हम-तुम भाग -9

hi

तन्वीला समोसा खाताना ठसका आल्यावर मानसची धावपळ पाहून विनयला मानस खरंच प्रेमात १००% पडलाय याची खात्री होते.स्नेहाला हि ते जाणवतं .पाणी पिऊन झाल्यावर तन्वी त्याला थँक्स बोलते. मानस तिच्याकडे बघतो आणि हसतो " अरे इट्स ओके आता आपण फ्रेंड्स आहोत ,आणि फ्रेण्डशिपच्या नियमानुसार नाऊ ओंनवर्डस नो थँक्यू आणि नो सॉरी ,ओके ". आता मानसच लक्ष बाकी सगळ्यांकडे जातं आणि त्याला जाणवत कि सगळे त्याच्याकडेच बघत असतात ,. आता मानसची पंचाईत होते ,त्याला कळत कि आपण जरा जास्तच एक्साइट झालो ते .. विषय बदलण्यासाठी तो सगळ्यांना कामाविषयी विचारतो ,"अरे परफॉर्मन्सची लिस्ट रेडी झाली का कोमल ? आणि इव्हेंट मॅनेजर शी बजेट डिस्कशन झालं का तुझं अमेय?.(अमेय ,कोमल,शिल्पा ,अनय ,कीर्ती ,राजेश हे सगळे मानसचे क्लासमेट आणि पार्टी ऑरगनायझर असतात )

अमेय : "अरे यार मानस बाकी तर सगळं बजेटमध्ये आहे पण तो मॅनेजर डेकोरेशनवर बिलकुल डिस्काउंट देत नाहीये,तूच बघ आता त्याच्याशी बोलून ."

मानस :" अरे हे तू मला आत्ता सांगतोयस ,ते पण मी विचारल्यावर ?काय यार तुम्ही ,मी बोलतो त्याच्याशी,आणि कोमल तुझ्याकडच्या टास्कच काय प्रोग्रेस आहे ."

कोमल : मानस परफॉर्मन्सची काळजी नको करू ,एव्हरीथिंग इस सेट & वेल प्रॅक्टिसेड.आता फकत जुनिअरच्या परफॉर्मन्स लिस्ट बाकी आहे ,वी नीड वन वर टू परफॉर्मन्स फ्रॉम देम,तस सर्क्युलर पाठवलं आहे आज ,होप सो एंट्री येतील, आय थिंक , युअर न्यू फ्रेण्ड तन्वी विल हेल्प फॉर सेम राईट ? तन्वीला नक्की काय चालू आहे हे कळत नाहीं ,मानस तिला फ्रेशर्स वेलकम पार्टीबद्दल सांगतो तेव्हा तिला सगळं क्लिअर होत .स्नेहा लगेच सगळ्यांना तन्वीच्या डान्सबद्दल सांगते ," अरे आपली तन्वी आहे ना मग, डान्स क्विन ,तुम्हाला एन्ट्रीची वाट पण पाहवी नाही लागणार ,एक तर इथेच आहे बरोबर ना तन्वी ?'' तन्वी ला स्नेहाचा जरा राग येतो आणि ती तिला हळूच चिमटा काढते ,तन्वी चे मोठे डोळे बघते तेव्हा स्नेहाला कळत ,कि आपण जरा जास्तच आगाऊपणे बोललो ते ,तन्वी लगेच सावरण्याचा प्रयत्न करते ."अरे तुम्ही सगळे स्नेहाच्या बोलण्याकडे बिलकुल लक्ष देऊ नका ,ती ना जरा जास्तच डोकं वापरते ,आणि ,मला डान्स वगैरे काही येत नाही ,पण मी नक्की तुमचा निरोप आमच्या क्लासमध्ये देईल ,मला असं वाटतंय कि आम्ही निघायला हवं,जरा उशीर झालाय ,भेटू परत बाय गाईस ,सी यु लेटर. " तन्वी स्नेहल अक्षरशः ओढून बाहेर घेऊन जाते ,आणि तिला ओरडते " तू डोकयावर पडलीये का ग ?काय गरज होती तुला तिथे डान्सबद्दल बोलायची ?स्नेहा हे मोठं कॉलेज आहे ,आपली शाळा नाहीये ,तुला कळतंय का ? इकडे १००-२०० स्टुडन्ट समोर परफॉर्म करायचंय ,इट्स नॉट इझी डोअर. स्नेहा : " सो व्हॉट तन्वी ,मला माहित आहे यु आर वन ऑफ द बेस्ट डान्सर माय स्विटहार्ड, यु आर फायेनेस्ट डान्सर ,काय प्रॉब्लेम आहे मग .? तेव्हड्यात मागून मानस तन्वीचे विसरलेले बुक्स द्यायला येतो आणि त्यांचं बोलणं ऐकतो . " यु आर राईट स्नेहा ,इफ यु आर फायेनेस्ट डान्सर देन यु शूड परफॉर्म ,इट्स बिग प्लॅटफॉर्म टू शो युअर टॅलेंट ,मला तरी वाटतय कि तू खरंच भाग घ्यावा ,आणि काहीही प्रॉब्लेम आला तर मी आहे ना ,सो डोन्ट वरी ."तन्वीला त्याच बोलणं थोडं पटतं . " तू बोलतोय ते पटतंय मला,पण मी ह्या आधी कधीच एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर परफॉम नाही केलाय ,सो मला थोडा विचार करावं लागेल ."इट्स ओके टेक युअर टाईम नो प्रॉब्लेम ,पण मला माहितीये तू पार्टीसिपेशन करशील ते , हे तुझे बुक्स मी जातो बाय ." तन्वी त्याच्या बोलण्याचा विचारमध्ये असते

: "स्नेहा: "ओह्ह आम्ही काही सांगितलं तर आम्ही बावळट पण मानस ने काही सांगितलं तर लगेच पटतं ,आम्ही काय बाबा आता फकत मैत्रिण ,खास तर कोणी तरी दुसरच होतंय ,येतंय माझ्या लक्षात असू दे आता काय ,"

तन्वी : " काय ग स्नेहा सॉरी ना यार ,मला तसं नव्हतं म्हणायचं ,तू असं सगळ्यसमोर बोललीस म्हणून थोडा राग आलेला ,तू माझी बेस्ट फ्रेंड आहे ना मग नको ना असं बोलूस , चल जाऊयात आपण ,माझ्याकडून तुला मस्त कॉफी ओके . स्नेहा: "आता एव्हडा मस्का मारला तर समजून घ्यावच लागेल मला ,कॉफी मात्र नक्की द्यायची बर का ,पण काय ग हा मानस कसल भारी बोलतो यार ,तुला बघून त्याची विकेट नेहिमीच जाते ,मला तर वाटतंय कि तो तुझ्या प्रेमातच पडलाय . तन्वी : "झालं परत चालू तुझं ,जाऊ दे तुझी कॉफी कॅन्सल ,स्नेहा : "नाही बर का ह्यावेळेस कल्टी नाही द्यायची कॉफी तर द्यावीच लागेल मला ,दोघीपण हसतात आणि घरी जाण्यासाठी निघतात .तन्वी घरी आल्यावर आईला डान्स बद्दल तीच मत विचारते ,आईपण तिला मानस जस सांगतो सेम तसेच सांगते . रात्री झोपताना विचार करते ,मानस आणि आईच मत किती जुळतं ,तो पण आपल्याबद्दल चांगला विचार करतो हे तिला जाणवतं ,त्याच तिच्यासाठी पटकन पाणी देणं ,तिला डान्स साठी इंडेरेक्टली सपोर्ट करणं हे तिला खरच खूप आवडतं. मानसने तिला समजावून सांगितल्यामुले ती डान्सबदल विचार करू लागते,आणि त्यातच झोपी जाते . सकाळी उठल्यावर ती डान्ससाठी रेडी झालीये हे आई ला सांगते ," आई मी रात्री तुझ्या बोलण्याचा विचार केला ,मला वाटतयं मी हि संधी सोडू नये ,सो आय एम गोयिंग टु पार्टीसिपेट .. आय एम सो एक्सयाटेड नाऊ "असं बोलून ती तिच्या आईसोबत कपल डान्स करायला लागते ." तन्वी,काम पडलीयेत खूप सारी ,तुझं काय चालू आहे ,ते डान्स वगरे तू कर बाई मला नको त्रास देऊ ,नाहीतर तुझ्या पप्पाबरोबर कर जा तिकडे ."

तन्वी : " काय ग आई तुझी काम तर चालूच असतात ,तुला फक्ट पप्पाबरोबर कपल डान्स करायचा असेल ,माझ्याबरोबर कशाला करशील ?" तन्वीची आई तिच्याकडे लटक्या रागाने बघते "तन्वी काय ग आगाऊपणा चालू आहे ,जा आवर लवकर नाही तर परत उशीर होईल कॉलेजला जायला."

तेव्हड्यात तन्वीचे पप्पा खाली येतात ,"कोण करतंय डान्स ? तन्वी कि तिची आई ?." "बरे झालं पप्पा तुम्ही आलात आईला फकत तुमच्यासोबत कपल डान्स करायचा आहे ,माझ्यासोबत बिलकुल नाही ," असं बोलून तन्वी तिच्या रूममध्ये पळून जाते . " थांब तुला जरा फटकेच देते ,नुसती आगाऊ झालीये कॉलेजला जायला लागल्यापासून,आणि तुम्ही काय तिच्यासमोर हसत होतात,? "तन्वीचे बाबा तिच्या आईकडे मिश्कीलपणे हस तिला बोलतात "अरे वा मला तर आवडेल कपल डान्स करायला,,मी काय म्हणतो मी आज सुट्टीच घेतो ऑफिसमधून ." "इश्श काही तरी काय तुमचं ,तन्वीला एक कळत नाही ,तुमचं काय चालू आहे .जा आता लवकर ऑफिसला तन्वीचे बाबा थोडं नाराजीच्या सुरात तिच्या आईला बोलतात .”बर बाई जातो ऑफिसला ,मला वाटलं थांबा म्हणशील ,राणीसरकारच ऐकावंच लागेल ,बाय” . तन्वीचे बाबा ऑफिसला निघून जातात ,तन्वी आणि स्नेहा नेहमीप्रमाणे कॉलेजला जातात

क्रमशः

तळटीप :तुमच्या कमेंट वाचल्यावर लिहायला अजून उत्साह येतो .तुमचं प्रेम कमेंटमधून पण दिसून द्या ...सगळ्यात जास्त आवडत्या कमेंट म्हणजेच नेक्स्ट पार्ट कधी ह्याच उत्तर 12 july ....

माझ्यानावाशिवाय कृपया माझी कथा कुठेही शेयर करू नका .साहित्यचोरी करणे हा कायद्याने गुन्हा आहे ,असे करताना कोणी आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल ©वृषाली गावडे

🎭 Series Post

View all