हम-तुम भाग -22

HI

मागील भागात आपण पाहिलत कि तन्वी आणि मानस दोघांना एकमेकांना भेटण्याची ओढ़ निर्माण झालेली असते ..पण रविवार असल्यामुळे त्या तन्वीचा हिरमोड होतो आणि ती आणि स्नेहा दोघेही शॉपिंगला जातात ... मॉलमध्ये अनपेक्षितपणे मानसची भेट होते आणि तिला खूप जास्त आनंद होतो. मानस पण तन्वीला भेटून खूप खुश होतो ..आता पुढे

शॉपिंग करून घरी आल्यावर तन्वीचा मूड खूप छान असतो .. ती तिच्या आईला केलीली शॉपिंग पटपट दाखवते,पण ह्या वेळेस मानसने तिच्यासाठी कपडे निवडलेले असल्याने ते नेहमीपेक्षा वेगळे असतात , तन्वीच्या आईला ते जाणवत आई:"तन्वी आज शॉपिंग नक्की कोणी केली ग ?" आईने असं विचारल्यामुळे तन्वी थोडी घाबरते तन्वी : " असं काय विचारतीये आई तू .मी आणि स्नेहा गेलो होतो ना " आई : " अग तन्वी नेहमीपेक्षा एकदम वेगळे पॅटर्न आणि कलर दिसत आहेत म्ह्णून विचारलं,हा पीच कलर किती सुंदर दिसतोय ,त्या दिवशी मी सेम ह्याच कलरचा टॉप आणला तर परत रिटर्न करायला लावलास ,आणि आज कसं काय तुला हा कलर आवडला? तन्वी थोडस सांभाळून उत्तर देते तन्वी :" आयुडू मी हा टॉप पहिला आणि तुझा त्या दिवशीचा रिटर्न करताना पडलेला चेहरा आठवला मग विचार केला कि आज आयुडू च्या आवडता कलर घ्यावा म्हणून घेऊन टाकला " असं बोलून तन्वी आईला मिठी मारते आई :" असं आहे तर ,माझ्या बाळाने माझ्या आवडीच्या कलरचा टॉप घेतला आहे तर ,हा कलर खूप मस्त दिसेल तुला ,बर हा सगळा पसारा आवार पटकन ,मला किचन मध्ये खूप काम पडलीये ,आता तुझे बाबा येतील आणि भूक लागली म्ह्णून घर डोकयावर घेतील.. तन्वी सगळा पसारा आवरते आणि तिच्या रूममध्ये जाते आणि स्वतःला बेडवर झोकून देते आणि मानसचा विचार करत स्वतःशीच लाजते इतक्यात तिच्या फोनवर मानसचा मेसेज येतो .." हाय तन्वी ,पोहचलीस का नीट?" त्याचा मेसेज वाचून तर ती खूप ब्लश करते ,आणि फोनला एकदम जवळ घेते ..तन्वीला त्याच काळजी घेणे खूप मनापासून आवडत असत .. तन्वी त्याला रिप्लाय करते .." हाय मानस ,थोड्यावेळापूर्वीच पोहचले ,आईला शॉपिंग खूप आवडली ,थँक यु सो मच " मानस तिच्या मेसेजची वाट पाहत असतो ,आणि तिचा मेसेज बघून खूप खुश होतो .. दोघेही इकडच्या तिकडच्या गप्पा मारतात आणि मग .तन्वी झोपून जाते मानस मात्र तन्वीचा विचार करत बसतो ..." मी खरंच तन्वीला आवडत असेल ना? माझ्यावर ती प्रेम करत असेल ना? नाहीतर उगीच आमची मैत्रीपण मी गमवून बसेल ..पण तिच्या डोळ्यात मला माझ्याबद्दल प्रेम जाणवत मला ,मानस लवकर सगळ्या गोष्टी सॉर्टआउट केल्या पाहिजे बाबा " काही दिवसानंतर तन्वीचा वाढदिवस असतो आणि त्या दिवशीच मानस तन्वीला त्याच्या मनातील भावना व्यक्त करण्याचं ठरवतो .. पण त्या आधी तन्वीच्या मनातलं जाणून घेण्यासाठी तो एक प्लॅन आखतो ,आणि स्वतःवर खुश होऊन झोपी जातो .. दुसऱ्यादिवशी मानस आणि विनय दोघेही कॉलेजला जातात ,मानस विनयला तो तन्वीला तिच्या वाढदिवसाला प्रपोझ करणार आहे असं सांगतो विनय :" यार मस्त एकदम ,मी खूप खुश आहे भावड्या लवकरच तन्वीला मी वाहिनी म्हणून हाक मारणार ,कसली भारी गुड न्युज दिलीये " असं बोलून तो मानसला मिठी मारतो . मानस :"विनय पण मला जाम टेन्शन आलाय यार ,तिला पण मी आवडतो ना यार ? मला असं वाटाय कि मी थोडासा अंदाज घेऊन मगच तिला प्रपोझ करावं ,त्यासाठी मी प्लॅन केला आहे" ,मानस विनयला त्याचा प्लॅन सांगतो ..त्याचा प्लॅन ऐकून विनय थोडं शांत बसतो विनय :" मानस तुझा प्लॅन तर चांगला आहे पण मला थोडासा रिस्की वाटतोय,पण तू ठरवल ना मग झालं " ते दोघे बोलत असताना मागून स्नेहा त्याचं बोलणं ऐकते ,आणि मानस तन्वीला प्रपोझ करणार हे ऐकून खुश होते ..पण नंतर त्याचा प्लॅन ऐकून तिला थोडासा रागपण येतो ,पण तन्वीसाठी हा प्लॅन योग्य आहे असं तिलाही पटत.. ती त्यांना आवाज देते " हॅलो ,गुड मोर्निंग ,काय चालू आहे तुमच्या दोघांचं ? " तिने असं एकदम विचारल्यामुळे त्यांच्या चेहऱ्याचा रंग उडून जातो ,दोघे एकमेकांकडे बघतात .. विनय :" हाय स्नेहा ,आमचं कुठं काय चाललय ,आम्ही असेच गप्पा मारत होतो ,तू कधी आलीस ? स्नेहा :"अरे तुम्ही दोघे एवढे काय घाबरताय ,मी तर सहज गम्मत केली ,नक्की तुमचं काही चालू नव्हतं ना ? मानस विषय बदलण्यासाठी तिला तन्वी बद्दल विचारतो मानस :" तन्वी आली नाही का कॉलेज ला ? तू एकटीच दिसतीये .. स्नेहा :" अरे ती लायब्ररीमध्ये गेलीये .. मानस :" आम्ही निघतो यार ,लेक्चर आहे आता ,बाय. विनय आणि मानस निघून जातात .. तन्वी त्याना जाताना बघते आणि स्नेहाकडे येते .." स्नेहा हे का बर गेले एकदम? मला भेटून तर जायचं ना " स्नेहा :" अग त्यांचं लेक्चर होत म्ह्णून गेले” तन्वी :" मानस ने काही विचारल का ग माझ्याबद्दल ? स्नेहा हळूच पुटपुटते " सगळं तर तुझ्याबद्दलच चालू होत " तन्वी :"स्नेहा एकटीच काय पुटपुटते माझ्या प्रश्नच उत्तर दे ना ग " स्नेहा :" हो किती उतावळेपणा ग ,हो मानस ने विचारल कि तू कुठे आहेस म्हणून ,बस खुश आता " तन्वी :" मी तर सहज विचारलं ,चल नाहीतर आपल्यला उशीर होईल क्लासमध्ये जायला . स्नेहा :" एव्हडं मानसबद्दल सारखी विचारात असते ,त्याच्या प्रेमात पडलीये तू तन्वी " तन्वी :" नाही ग स्नेहा ,असं काही नाही .आपण नंतर बोलूया चल लवकर .. तन्वी स्नेहाच्या प्रश्नाला उत्तर देण्याचं टाळते आणि दोघी क्लासमध्ये जातात . दिवसभर तन्वीला मानस दिसत नाही त्यामुळे तीच कशातच लक्ष लागत नसत ,तिच्या मनाची चलबिचल अवस्था झालेली असते .. इकडे मानसला पण करमत नसत त्यामुळे तो पण थोडा अस्वस्थ असतो ,पण त्याच्याच केलेल्या प्लॅननुसार त्याला दुसरा पर्याय नसतो.. दोघेही दिवसभर एकमेकांना भेटण्यासाठी तळमळत असतात . पूर्ण दिवस दोघे एकमेकांना न भेटता संपून जातो .. रात्री तन्वी मानसचा विचार करून मेसेज करायला फोन हाथात घेते आणि परत ठेऊन देते ..इथे मानस तिच्या मेसेजची चातकाप्रमाणे वाट पाहतो .पण तन्वीचा मेसेज येत नाही त्यामुळे त्याचा हिरमोड होतो .आणि तो तिच्या मेसेजची वाट बघत झोपी जातो

तळटीप :मानसने नक्की काय प्लॅन केला असेल ? तन्वी सगळ्याला कस हॅण्डल करेल ?आणि स्नेहा तन्वीला मदत करेल कि नाही हे जाणून घेण्यासाठी स्टे कनेक्टेड .. . फकत नेक्स्ट पार्ट कधी हे विचारण्यापेक्षा हा भाग कसा वाटला नक्की कळवा ..

🎭 Series Post

View all