कॅडबरी द्यायची राहीली बघ. " रोहीणी

" ह्याची काय गरज होती " प्रतीक ची आई हसत रोहीणी च्या आई ला बोलली. 

" परीक्षेची सुरवात गोड ने करायला नको का?? " रोहीणी ची आई. 

" तो बघ आहे आतमध्ये, जा देउन ये त्याला. " प्रतीक ची आई. 

तशी ती आत मध्ये गेली. प्रतीक ला तर वाटत होत ती येईलच, आणि ती बेडरूम मध्ये आली होती. प्रतीक उद्याचा पेपरच पुस्तक घेउन उगाच बसला होता. 

" अय स्कॉलर, माहितीये तुझा अभ्यास झालाय, उगाच पुस्तक घेउन अभ्यास नाटक करु नकोस माझ्यासमोर. माझीच वाट बघत होतास ना?? " रोहीणी

" आयला, हिला कस कळल?? प्रतीक तिच्याकडे गोंधळून बघत. 

" व्यक्त होउनही, कोणी भाव मनाचे जाणले

अव्यक्त राहुनही , तु तार मनाचे छेडले.. "

~ महेश ~

प्रतीक च्या मनात चारोळी सहज रचली गेली. 

" बेस्ट ऑफ लक, तु चांगल्या मार्गाने पास होशील माहितीये मला. " प्रतीक च्या हातात कॅडबरी देत रोहीणी बोलली. 

" थँक यु, आता पेपर गोड जाणारच, सुरवात गोड ने झालीये तर " तीच्या डोळ्यात बघत प्रतीक बोलला. 

आणि प्रतीक चे पेपर सुरू झाले. 

क्रमश... 


🎭 Series Post

View all