हम-तुम भाग -7

hi

तन्वीचा आजच्या दिवसात खूप घडामोडी झालेल्या असतात .ती घरी आल्यावर तिच्या आईला गाडीबद्दल सांगते ,नंतर जेवण करून तिच्या रूममध्ये जाते. तन्वी आज बेडवर पडल्यावर मानसचा विचार करत असते ,आज तिने त्याला पहिल्यांदा खूप जवळून पाहिलेलं असतं ,त्याचे सुंदर डोळे ,गालावर पडलेल्या सुंदर खळ्या ,त्याचा एलन मस्कच्या पर्फुमचा सुंगंध , त्याचे बायसेप ,त्याने तिला पकडलेला क्षण ,त्याचा स्पर्श, त्याचा संयमी स्वभाव,त्याचा चांगुलपणा आणि तीने त्याच्यावर विनाकारण आरोप केलेले असताना हि परिस्थीतीचा विचार करून त्यांना मदत करणे , हे सगळं तिच्या मनाला खूप भावतं,ती नकळत त्याच्या प्रेमात पडलेली असते ,तिला मानसबद्दल आदर वाटायला लागला असतो ,इकडे मानसची परिस्थीती काही वेगळी नसते,तो घरी गेल्यावर गाणं गुणगुणत असतो ,इकडे त्याची मम्मी एका डीलचे पेपर चेक करत असते ,मम्मीला बघून तो मम्मीकडे जातो आणि तिला मागून मिठी मारतो ."मॉम मी आज खूप खुश आहे ,लेट्स डान्स ."असं म्हणून तिच्याजवळ चे पेपर बाजीला ठेवतो आणि तिच्या हाताला धरून गाणं म्हणत डान्स करतो ,आणि तिला मग मिठी मारतो . "काय आहे मानस ,लहान मुलासारखं वागतोय ,काय स्पेशल आहे आज राजे ?" मानस एकदम ब्लश करतो." अगं मॉम काहीच नाही सहजचं ,आज मस्त पाऊस पडलाय ना म्हणून मी खूप खुश आहे ." मॉम त्याचा लाडाने एक कांन पकडते आणि बोलते "ओह्ह तर पाऊस हे कारण आहे का?पण पाऊस तर दरवर्षी पडतो,तेव्हा कधी मला एवढा खुश दिसला नाही ते ,ह्या वेळेचा पाऊस काहीतरी वेगळाच दिसतोय वाटतं,जाऊ दे कारण काहीहि असो ,तू असाच हॅप्पी राहा बेटा." "मॉम लव्ह यु सो मंच.. "ओके तू आलास आहेस तर चल आता दोघे डिनर करून घेऊ ,तुझे डॅड बिसनेस मीटिंग्जसाठी सिंगापूरला गेले आहेत संध्याकाळी," दोघेपण डिनर करतात ,आणि मग मानस त्याच्या रूममध्ये झोपायला जातो .. दुसऱ्या दिवशी सकाळी तन्वीला लवकर जाग येते ,तिला आज खूपच फ्रेश वाटत असत ,ती सगळं आवरून कॉलेज जाण्यासाठी रेडी होते ,मग ती देवाच्या पाया पडायला देवघरात जाते आणि तिच्या बप्पाशी गप्पा मारते ,"गनु मी ना काल खूपच गोंधळ घालून ठेवलाय ,मी खरच खूप बावळट सारखी वागले काल ,त्या बिचार्या मानसची काही चुकी नसताना पण मी खूप ऐकवलंय त्याला ,उगीच विनाकारण चिडले त्याच्यावर ,तुला तर माहितिये मी खूप चिडले कि मनातं येईल ते बोलते ,बरं मी कि नाही आज कॉलेजला गेल्यावर त्याला मनापासून सॉरी बोलणार आहे आणि त्याच्यासाठी मोठी डेरीमिल्क पण घेणार आहे ,चल मी जाते आता नाही तर उशीर होईल .आज तन्वीची गाडी नसल्यामुळे स्नेहा तिची गाडी घेऊन तन्वीकडे येते, आणि दोघी कॉलेजला जायला निघतात. "स्नेहा गाडी ना थोडं अलीकडे जे सुपर मार्केट आहे ना तिथे थांबव प्लिज ,मला ना कॅडबरी घ्यायची आहे ." "तन्वी माझा तर बर्थडे ला वेळ आहे अजून ,मग आज काय सहजच आहे का मला कॅडबरी? मज्जा आहे माझी आज मग ." "ओये तुझ्यासाठी नाही घेत आहे कॅडबरी मॅडम उगीच स्वप्न नका बघू ,मी तर मानससाठी घेतीये ." असं ऐकताच स्नेहा एकदम करकचून ब्रेक मारते ."काय तू मानससाठी कॅडबरी घेतीये?तुला ताप वैगरे नाही ना आलाय ना? तू बरी आहेस ना तनु ?." "स्नेहा एवढ काय झालंय तुला शॉक व्हायला ?मला वाटतंय कि मी काल विनाकारण मानसला खूप बोललीये.मी खूप वाईट वागलीये त्याच्याशी ,मी त्याला आज मनापासून सॉरी बोलायचं ठरवलंय आणि त्यासाठीच मी एक टोकन ऑफ थँक्स म्हणून एक चॉकलेट घेतीये बस." "तनु माझा तर कानांवर विश्वास बसत नाहीये ,तू त्याला सॉरी बोलणार आहेस ,आर यु शुअर ?. "हो ग स्नेहा ,काल त्यांनी आपण अडचणीत असताना आपल्याला खूप मदत केली, एव्हडा पाऊस असताना पण आपल्याला घरी सोडलं ,तो खरच खूप चांगला मुलगा आहे हे पटलंय मला,आणि जर आपली चूकी झाली असेल तर आपण सॉरी नक्कीच बोललं पाहिजे बरोबर ना?. " ये हुई ना बात मेरी जान ,खरयं तन्वी त्यांनी जर काळ मदत केली नसती खूप प्रॉब्लेम झाला असता ,पण मंग फक्त मानसलाच का? विनय ला पण घेऊ ना." ""ओह्ह विनयला तर मी विसरलेच ,तू बर लक्षात ठेवलं ते स्नेहा ,काही विशेष आहे का ?" इकडे स्नेहा थोडी लाजते " काय ग तनवीं ,उघिच काय चिडवत असते ,मी तर सहजच बोलले ,नसेल घायची त्याच्यासाठी तर नको घेऊ ." आता तन्वी स्नेहाला मुद्दाम चिडवत बोलते "असं कस ,स्नेहा मॅडम ने सांगितलं तर त्यांचा विनयसाठी तर ,घ्यावीच लागेल ना ." दोघी पण हसतात आणि कॅटबेरी घेऊन कॉलेजला येतात ,पार्किंगमध्ये त्यांना एक मुलगा तन्वीच्या गाडीजवळ दिसतो,तन्वी जवळ जाऊन पाहते तर तो एक मेकॅनिक असतो ,तो तन्वीच्या गाडीत हवा भरत असतो.तन्वी त्याला बोलते "हॅलो तुम्ही माझ्या गाडीबरोबर काय करताय ?कोणी सांगितलं माझ्या गाडीला हाथ लावायला ?" "अहो मॅडम त्या विनय सर ने सकाळी फोन करून यायला सांगितलं होत ,त्यांनीच मला गाडीत हवा भरायला सांगितलं,मला वाटलं त्याची गाडी आहे म्हणून . जातो मी ." "कसला स्वीट आहे हा विनय , तन्वी किती काळजी आहे आपली बघ त्याला. " "हो का स्नेहा मला माहित नव्हतं कि त्याला विनयने सांगितलं आणि विनय स्वीट पण आहे म्हणून ." "काय ग तन्वी सकाळपासून नुसती चिडवते मला . आपण त्यांना शोधून थँकयु बोलू ". विनय आणि मानस आज कॉलेजला लवकर आलेले असतात ,त्यांना फ्रेशरर्स वेलकम पार्टीच प्लांनिंग करायचं असते ,ते त्यांच्या टीमबरोबर ऑडिटोरियम मध्ये बसलेले असतात .

क्रमशः

तळटीप :तुमच्या F बरोबर कमेंट पण येऊ द्या . कमेंट वाचल्यावर लिहायला अजून उत्साह येतो .तुमचं प्रेम कमेंटमधून पण दिसून द्या ...

स्टे होम & स्टे सेफ

🎭 Series Post

View all