हम-तुम भाग 6

hi

स्नेहा आणि तन्वी गाडीतली हवा गेल्यामुळे पार्किंगमध्ये उभ्या असतात ,इकडे विनय आणि मानस घरी जायला निघतात.मानस गाडीत बसण्यासाठी कारच दरवाजा उघडायला जातो ,तर विनय पटकन येऊन त्याच्या हातातून कारची चावी काढून घेतो. "राजे आज जरा गरिबाला सेवा करू द्या ना प्लिज ,ड्राइव्हर  असताना तुम्ही कशाला गाडी चालवायची तसदी घेताय ." "विन्या  तू म्हणजे पक्का नौटंकी  आहेस साल्या ,सरळ सांग ना तुला bmw चालवायची आहे म्हणून  ,ही  घे चावी  तसंपण बाहेर मस्त पाऊस पडतोय ,मी मस्त निसर्गाचा आस्वाद घेतो ,आजचा दिवस जरा जास्तच भारी होता यार माझ्यासाठी  ." दोघे पण गाडीत बसतात विनय ड्ड्राईव्ह  करतो आणि गाडी पार्किंगमधून बाहेर काढतो.पुढे आल्यावर पावसाची जोरदार सुरवात होते  ,विनय गाडीचा स्पीड कमी करतो,इकडे मानसच  लक्ष  टू व्हिलरच्या पार्किंगकडे जातं  तर त्याला तन्वी दिसते .तो मनात बोलतो "आता मला दिवसाढवळ्या  पण तन्वीचे भास व्हायला लागले वाटतं .पण मग स्नेहा गाडीला हाथ दाखवताना दिसते ,मानस स्वतःला  चिमटा  काढतो, "औच ,अरे हि तर खरच  तन्वी आणि तिची मैत्रीण दिसतीये ."विनय गाडी जरा मागे घे त्या टू व्हिलरच्या पार्किंगकडे ,तिथे बहुतेक मला तन्वी दिसली . " "काय यार माणसाने इतकं पण  प्रेमात वेड नसत रे व्हायचं  भाई ,तुला तर सगळीकडे तीच दिसायला लागली वाटतं." अरे विन्या तू जरा डोकयावर पडलाय काय रे ? जरा तुझ्या उजवीकडे बघ दोन मुली दिसतायत का?ती बघ  तन्वी आणि तिची मैत्रीण दिसतायत ."हो रे मानस ,खरंच  रे,तुमच्या दोघांचे भेटण्याचे योग  एकदम जबरदस्त दिसतायत ,बाहेर जोरदार पाऊस ,आणि बरोबर गर्लफ्रेंड ,वा भाई वा ."दोघेपण त्यांच्याकडे जातात , स्नेहा आणि तन्वीला त्यांच्याकडे येणारी   BMW गाडी बघून थोडस बरं  वाटतं . स्नेहा गाडीजवळ जाते आणि विनय पण गाडी ची काचखाली करतो.स्नेहा विनयला म्हणते " हॅलो  मी स्नेहा ,आणि माझी मैत्रीण तन्वी ,आमच्या गाडीच्या  टायरमधली हवा  खूप कमी झालीये ,आमचा फोन पण लागत नाहीये ,मी तुमच्या फोनवरून जरा घरी फोन करू का? म्हणजे माझे डॅड  आमची काळजी  करणार नाही आणि मी त्यांना इकडे बोलवून  घेईल आणि  आम्हाला  घरी जाता येईल," अरे  स्नेहा तुम्ही घरच्यांना कशाला त्रास देताय ,तुमची हरकत नसेल तर आम्ही तुम्हाला घरी ड्रॉप करू शकतो ,कारण पाऊस थांबायची काही लक्षण दिसत नाहिये .स्नेहा तन्वीकडे जाते आणि तिला विचारते ."तन्वी हा पाऊस काही थांबेल असं वाटतयं ,मला वाटत आपण  ह्याच्या बरोबर जावं ,तू सांग काय ते ? "आग स्नेहा आपण ह्यांना ओळखत पण नाही आणि तू त्याच्याबरोबर  जायचं असं कसं  बोलते यार?मला नाही वाटत आपण त्याच्याबरोबर जावं म्हणून..आपण त्यांच्या फोनवरून  कॉल करू आणि मी डॅडला बोलावून घेते ओके . स्नेहाला तीच बोलणं पटत आणि तन्वी फोन  घेण्यासाठी  विनयकडे येते ती गाडीत पाहते तर तिला मानस दिसतो ती  चिडते  आणि त्याला चिडून बोलते  .."ओहो  हे चांगलंय तुमचं मिस्टर  मानस ,एक गाडी काय लावली पार्किंगमध्ये तर तुम्ही तर हद्दच केली,डायरेक्ट गाडीची हवा सोडून दिली ,तुम्ही समजता  काय स्वतःला ? कॉलेजचे  GS  झालात म्हणजे काय नुसती दादागिरी करणार काय तुम्ही?आम्ही तुमच्यामुळेच   इथे अडकलो आहोत कळतंय का तुम्हाला? तन्वीचे  गाल ,नाक  रागाने  लाल झालेले आणि डोळे एकदम मोठे  करून बघत असते.इकडे विनयची ट्यूबलाईट पेटते ,आणि त्यानी ज्या गाडीची हवा सोडली असते ती तन्वीची असते हे त्याच्या लक्षात येते ,आणि मानसला तन्वी  एव्हडी त्याच्यावर का चिडलीये  हेच समजत  नाही,तो खूप गोंधळलेला असतो ,विनय तन्वीला  शांत करायचा प्रयत्न  करतो पण ती त्याला काही बोलू देत नाही ,स्नेहाला लक्षात येत कि नक्कीच काहीतरी गडबड झालीये आणि तन्वी चिडलीये  ती लगेच कारजवळ येते .ती मानसला आत मध्ये पाहते ,आणि समजून जाते त्यांची च्या चिडण्याचं कारण. स्नेहा  तन्वी ला शांत करण्याचा प्रयन्त  करते ,विनय गाडीतून खाली उतरतो आणि तन्वीला समजावतो ,"मिस तन्वी ,मानसने असं काही केलेले नाहीये मी त्याच्याबरोबरच आहे सकाळ पासून ,तुमचा काही तरी गैरसमज  झालाय" ,तन्वीला चिडलेले पाहून हा सगळा गोंधळ त्याने केला आहे हे सांगणं एकदम कटाक्षाने टाळतो...तन्वी ते ऐकून थोडं शांत होते आणि वरमते.मानसला तन्वीने बोललेलं आवडत नाही त्याला खूप  वाईट वाटत. पण तो तास दाखवत नाही ,"हे बघा मिस तन्वी  तुम्ही जे बोलताय तस मी काहीच केल नाहीये  आपण ह्या विषयावर नंतर बोलूयात ,पण मला असं वाटतंय आता आपण सगळ्यांनी निघायला  हवं ,एकतर पाऊस पण खूप पडतोय ,वीजापण खूप चमकत आहेत  आणि अंधार पण खूप वाढलाय ,तुम्ही दोघीना असं इथे सोडून जाण  मला योग्य  वाटत नाहीये ,तर प्लिझ  तुम्ही दोघी गाडीत बसा ,आणि ह्या कॉलेजचे ट्रस्टी माझे डॅड  आहेत तर त्याच्या रेपुटीशन बघता तुम्ही माझ्यावर थोडा विश्वास ठेऊ शकता."तेव्हड्यात वीज चमकते आणि लाईटपण  जातात ,तन्वी एकदम घाबरून मानसचा हाथ पकडते ,मानसला खूपच भारी वाटतं आणि तो एकदम सुखावून जातो ,त्याचे हॅटबिट एकदम वाढतात .  तन्वीला समजत कि आता जास्त वेळ इथे थांबणे योग्य  नाही ,ती स्नेहाला  घेऊन  गाडीमध्ये  मागे बसते,मानस आणि विनय  गाडीत बसतात ,मानस सेंट्रल मिरर ऍडजस्ट  करतो  त्यामुळे त्याला तन्वी दिसते , ,विनय फक्त हसतो आणि साईड  मिरर  अड्जस्ट करतो आणि गाणी लावतो ,नेमकं  FM ला  गाणं लागतं

इक लड़की भीगी भागी सी
सोती रातो मे जागी सी
मिली इक अजनबी से, कोई आगे ना पिछे
तुम ही कहो ये कोई बात है

दिल ही दिल मे चली जाती हैं
बिगड़ी बिगड़ी चली आती हैं
ढुँधलाती हुवी बलखाती हुवी
सावन की सुनी रातो मे
मिली इक अजनबी से, कोई आगे ना पिछे
तुम ही कहो ये कोई बात है

तन्वीच्या मनात आता विचारांनी  खूपच गोंधळ घातला असतो ,ती आज दिवसभर घडलेल्या घटनांचा  विचार करते ,आणि तिला जाणवत कि मानस ला आपण   आज एकदा नाही तर दोनदा खूप बोलालो ,तो आपल्यावर न चिडता त्याने उलट आपली मदतच केली., तिला आता स्वतःचाच खूप राग येतो  तन्वीला मनातून  खूप वाईट  असतं ,ती मनात ठरवते उद्या मानसला अगदी मनापासून सॉरी बोलायच ,

विनय आणि मानस  दोघीना आधी घरी सोडतात   तन्वीच घर आल्यावर ,ती  गाडीतून उतरते आणि मानसच्या विंडो जवळ जाऊन त्याला थँक्स आणि गुड नाइट बोलते , स्माईल  देऊन बाय  करते आणि घरी जाते ,मग मानस विनयला ड्रॉप करून घरी जातो ,मानस आज एकदम खुश असतो ,बेडवर पडल्यावर आज दिवसभर  झालेल्या घटना आठवतो , ,तिचा चिडलेला चेहरा,मोठे डोळे ,पावसात भेजलेले  केस, तो  अजूनच तन्वीच्या प्रेमात पडतो,इकडे तन्वी पण त्याचाच विचार करत बाल्कनीमध्ये बसलेली असते ,तिला त्याचा चांगुलपणा खूपच आवडतो ,ती तिच्या नकळत  त्याच्या प्रेमात पडलेली असते.

🎭 Series Post

View all